Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कितीही चमचमीत पदार्थ खाल्ले तरी पचेल-वाढेल पचनशक्ती, रोज ‘अशी’ खा धणे-जिरे पूड

कितीही चमचमीत पदार्थ खाल्ले तरी पचेल-वाढेल पचनशक्ती, रोज ‘अशी’ खा धणे-जिरे पूड

healthy food tips, No matter how much delicious foods you eat, your digestion will improve, eat coriander-cumin powder every day : धणे-जिरे पूड आहारात हवीच. पाहा ही साधी पूड किती फायद्याची असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2025 17:23 IST2025-08-05T17:22:54+5:302025-08-05T17:23:52+5:30

healthy food tips, No matter how much delicious foods you eat, your digestion will improve, eat coriander-cumin powder every day : धणे-जिरे पूड आहारात हवीच. पाहा ही साधी पूड किती फायद्याची असते.

healthy food tips, No matter how much delicious foods you eat, your digestion will improve, eat coriander-cumin powder every day | कितीही चमचमीत पदार्थ खाल्ले तरी पचेल-वाढेल पचनशक्ती, रोज ‘अशी’ खा धणे-जिरे पूड

कितीही चमचमीत पदार्थ खाल्ले तरी पचेल-वाढेल पचनशक्ती, रोज ‘अशी’ खा धणे-जिरे पूड

धणे-जिरे पूड ही भारतीय स्वयंपाकात वापरला जाणारा एक प्रकारचा मसालाच आहे. इतर मसाल्यांप्रमाणे ही पूड वापरली जाते. सगळेच, सगळ्याच पदार्थांत ही पूड घालत नाहीत. (healthy food tips,  No matter how much delicious foods you eat, your digestion will improve, eat coriander-cumin powder every day)मात्र जर तुम्ही हा पदार्थ वापरत नसाल तर नक्कीच वापरायला सुरवात करा.  धणे आणि जिरे हे दोन्ही पदार्थ भाजून नंतर वाटून त्याची पूड केली जाते. ही पूड आपल्या दैनंदिन आहारात वापरल्यामुळे अनेक फायदे मिळतात. ज्यांना पचनाचे त्रास असताता त्यांनी तर ही पूड खायलाच हवी. 

धणे म्हणजे कोथिंबिरीच्या बिया. कोथिंबीरीत असणारे गुणधर्म तर या पूडमध्ये असतातच, शिवाय त्यापेक्षा जास्तही काही पोषणसत्वे असतात. धणे थंड असतात, जंतुनाशक आणि पचनासाठी लाभदायक असतात. त्याचबरोबर जिरे शरीराला गरजेची असलेली उष्णता तयार करते. ही पूड मस्त पाचक असून, पोटातील गॅस, अपचन आणि शरीराची अंतर्गत सुज कमी करते. स्वयंपाक करताना ही पूड वापरल्यास अन्न अधिक स्वादिष्ट तर होतेच, पण त्यातील औषधी मूल्यदेखील वाढतात.

धणे-जिरे पूड नियमित वापरल्याने पचनशक्ती सुधारते. अन्न पचवताना होणाऱ्या जळजळीचा त्रास कमी होतो. यामध्ये असणारे नैसर्गिक अँण्टी ऑक्सिडंट्स शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. धणे-जिरे पूड गरम पाण्यातून घेणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. लघवीचे विकार, पचनदोष, मळमळ या समस्यांचे प्रमाण कमी होते. काही लोक त्वचारोग किंवा उष्णतेच्या त्रासामुळे त्रस्त असतात. त्यांनी आहारात धणे-जिरे पूड घ्यावी. ही पूड पाण्यात उकळवून प्यावी.

धणे-जिरे पूड शरीरातील दाह कमी करते, रक्तशुद्धीमध्ये मदत करते आणि थकवा दूर करून चांगली ऊर्जा देण्याचे काम करते. महिलांच्या काही हार्मोनल तक्रारींसाठीही धणे विशेष उपयुक्त आहेत. जिरे मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या पोटदुखीवर आरामदायी ठरते. त्यामुळे ही पूड स्त्रियांसाठीही फायदेशीर ठरते.

या पुडीचा उपयोग चव वाढवण्यासाठी सूप, आमटी, भाजी, कढी, कोशिंबीर, आदीमध्ये केला जातो.  रात्रभर पाण्यात भिजवलेली धणे-जिरे पूड सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास शरीरातील उष्णता नियंत्रित होते व त्वचा उजळते. वजन कमी करण्यासाठी ही पूड फार फायदेशीर आहे. दिवसातून दोनदा तरी धणे-जिरे पाणी प्यावे. नक्कीच फायदा होतो. 

Web Title: healthy food tips, No matter how much delicious foods you eat, your digestion will improve, eat coriander-cumin powder every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.