Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!

Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!

Health Tips: चालणे हा उत्तम व्यायाम मानला जातो, पण त्यातही जपानी लोकांची चालण्याची पद्धत तुम्हाला रोगमुक्त ठेवेल असे वैज्ञानिक संशोधनात सिद्ध झाले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:25 IST2025-06-19T17:23:45+5:302025-06-19T17:25:31+5:30

Health Tips: चालणे हा उत्तम व्यायाम मानला जातो, पण त्यातही जपानी लोकांची चालण्याची पद्धत तुम्हाला रोगमुक्त ठेवेल असे वैज्ञानिक संशोधनात सिद्ध झाले आहे. 

Health Tips: 'This' Japanese technique will keep you away from diabetes, blood pressure, and heart disease! | Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!

Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!

रोज दहा हजार पावले चाला आणि तंदुरुस्त राहा असे डॉक्टर सांगतात. पण कित्येक वर्ष सातत्याने चालण्याचा सराव ठेवूनही पुरेसा फायदा होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. ही तक्रार रास्तही असू शकते. यावर उपाय म्हणून आता जपानी टेक्निकने चालून पहा. यात फार वेगळे काही करायचे नाही तर चालण्यात थोडासा फरक करायचा आहे. तो कसा करायचा आणि त्यामुळे कोणते फायदे होतात हे मधुमेह तज्ञ डॉ. रोहित साने यांच्याकडून जाणून घेऊ. 

या जपानी टेक्निकला इंटरव्हल वॉकिंग असे म्हणतात. इंटरव्हल अर्थात मध्यांतर! या शब्दावरून या टेक्निकचा खुलासा झाला असेल. नसेल झाला तर लक्षात घ्या, इंटरव्हल वॉकिंग करताना आपल्याला तीन मिनिटं वेगाने चालायचे आहे तर तीन मिनिटं नॉर्मल स्पीडने चालायचे आहे. असे चालून झाले की याच पद्धतीने आणखी पाच ते सहा राउंड पूर्ण करायचे. म्हणजेच जवळपास ३० ते ४० मिनिटांत जलद आणि माध्यम गतीने आलटून पालटून चालायचे आहे. 

इंटरव्हल वॉकींचे फायदे 

>> अशा प्रकारच्या चालण्याने आपली एनर्जी डाऊन होत नाही. उलट २० टक्क्यांनी वाढते. 
>> रक्तदाब आणि मधुमेह नैसर्गिकरित्या कमी होतो. 
>> तसेच वजन आणि चरबी कमी होण्यास मदत होते. 
>> रोग प्रतिकारशक्ती वाढते. 
>> रात्री छान झोप लागते. 

ही टेक्निक मध्ये ज्येष्ठ लोकांसाठी वरदान आहे. 

>> अभ्यासकांच्या मते, ज्येष्ठांनी जिम मध्ये जाऊन व्यायाम करण्यापेक्षा इंटरव्हल वॉकिंग केले तर ते रोगमुक्त, आजारमुक्त राहू शकतात. 
>> झोपेची, पचनाची समस्यां सुटते. 
>> शरीर हलते-फिरते राहते. 
>> थकवा येत नाही, ऊर्जा वाढते. 
>> कोणतेही उपकरण न वापरता हा व्यायाम सहज करता येतो. 
>> तसेच इतर व्यायामांसारखा या व्यायाम प्रकाराला जास्त वेळ द्यावा लागत नाही. 

म्हणून, वयोगट कोणताही असो, इंटरव्हल वॉकिंग प्रत्येकाने किमान अर्धा तास तरी केले पाहिजे. 


Web Title: Health Tips: 'This' Japanese technique will keep you away from diabetes, blood pressure, and heart disease!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.