अनेकदा कुटुंबातील सदस्य आणि डॉक्टर सल्ला देतात की, चांगल्या आरोग्यासाठी जास्त पाणी प्यायलं पाहिजे. त्यामुळे अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात पाणी पिण्याची सवय असते. तुम्हीही असं करत असल्यास तुमच्या शरीराचं खूप नुकसान होऊ शकतं. दिल्लीच्या एक्सपर्टने झोपण्यापूर्वी आपण किती पाणी प्यावं हे सांगितलं आहे. यासोबतच, जे लोक जास्त पाणी पितात त्यांना कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे देखील सांगितलं आहे.
आहारतज्ञ प्रियंका जयस्वाल १० वर्षांपासून लोकांना हेल्दी डाएटच्या टिप्स देत आहेत. त्याचवेळी त्यांना रात्रीच्या वेळी पाणी पिण्याबाबत विचारण्यात आलं असता त्या म्हणाल्या की, रात्रीच्या वेळी पाणी पिणं हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे, परंतु ते जास्त प्रमाणात प्यायल्यास लोकांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
- आहारतज्ञ प्रियंका यांनी सांगितलं की, अशाप्रकारे रात्री झोपण्यापूर्वी फक्त २ तास आधी हवं तितकं पाणी प्या. लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिऊ नये. कारण असं केल्याने तुमच्या झोपेच्या चक्रावर मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमचं आरोग्यही बिघडू शकते.
- ज्या लोकांना आधीच हृदयाशी संबंधित समस्या आहेत. त्यांनी झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणं देखील टाळावं. कारण जास्त पाणी प्यायल्यास त्याचा हृदयावर होणारा परिणाम गंभीर असू शकतो.
- ज्या लोकांची पचनशक्ती कमजोर असते, त्यांनी जर रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी प्यायलं तर पोटाशी संबंधित समस्या देखील वाढू शकतात.
- जे लोक रात्री जास्त पाणी पिऊन झोपतात. ते वारंवार वॉशरूमसाठी उठतात, त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या किडनीवरही दिसून येतो. त्यांना किडनीशी संबंधित अनेक समस्या असण्याचीही शक्यता असते.
- जर तुम्ही थंडीच्या दिवसात रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी प्यायलात तर तुम्हाला वारंवार लघवीची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे झोपेवर परिणाम होतो.