Join us

फोडणीतला कडीपत्ता फेकून देऊ नका, चावून खा! वजनही होईल कमी-त्वचा होईल तुकतुकीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2025 16:09 IST

5 Reasons To Chew Curry Leaves On An Empty Stomach Explained By The Expert : 5 reasons to chew curry leaves on an empty stomach : Chew These Leaves On An Empty Stomach For Health : Health Benefits and Uses Of Curry Leaves : बहुगुणी कडीपत्त्याची पाने दररोज सकाळी रिकाम्या पोटी चावून खाण्याचे अनेक फायदे....

आपल्या रोजच्या स्वयंपाकात हिरव्यागार कडीपत्त्याचा वापर आपण करतोच. कोणत्याही भाजी, आमटी, डाळीला फोडणी द्यायची म्हटलं की कडीपत्ता हवाच. कडीपत्त्याची पाने (Chew These Leaves On An Empty Stomach For Health) फक्त पदार्थांच्या चवीत भरच घालत नाहीत तर, आरोग्याच्या दृष्टीने औषधी आणि बहुगुणी देखील आहेत. खरंतर, आपल्यापैकी बरेचजण पदार्थांतील कडीपत्ता बाजूला काढून टाकतात. परंतु कडीपत्ता बाजूला (5 Benefits Of Eating Kadhi Patta Empty Stomach) काढून ठेवण्यापेक्षा तो दररोज खाणे अधिक फायदेशीर ठरते(Health Benefits and Uses Of Curry Leaves).

कडीपत्त्यामध्ये लोह, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई सारखे अनेक पोषक घटक असतात, जे शरीराला आतून डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात. कडीपत्ता फक्त वजन कमी करण्यासाठीच उपयुक्त नाही तर केस गळणे, पचन समस्या आणि मधुमेह यासारख्या आजारांमध्ये देखील उपयोगी ठरतो. याशिवाय, त्वचेला चमकदारपणा ( 5 reasons to chew curry leaves on an empty stomach) आणण्यासाठी आणि शरीरात उर्जेची भर घालण्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठीच, अशी बहुगुणी कडीपत्त्याची पाने दररोज सकाळी रिकाम्या पोटी चावून खाण्याचे अनेक फायदे आहेत, हे फायदे नेमके कोणते ते पाहूयात.. 

सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्ता चावून खाण्याचे फायदे... 

१. पचनसंस्था मजबूत होते :- कडीपत्त्याची पाने चावून खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते. कडीपत्त्याच्या पानांत असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स पोट स्वच्छ करण्यास मदत करतात. याचबरोबर, गॅस, बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्यांपासून आराम देतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्त्याची पाने चावून खाल्ल्याने अन्नाचे पचन चांगले होण्यास मदत करणारे एंजाइम अ‍ॅक्टिव्ह होतात. यामुळे तुम्हाला योग्य वेळी भूक लागते आणि तुमचे पोट हलके राहते. जर तुम्हाला वारंवार पोटदुखी किंवा गॅसची समस्या होत असेल तर तुमच्या रोजच्या डाएटमध्ये कढीपत्त्याच्या पानांचा समावेश करणे गरजेचे आहे. 

चालाल तर जगाल! डॉक्टर सांगतात, शुगर आणि वेटलॉससाठी किती वेळ चालावं? चालण्याचे मिळतील दुप्पट फायदे...

२. वजन कमी करण्यास फायदेशीर :- वेटलॉस करणाऱ्यांसाठी कडीपत्ता हा एक स्वस्त आणि मस्त असा उत्तम पर्याय आहे. सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्त्याची पाने चावून खाल्ल्याने शरीरातील चयापचय क्रियेचा वेग वाढतो. इतकेच नाही तर चरबी जाळण्याची प्रक्रिया सुधारते. कडीपत्त्यामध्ये असलेले फायबर पोट बराच काळ भरलेले ठेवते, ज्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. याशिवाय, ते शरीरातील विषारी घटक काढून टाकते, ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया नैसर्गिकरित्या सोपी होते. कडीपत्ता रोज खाल्ल्याने पोटाची चरबी कमी होण्यासही मदत होते.

३. केसांना जाड व मजबूत करण्यासाठी :- जर केस वारंवार गळत असतील, पांढरे होत असतील किंवा कमकुवत झाले असतील तर कडीपत्त्याची पाने चावून खाणे अधिक फायदेशीर ठरु शकते. कडीपत्त्याच्या पानांत असलेले बीटा-कॅरोटीन आणि प्रथिने केसांच्या मुळांना पोषण देतात. सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्त्याची पाने चावून खाल्ल्याने केस गळणे कमी होते आणि अकाली पांढरे होणे देखील थांबते. याशिवाय, स्काल्पची स्वच्छता देखील केली जाते ज्यामुळे कोंडा आणि खाज सुटणे यासारख्या समस्या दूर होतात व हळूहळू केसांना नैसर्गिक चमक येऊ लागते.

४. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास :- मधुमेह असलेल्या लोकांसाठी कडीपत्ता खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये असलेले फायबर आणि मधुमेहविरोधी गुणधर्म शरीरातील ग्लुकोजची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात. रिकाम्या पोटी कडीपत्त्याची पाने चावून खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी हळूहळू नियंत्रणात येते. 

वयाची पन्नाशी उलटली तरी मंदिरा बेदी दिसते तरुण! रोज न चुकता करते २ गोष्टी - पाहा तिचे फिटनेस रुटीन...

५. त्वचेला नैसर्गिक चमक येते :- कडीपत्ता खाल्ल्याने त्वचेचा रंग सुधारतो आणि मुरुमांची समस्या देखील कमी होते. त्यातील अँटिऑक्सिडंट घटक शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. तसेच, ते रक्त शुद्ध करते आणि ऍलर्जी किंवा खाज सुटणे यासारख्या त्वचेशी संबंधित समस्यांपासून आराम देते. दररोज रिकाम्या पोटी कडीपत्ता चावल्याने त्वचा हळूहळू निरोगी आणि चमकदार दिसू लागते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सब्यूटी टिप्सकेसांची काळजीत्वचेची काळजीवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स