Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गरम पाण्यात मध, रात्री दही खाणं घातक! आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, आजारांना आमंत्रण देणं सोडा..

गरम पाण्यात मध, रात्री दही खाणं घातक! आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, आजारांना आमंत्रण देणं सोडा..

Food Combinations to Avoid as per Ayurveda - check list : आयुर्वेदात खाण्या-पिण्याशी संबंधित अनेक नियम आहेत; कोणत्या गोष्टीसोबत काय खाऊ नये पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2024 01:05 PM2024-05-26T13:05:52+5:302024-05-26T13:06:42+5:30

Food Combinations to Avoid as per Ayurveda - check list : आयुर्वेदात खाण्या-पिण्याशी संबंधित अनेक नियम आहेत; कोणत्या गोष्टीसोबत काय खाऊ नये पाहा..

Food Combinations to Avoid as per Ayurveda - check list | गरम पाण्यात मध, रात्री दही खाणं घातक! आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, आजारांना आमंत्रण देणं सोडा..

गरम पाण्यात मध, रात्री दही खाणं घातक! आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, आजारांना आमंत्रण देणं सोडा..

आपण जेवताना किंवा नकळत अशा काही गोष्टी खातो (Ayurveda). ज्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी काही लोक सकाळी कोमट पाण्यात मध घालून पितात (Food Combinations). तर काही जण रात्रीच्या वेळेस दही खातात. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होणार नाही, असं आपल्याला वाटतं (Health Tips). पण खरंच चुकीच्या फूड कॉम्बिनेशनमुळे तब्येत बिघडू शकते का?

कोणते पदार्थ एकत्र खाणं योग्य नाही? आयुर्वेदनुसार कोणते पदार्थ एकत्र खाऊ नये, याची माहिती आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी दिली आहे. त्यांनी आयुर्वेदानुसार कोणत्या गोष्टी एकत्र खाऊ नये, याची माहिती शेअर केली आहे(Food Combinations to Avoid as per Ayurveda - check list).

बसल्या-बसल्या करा वजन कमी, जेवणानंतर फक्त १५ मिनिटं ‘असं’ बसा, पचनही सुधारेल

कोमट पाण्यात मध घालून पिणे

आयुर्वेदानुसार कोमट पाण्यात मध घालून पिणे हे विरुद्ध अन्न मानले जाते. शिवाय मध गरम करून खाऊ नये. मधामध्ये गोड, तुरट गुण असतात, जे शरीरातील कफ संतुलित ठेवतात. कोमट मध हे विष आहे, ज्यामुळे शरीरात एएमए किंवा विषारी घटक तयार होतात. याचे गुणधर्म शरीरात गेल्यावर विषामध्ये बदलते.

रात्रीच्या वेळेस जेवणासोबत दही

रात्रीच्या वेळेस शिवाय नुसतं दही खाऊ नये. यासंदर्भात, दीक्षा भावसर सांगतात, लठ्ठपणा, कफाचे विकार, रक्तस्रावाचे विकार आणि दाहक स्थिती असलेल्या लोकांनी रात्रीच्या वेळेस दही खाणे टाळणे उत्तम. त्यामुळे दिवसा दही खावे.

अन्नासह फळ खाणे

जेवणाच्या अर्धा ते एक तास आधी फळे खाल्ल्यास शरीराला भरपूर पोषण मिळते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र जेवणानंतर फळं खाल्ल्यास अन्नासोबत फळांच्या अतिरिक्त कॅलरीज शरीरातून निघून जातात, ज्यामुळे आरोग्याला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. अन्नासोबत फळं न खाणे आणि जेवल्यानंतरही लगेचं फळांचे सेवन न करणे हे उत्तम ठरते.

गरम पाण्याने केस धुणे

आयुर्वेदानुसार गरम पाण्याने केस धुतल्याने केस गळणे, केस पांढरे होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कोमट पाण्याने केस धुवू नये.

पाम तेल तब्येतीसाठी वाईट म्हणून वापरणं टाळता? ICMR म्हणते पाम तेल फायदेशीर; पण..

सायंकाळी ६ नंतर व्यायाम

सायंकाळपेक्षा सकाळी व्यायाम करणे उत्तम. आपण सकाळी वेळ नसेल तर, आपण सायंकाळी हलका व्यायाम करू शकता. परंतु, सायंकाळी जोमाने व्यायाम केल्याने कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन रिलीज करू शकतो. ज्यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकते. 

Web Title: Food Combinations to Avoid as per Ayurveda - check list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.