lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सारखं डोकं दुखतं, मायग्रेनचा त्रास होतो? बसल्या बसल्या १० मिनिटांत करा ४ व्यायाम, डोकेदुखी कमी करण्याचा सोपा उपाय...

सारखं डोकं दुखतं, मायग्रेनचा त्रास होतो? बसल्या बसल्या १० मिनिटांत करा ४ व्यायाम, डोकेदुखी कमी करण्याचा सोपा उपाय...

Easy Remedies for Headaches or Migraine : गोळ्या, औषधे खाण्यापेक्षा व्यायामाने मिळेल डोकेदुखीवर आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2022 12:57 PM2022-12-22T12:57:26+5:302022-12-22T13:02:57+5:30

Easy Remedies for Headaches or Migraine : गोळ्या, औषधे खाण्यापेक्षा व्यायामाने मिळेल डोकेदुखीवर आराम

Easy Remedies for Headaches or Migraine : Do you suffer from headaches, migraines? Do 4 exercises in 10 minutes of sitting, easy solution to reduce headache... | सारखं डोकं दुखतं, मायग्रेनचा त्रास होतो? बसल्या बसल्या १० मिनिटांत करा ४ व्यायाम, डोकेदुखी कमी करण्याचा सोपा उपाय...

सारखं डोकं दुखतं, मायग्रेनचा त्रास होतो? बसल्या बसल्या १० मिनिटांत करा ४ व्यायाम, डोकेदुखी कमी करण्याचा सोपा उपाय...

Highlightsडोकेदुखीसाठी औषधं घेण्यापेक्षा व्यायामाने मिळवा आरामडोकेदुखी सुरू झाली की काही सुधरत नाही, अशावेळी काय करावं याविषयी...

डोकं दुखणं ही अतिशय सामान्य समस्या असून त्यामागे बरीच कारणं असू शकतात. कधी अपचन किंवा अॅसिडीटी झाल्याने तर कधी डोळ्यांना जास्त ताण आल्याने डोकं दुखतं. काहीवेळा डोक्यातील विचार, जास्तीची दगदग अशा कारणांनीही डोकं दुखू शकतं. मायग्रेन ही तर डोकेदुखीची एक महत्त्वाची समस्या आहे. डोकेदुखी एकदा सुरू झाली की काय करावे सुधरत नाही. अशावेळी काम सुचत नाही की काहीच सुचत नाही. अशावेळी डोकेदुखी कमी करण्यासाठी बसल्या बसल्या १० मिनीटांत करता येतील असे सोपे उपाय पाहूया (Easy Remedies for Headaches or Migraine).

ही डोकेदुखी कमी करण्यासाठी काहीवेळा आपण मनानेच काही औषधे घेतो. पण त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. अशाप्रकारे औषधे घेणे आरोग्यासाठीही चांगले नसते. त्यापेक्षा डोकेदुखी कमी करण्यासाठी काही सोपे व्यायाम केले तर त्याचा नक्कीच उपयोग होतो. इन्स्टाग्रामवर साहिथी रेड्डी यांनी आपल्या योगा विथ साहिथी या इन्स्टाग्राम पेजवर काही सोपे व्यायामप्रकार सांगितले आहेत, ते कोणते पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

१. भुवया दाबा

पहिलं बोट आणि अंगठा अशा चिमटीत धरुन दोन्ही भुवया दाबा. असे ५ वेळा केल्यास दुखणारे डोके थांबण्यास त्याचा चांगला उपयोग होईल. 

२. कपाळाच्या बाजूला मसाज

डोळ्यांच्या बाजूला कपाळाच्या खालच्या बाजूला पहिल्या २ बोटांनी गोल फिरवून हलका मसाज करा. दोन्ही बाजूने मिळून १० वेळा फिरवा. 

३. भ्रामरी प्राणायाम

भ्रामरी हा प्राणायमातील अतिशय उपयुक्त प्रकार असून त्याने आपल्या डोक्याचे बरेचसे स्नायू रिलॅक्स व्हायला मदत होते. हाताची मधली बोटे कानात घालून ९ वेळा भ्रामरीचा प्रयोग करा. 

४.  प्राणायाम

एक हात छातीवर ठेवून दुसरा हात पोटावर ठेवा. आणि डोके वर खाली करुन श्वासोच्छवास करा. यामुळे डोक्यातले स्नायू रिलॅक्स होतील आणि कदाचित डोकेदुखी थांबू शकेल. 

 

Web Title: Easy Remedies for Headaches or Migraine : Do you suffer from headaches, migraines? Do 4 exercises in 10 minutes of sitting, easy solution to reduce headache...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.