Rujuta Diwekar Health Predictions for 2026 : नवीन वर्ष हे लोकांना अनेक गोष्टींकडे नव्याने बघण्याची नवी संधी देत असतं. त्यात आरोग्याचाही समावेश आहे. वाईट सवयी सोडणे, वजन कमी करणे आणि फिटनेस सुधारण्याची नवीन सुरूवात याचवेळी बरेच लोक करतात. अशात प्रसिद्ध सेलिब्रिटी डायटिशिअन ऋजुता दिवेकर यांनी २०२६ मध्ये आरोग्य आणि वजन घटवण्यासंबंधी तीन महत्वाच्या भविष्यवाणी केल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांचा हा फॉर्म्यूला वेगाने ट्रेंड होतो आहे. कारण यात सोप्या, वैज्ञानिक आणि चांगल्या विचाराचा संगम बघायला मिळत आहे.
ऋजुता दिवेकर यांचं मत आहे की, येणाऱ्या काळात लोक पुन्हा विश्वासार्ह रिसर्च आणि पारंपारिक विचाराकडे पुन्हा परततील. त्यानी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, विश्वसनिय वैज्ञानिक शोध हळूहळू जुन्या परंपरा आणि कॉमन सेन्सला बरोबर ठरवतील. याच कारणाने या वर्षात वजन कमी करणे आणि हेल्दी लाइफस्टाईलबाबत विचारात लोकांमध्ये मोठा बदल बघायला मिळेल.
पहिली भविष्यवाणी
पहिली भविष्यवाणी ऋजुता यांनी प्रोटीन ऑब्सेशनबाबत केली आहे. ऋजुता यांच्यानुसार, गेल्या काही वर्षांमध्ये प्रोटीनबाबत खूप जास्त क्रेझ बघायला मिळाली. त्या म्हणाल्या की, २०२६ मध्ये ही क्रेझ कमी होईल, कारण हळूहळू हे स्पष्ट होत चाललं आहे की, प्रमाणापेक्षा जास्त प्रोटीन घेतल्यानेही कोणताही अतिरिक्त फायदा होत नाही. फक्त विकणाऱ्यांना फायदा होतो. प्रोटीन शरीरासाठी आवश्यक आहेच, पण संतुलन सगळ्यात महत्वाचं असतं.
दुसरी भविष्यवाणी
ऋजुता यांच्यानुसार, पाश्चिमात्य देशांमध्ये आधीच मद्यसेवनाचं प्रमाण कमी होत आहे आणि २०२६ मध्ये हा ट्रेंड अधिक मजबूत होईल. जसजसे दारू पिण्याचे शरीरावर पडणारे नकारात्मक प्रभाव लोकांच्या लक्षात येतील, लोक दारूपासून दूर जाऊ लागतील. दारूमुळे वजन तर वाढतंच, सोबतच लिव्हर, हार्मोन बॅलन्स, झोप आणि मानसिक आरोग्यावर फार वाईट प्रभाव पडतो.
तिसरी भविष्यवाणी
तिसरी आणि सगळ्यात इंटरेस्टींग भविष्यवाणी वेटलॉस पिल्स म्हणजे वजन कमी करणाऱ्या गोळ्यांबाबत आहे. ऋजुता यांना असं वाटतं की, वजन कमी करणाऱ्या गोळ्यांबाबतची क्रेझ इतक्यात जाणार नाही. २०२६ मध्ये या गोळ्या अधिक जास्त विकल्या जाऊ शकतात. पण त्यांनी असाही इशारा दिला आहे की, ज्यांनी सुरूवातीला या गोळ्यांचा वापर केला, त्यांना साइड इफेक्ट्स दिसल्यावर त्यांनी गोळ्या घेणं बंद केलं. खासकरून मसल लॉस म्हणजे स्नायू कमजोर होण्याची समस्या होऊ शकते.
