अनेकांना असं वाटतं की, ज्या मुली नेहमी 'स्लिम' किंवा सडपातळ दिसतात, त्या तासनतास जिममध्ये घाम गाळत असतील किंवा उपाशी राहत असतील. पण वास्तव काही वेगळंच आहे. फिट राहणं हे केवळ वर्कआउटवर अवलंबून नसून, ते तुमच्या छोट्या-छोट्या दैनंदिन सवयींवर अवलंबून असतं.
'चेसिंग फॉक्सेस' (Chasing Foxes) नुसार, नेहमी फिट राहणाऱ्या मुलींच्या १२ खास सवयी खालीलप्रमाणे आहेत:
१. त्या 'माइंडफुल इटिंग' करतात
सडपातळ मुली जेवताना अन्नाचा आस्वाद घेतात. त्या टीव्ही किंवा मोबाईल बघत जेवत नाहीत, ज्यामुळे त्यांना पोट भरल्याची जाणीव लवकर होते आणि त्या 'ओव्हरईटिंग' टाळतात.
२. भरपूर पाणी पिणे
दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करणे आणि जेवणापूर्वी पाणी पिणे ही त्यांची महत्त्वाची सवय आहे. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि भूकही नियंत्रित राहते.
३. घरच्या जेवणाला पसंती
बाहेरचं जंक फूड खाण्याऐवजी त्या घरच्या साध्या, पण पौष्टिक अन्नाला प्राधान्य देतात. यामुळे अनावश्यक कॅलरीज पोटात जात नाहीत.
४. चालण्याची आवड
जिममध्ये न जाताही त्या सक्रिय राहतात. लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करणे किंवा जवळच्या अंतरासाठी चालत जाणे या त्यांच्या सवयी त्यांना फिट ठेवतात.
५. पुरेशी झोप
झोप पूर्ण न झाल्यास शरीरातील 'कॉर्टिसॉल' हा स्ट्रेस हार्मोन वाढतो, ज्यामुळे वजन वाढतं. फिट मुली नेहमी ७-८ तासांची गाढ झोप घेतात.
६. छोटे पण वारंवार जेवण
एकाच वेळी खूप जास्त जेवण्याऐवजी त्या थोड्या थोड्या अंतराने हेल्दी स्नॅक्स किंवा फळं खातात. यामुळे मेटाबॉलिझम (Metabolism) वेगवान राहतो.
७. साखर आणि कोल्ड ड्रिंक्स टाळणे
साखर हे वजन वाढवण्याचं मुख्य कारण आहे. स्लिम राहणाऱ्या मुली चहा-कॉफीमध्ये साखर कमी घेतात आणि पॅकेज्ड ज्यूस किंवा सोडा पूर्णपणे टाळतात.
८. ताणतणावावर नियंत्रण
जास्त ताण घेतल्याने शरीरात चरबी साठते. फिट राहणाऱ्या मुली योगा, ध्यान किंवा त्यांच्या छंदाद्वारे स्वतःला तणावमुक्त ठेवतात.
९. नाश्ता कधीही स्किप न करणे
सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार आहे. तो घेतल्यामुळे दुपारच्या जेवणात जास्त खाण्याची इच्छा होत नाही.
१०. प्रोटिनयुक्त आहार
त्यांच्या आहारात डाळी, अंडी किंवा पनीर यांसारख्या प्रथिनांचा समावेश जास्त असतो, ज्यामुळे स्नायू मजबूत राहतात आणि चरबी कमी होते.
११. रात्रीचे जेवण हलके आणि लवकर
झोपण्यापूर्वी किमान २-३ तास आधी त्या जेवतात. रात्रीचे जेवण नेहमी हलके असते, जेणेकरून पचन संस्था नीट कार्य करू शकेल.
१२. 'इमोशनल इटिंग' टाळणे
राग आलाय किंवा कंटाळा आलाय म्हणून काहीतरी खाणे, ही सवय त्या स्वतःला लावून घेत नाहीत. त्या फक्त भूक लागल्यावरच खातात.
