कैरीचा चीक उभारून ओठांजवळ, गालावर जखमा होण्याचा अनुभव बहुतांश लोकांनी नक्कीच घेतलेला असतो. आता कैरी जशी सुरुवातीला आंबट आणि नंतर आंबा झाल्यावर गोड असते, तसाच तिचा आंबट- गोड अनुभव म्हणजे तिचा चीक उभारणे. कैरी आपण धुवूनच खातो. पण तरीही कधी कधी फोड खाताना कैरीच्या देठाकडचा भाग ओठाला किंवा आजुबाजुच्या भागाला लागतो आणि चीक उभारतो. त्यानंतर मग त्या भागात जखम होते आणि त्रासही खूप हाेतो. हा त्रास कमी करण्यासाठी पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा..
कैरीचा चीक गालांवर उभारल्यास काय करावे?
कैरीचा चीक उभारल्यानंतर तो भाग रक्ताळून जातो आणि जेवणे, हसणे, बोलणे अशा प्रत्येकवेळी तोंड उघडताना तिथे प्रचंड त्रास होतो. त्यामुळे जर चीक उभारला असेल तर पुढील पद्धतीने काळली घ्या आणि ती जखम लवकर बरी करा..
ऐन तारुण्यात मुलामुलींच्या पाठीला बाक-खांदे झुकलेत, १ मिनिटांचे सोपे व्यायाम-पाठीचा कणा होईल ताठ
१. फ्रिजमधले थंडगार दूध किंवा साय त्या भागावर दिवसातून ३ ते ४ वेळा लावा. यामुळे जखम लवकर बरी होण्यास मदत होते.
२. जर खूप जळजळ, आग होत असेल तर सहानीवर चंदनाचे खोड उगाळून घ्या आणि तो लेप जखमेवर लावा. थंड वाटेल आणि दाह कमी होईल.
३. कोरफड कापून घ्या. त्यानंतर ती अर्धा तास तशीच ठेवा. तिच्यातला पिवळट, चिकट थर गेल्यानंतर ती धुवा आणि मग जखमेवर लावा. जखमेच्या ठिकाणी थंड वाटेल आणि खाज येणार नाही.
कैरी खाताना काय काळजी घ्यावी?
कैरीचा चीक उभारण्याचे कारण म्हणजे ती खाताना आपण पुरेशी काळजी घेतलेली नसते. त्यामुळे कैरी झाडाची तोडून आणल्या आणल्या लगेच खाणे टाळावे.
अधिक मास: स्टीलचंच ताट कशाला? जावयाला नव्या पद्धतीच्या सुंदर तबकात द्या वाण, लेकही होईल खुश
सगळ्यात आधी कैरी एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यात अर्धा तास भिजत घालावी. त्यानंतर तिच्या देठाकडचा भाग पुर्णपणे कापून टाकावा. देठाच्या आजुबाजुचा भागही कापावा. आणि त्यानंतरच ती खावी. आंबा खातानाही हीच काळजी घ्यावी. नाहीतर त्याचा चीकही उभारू शकतो.
Web Summary : Mango sap causing sores? Applying cold milk/cream, sandalwood paste, or aloe vera provides relief. Wash mangoes thoroughly, cut off the stem end completely to prevent sap contact and irritation.
Web Summary : आम के रस से छाले हो रहे हैं? ठंडा दूध/क्रीम, चंदन का लेप या एलोवेरा लगाने से राहत मिलती है। आम को अच्छी तरह धोकर डंठल वाला भाग पूरी तरह से काट दें ताकि रस के संपर्क और जलन से बचा जा सके।