लहानपणी राकेश बापटला डिस्लेक्सिया या आजाराचा सामना करावा लागलो होता बिग बॉसच्या घरात तो प्राजक्ताला म्हणाली की, ''मी लहान असताना डिस्लेक्सिया (Dyslexia Disease) या आजारातून गेलो होतो. तारे जमीन पर मधल्या मुलासारखा होतो. मी खूप वर्ष शाळेत तोंडी परिक्षा दिली होती. शब्द वाचायला जायचो तर शब्द उडायचे सगळे. आताही स्क्रिप्ट वाचताना दुसऱ्या ओळीतच मला गोंधळायला होतं. नंतर मी कलेतून एक्सप्रेस करायला शिकलो.'' या निमित्तानं डिस्लेक्सिया हा आजार पुन्हा चर्चेत आला आहे. हा आजार नेमका काय या आजाराची लक्षणं काय असतात. हा आजार कसा बरा होतो समजून घेऊ. (Bigg Boss Marathi 6 Raqesh Bapat Suffers With Dyslexia In Childhood)
डिस्लेक्सिया म्हणजे काय? (What Is Dyslexia)
डिस्लेक्ससिया हा गंभीर स्वरूपाचा आजार नसून मेंदूतील रचनेतील फरकामुळे उद्भवणारी एक शिक्षणविषयक अडचण आहे. यामुळे मुलांच्या बुद्धीमत्तेवर परिणाम होत नाही. परंतू त्यांना शब्द वाचणं, लिहिणं, उच्चार समजून घेणं. या गोष्टींसाठी त्रास होतो.
लक्षणं काय आहेत?
वाचताना अडचणे येते. अक्षरं किंवा शब्द ओळखण्यात समस्या येतात. वाचताना ओळी गाळणं किंवा शब्दांची अदलाबदल करणं.लेखनातील चुका जसं की बी, डी, पी, क्यू यांसारख्या दिसणाऱ्या अक्षरांमध्ये गोंधळ होतो. शब्दांमधील अक्षरांचा क्रम उलट सुटल लिहिणं. उच्चार आणि स्पेलिंग लक्षात ठेवणं कठीण जातं. यमक जुळणारे शब्द ओळखायला त्रास होतो.
हळूवार आकलन होतं. जसं की वाचलेला मजकूर समजण्यासाठी जास्त वेळ लागतो. दिशा ओळखण्यात त्रास होतो जसं की डावा, उजवा किंवा गणिताची चिन्ह समजून घेण्यात त्रास होतो.
ही स्थिती कशामुळे उद्भवते
जर कुटूंबात पालकांना किंवा जवळच्या नातेवाईकांना हा त्रास असेल तर मुलांमध्ये हा आजार होण्याची शक्यता असते. संशोधनानमुसार डिस्लेक्सिया असलेल्या व्यक्तींचा मेंदू भाषेवर प्रकिया करण्यासाठी सामान्य व्यक्तीच्या तुलनेत वेगळ्या भागांचा वापर करतो.
यावर उपाय काय
ही अशी स्थिती आहे जी पूर्णपणे बरी करण्यासाठी कोणतंही औषध नाही. कारण हे आजारपण नसून एक स्थिती आहे. मात्र योग्य शिक्षण पद्धती आणि सरावाच्या मदतीनं ही मुलं प्रगती करू शकतात.
