lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रिकाम्या पोटी तुळशीची पानं खाल्ल्यानं मिळतील हे ५ फायदे; हिवाळ्यात चांगल्या तब्येतीचा सोपा फंडा

रिकाम्या पोटी तुळशीची पानं खाल्ल्यानं मिळतील हे ५ फायदे; हिवाळ्यात चांगल्या तब्येतीचा सोपा फंडा

Benefits of Tulsi (Basil) Leaves : तणावाशी संबंधित समस्यांवरही तुळशीची पानं गुणकारी मानली जातात. या पानांमध्ये असलेले अॅडाप्टोजेन मानसिक तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 12:06 PM2021-12-07T12:06:04+5:302021-12-07T12:39:00+5:30

Benefits of Tulsi (Basil) Leaves : तणावाशी संबंधित समस्यांवरही तुळशीची पानं गुणकारी मानली जातात. या पानांमध्ये असलेले अॅडाप्टोजेन मानसिक तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

Benefits of Tulsi (Basil) Leaves : 5 benefits of consuming tulsi leaves every day on empty stomach | रिकाम्या पोटी तुळशीची पानं खाल्ल्यानं मिळतील हे ५ फायदे; हिवाळ्यात चांगल्या तब्येतीचा सोपा फंडा

रिकाम्या पोटी तुळशीची पानं खाल्ल्यानं मिळतील हे ५ फायदे; हिवाळ्यात चांगल्या तब्येतीचा सोपा फंडा

हिवाळ्यात अनेकांना सर्दी, खोकल्याच्या त्रासाचा सामना करावा लागतो. गुणकारी तत्वांनी भरपूर असलेल्या तुळशीच्या पानांचा उपयोग वेगवेगळ्या आजारांच्या उपचारांसाठी केला जातो.  तुळशीतील एंटी फंगल, एटी बॅक्टेरिअल प्रॉपर्टीज इम्यून सिस्टिमसाठी चांगल्या ठरतात. तुळशीच्या पानांचे रोज सेवन केल्यानं त्वचासुद्धा दिवसेंदिवस अधिकच  ग्लोईंग दिसते. इतकंच नाही तर तुळशीच्या सेवनानं एजिंग प्रक्रिया मंद होते. म्हणूनच तुम्हाला तुळशीच्या पानांच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. (Benefits of  Tulsi Leaves)

मेटाबॉलिज्म

तुळसीची पानं आपल्या पोटासाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे मेटाबॉलिज्म सिस्टिम दुरुस्त होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त तुळशीची पानं गॅस एसिडीटीसारख्या डाएजेशन डिसॉर्डरपासूनही आराम मिळवून देतात. 

बॉडी डिटॉक्सीफिकेशन

तुळशीच्या पानांमध्ये बॉडी डिटॉक्स करण्याची क्षमता  असते. याचे गुणकारी तत्व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. 

तोंडातील बॅक्टेरियांपासून आराम

तुळशीच्या पानांमधील पोषक तत्व तोंडात लपलेल्या बॅक्टेरियांना नष्ट करण्यास प्रभावी ठरतात. त्यामुळे तुळशीच्या पानांच्या सेवनानं श्वास घेतल्यास ताजंतवानं वाटते. 

वजन घटवण्यासाठी रोज चालायला जाताय? आधी या ८ सवयी बदला झटपट मिळेल रिजल्ट

खोकला-सर्दी

हिवाळ्याच्या दिवसात सर्दी, खोकल्याची समस्या जाणवणं कॉमन आहे. अशा स्थितीत आजारांपासून दूर राहण्यासाठी  तुम्ही तुळशीची पानं चघळलीत तर नक्कीच फायदा होईल. तुम्ही काढा  किंवा चहामध्ये तुळशीच्या पानांचा वापर करू शकता. 

ताण तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर

तणावाशी संबंधित समस्यांवरही तुळशीची पानं गुणकारी मानली जातात. या पानांमध्ये असलेले अॅडाप्टोजेन मानसिक तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

Web Title: Benefits of Tulsi (Basil) Leaves : 5 benefits of consuming tulsi leaves every day on empty stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.