Lokmat Sakhi >Fitness > Weight Lose Tips : वजन घटवण्यासाठी रोज चालायला जाताय? आधी या ८ सवयी बदला झटपट मिळेल रिजल्ट

Weight Lose Tips : वजन घटवण्यासाठी रोज चालायला जाताय? आधी या ८ सवयी बदला झटपट मिळेल रिजल्ट

Weight Lose Tips : तुम्ही जर वजन झपाट्याने कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 11:55 AM2021-12-05T11:55:09+5:302021-12-05T11:59:50+5:30

Weight Lose Tips : तुम्ही जर वजन झपाट्याने कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे.

Weight Lose Tips : Ayurveda expert guides how to swap out 8 bad habits for weight loss | Weight Lose Tips : वजन घटवण्यासाठी रोज चालायला जाताय? आधी या ८ सवयी बदला झटपट मिळेल रिजल्ट

Weight Lose Tips : वजन घटवण्यासाठी रोज चालायला जाताय? आधी या ८ सवयी बदला झटपट मिळेल रिजल्ट

वजन कमी करण्यासाठी लोक खूप मेहनत करतात हे तुम्ही पाहिलं असेल. विशेषत: व्यायाम आणि आहार याबाबत खूप काळजी घेणे. पण तरीही वजन कमी करणे हे त्यांच्यासाठी आव्हान आहे. कारण त्यासाठी समर्पण आणि सातत्य आवश्यक आहे, जे प्रत्येकासाठी नाही. परंतु तुम्हाला हे माहित असले पाहिजे की केवळ व्यायाम आणि आहार तुमचे वजन कमी करण्यास मदत करत नाही तर काही जीवनशैली घटक देखील खूप प्रभावी असू शकतात. (How to lose weight faster)

तुम्ही जर वजन झपाट्याने कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यांनी इन्स्टाग्रामवर असे काही पर्याय दिले आहेत, जे वजन कमी करण्याच्या बाबतीत गेम चेंजर म्हणून काम करू शकतात.

साखरेऐवजी गुळाचा वापर करा

वजन कमी करण्यासाठी साखर टाळण्याबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल. हे खरं आहे. कारण पांढऱ्या साखरेत कॅलरीज नसतात, तर गुळात भरपूर पोषक असतात. त्यामुळे जेवणात साखरेऐवजी गूळ वापरण्याची सवय लावा.

थंड पाण्याऐवजी गरम पाणी 

वजन कमी करू पाहणाऱ्यांसाठी थंड पाणी शत्रू आहे. त्यामुळे जे लोक वजन कमी करण्याचा विचार करत आहेत, त्यांनी प्रथमच थंड पाण्याऐवजी गरम पाण्याचे सेवन सुरू करावे. वास्तविक, गरम पाणी तुमच्या पाचक अग्नी प्रज्वलित करण्यास मदत करते आणि ते चांगले ठेवते. इतकंच नाही तर ते चयापचय सुधारण्यासाठीही चांगलं आहे, यामुळे पोटाचे त्रासही कमी होतात.

रात्री लवकर झोपा

तुम्ही झोपत असताना, तुमचे यकृत डिटॉक्सिफाई होते त्यामुळे रात्री उशिरा झोपल्याने वजन कमी होण्यास जास्त वेळ लागू शकतो. आयुर्वेदानुसार, जर तुम्हाला खूप लवकर वजन कमी करायचे असेल तर रात्री 10 वाजण्यापूर्वी झोपण्याचा प्रयत्न करा.

उशीरा जेवू नका

सूर्यास्तानंतर चयापचय खूप मंदावते. त्यामुळे रात्रीचे जेवण लवकरात लवकर घ्या आणि रात्रीचे जेवण हलकं असेल असं पाहा. वजन कमी करताना रात्री उशिरा जेवल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे रात्री ८ वाजण्यापूर्वी अन्न खाण्याची सवय लावा.

फळांचा रस नाही तर फळं खायची सवय लावा

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांनी फळांच्या रसाऐवजी फळे खावीत. कारण जेव्हा तुम्ही फळांच्या रसाचे सेवन करता तेव्हा त्यातील फायबर जवळजवळ कमी होते आणि द्रव असल्यामुळे तुम्ही ते अधिक प्रमाणात पिता. पण जेव्हा तुम्ही फळे चघळता तेव्हा त्यांचे पचन तुमच्या तोंडातच सुरू होते आणि फायबरही टिकून राहते. त्यामुळे आयुर्वेदानुसार फळांचा रस पिण्यापेक्षा वजन कमी करण्यासाठी ताजी फळे खाणे चांगले.

शारीरिक हालचाल

अनेकांना असे वाटते की वजन कमी करण्यासाठी दररोज 5000-10000 पावले चालणे पुरेसे आहे. पण ते तसे नाही. त्यापेक्षा दिवसभर सक्रिय राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आयुर्वेदानुसार, शरीराची हालचाल क्रियाशीलता, लवचिकता आणि रक्त परिसंचरण सुधारते.

रोज व्यायाम करायला हवा

 वजन कमी करण्यासाठी चांगली झोप, तणाव व्यवस्थापन आणि निरोगी अन्न निवडीसोबत व्यायाम करणे हा एक चांगला मार्ग आहे. त्यामुळे स्वतःला सक्रिय ठेवा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही योग, चालणे, जॉगिंग, सायकलिंग, HIIT आणि पोहणे यासारख्या पद्धतींचा अवलंब करू शकता. येथे नमूद केलेल्या पद्धतींना तुमच्या जीवनशैलीचा एक भाग बनवा आणि मग पहा तुम्ही किती जलद आणि निरोगी वजन कमी करू शकाल.

दुपारी पोटभर जेवा

फक्त वजन कमी करण्यासाठी दुपारचे जेवण वगळण्याची चूक करू नका. कारण सकाळी 10 ते दुपारी 2 हा मध्यम ते जड जेवण खाण्याची उत्तम वेळ आहे. यावेळी चयापचय खूप चांगले आहे. त्यामुळे दुपारचे जेवण न वगळता  चांगले आणि आरोग्यदायी अन्न खाणं तब्येतीला चांगलं ठरतं. 

Web Title: Weight Lose Tips : Ayurveda expert guides how to swap out 8 bad habits for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.