Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वाढत्या वयामुळे विसराळूपणा वाढत चाललाय? रोज खा ५ पैकी एक गोष्ट-स्मरणशक्ती वाढेल, राहाल फिट

वाढत्या वयामुळे विसराळूपणा वाढत चाललाय? रोज खा ५ पैकी एक गोष्ट-स्मरणशक्ती वाढेल, राहाल फिट

5 Best Foods to Boost Your Brain and Memory : शरीर थकेल पण मेंदू राहील कायम फिट, पाहा मेंदूला तीक्ष्ण करणारे ५ पदार्थ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2024 05:12 PM2024-01-19T17:12:12+5:302024-01-19T17:13:39+5:30

5 Best Foods to Boost Your Brain and Memory : शरीर थकेल पण मेंदू राहील कायम फिट, पाहा मेंदूला तीक्ष्ण करणारे ५ पदार्थ..

5 Best Foods to Boost Your Brain and Memory | वाढत्या वयामुळे विसराळूपणा वाढत चाललाय? रोज खा ५ पैकी एक गोष्ट-स्मरणशक्ती वाढेल, राहाल फिट

वाढत्या वयामुळे विसराळूपणा वाढत चाललाय? रोज खा ५ पैकी एक गोष्ट-स्मरणशक्ती वाढेल, राहाल फिट

आपण लहान असो किंवा मोठे, प्रत्येकाला कुशाग्र मनाची गरज असते. मेंदू (Brain health) तीक्ष्ण चालत असेल तर, आपल्या आयुष्यात सर्वच गोष्टी बर्यापैकी होतात. आहाराचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यामुळे निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आहार घेणं गरजेचं आहे. बरेच जण मेंदू तल्लख व्हावे यासाठी निरनिराळे पदार्थ खातात.

मुख्य म्हणजे फक्त बदाम खाल्ल्यानेच बुद्धी वाढते, असं काहींचं म्हणणं आहे. पण फक्त बदाम नाही, तर इतरही पदार्थांचा मनावर आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो (Health Tips). वय वाढलं की, विसराळूपणा वाढत जातो. पण जर मेंदू तीक्ष्ण राहावे, शिवाय स्मरणशक्ती वाढावी असे वाटत असेल तर, आजपासूनच ५ पदार्थ खायला सुरुवात करा(5 Best Foods to Boost Your Brain and Memory).

अक्रोड

एनसीबीआयच्या अभ्यासानुसार, मेंदू तीक्ष्ण चालावे असे वाटत असेल तर, नियमित अक्रोड खा. अक्रोड खाल्ल्याने मेंदूतील रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे ऑक्सिजन आणि इतर पौष्टीक घटक मेंदूपर्यंत सहज पोहचतात. याशिवाय अक्रोडमध्ये असलेले एल-कार्निटाइन मेंदूचे कार्य सुधारते. जर आपण नियमित अक्रोड खात असाल तर, स्मरणशक्ती तर वाढेलच, शिवाय तणाव देखील कमी होऊ शकते.

गायीचं की म्हशीचं? हाडांच्या बळकटीसाठी कोणतं दूध चांगलं? कॅल्शियम कशातून जास्त मिळते?

डार्क चॉकलेट

लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला चॉकलेट्स आवडतात. पण डार्क चॉकलेट खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढू शकते. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स आढळते. ज्यामध्ये न्यूरोप्रोटेक्टिव्ह पॉवर असते. यामुळे वय जरी वाढलं तरी, स्मरणशक्ती कमी होत नसून, वाढत जाते. शिवाय विसराळूपणा देखील कमी होते.

पालक

पालक विशेषतः मेंदूसाठी चांगले मानले जाते. पालकामध्ये ब जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, फोलेट आणि एल-टायरोसिन असतात. हे पौष्टीक घटक स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. यासह मानसिक स्थिती सुधारण्यासही मदत करते. हिवाळ्यात पालक मोठ्या प्रमाणात मिळतात. आपण पालकाचे ज्यूस, पराठा किंवा भाजी तयार करून खाऊ शकता.

व्हिटॅमिन ई

मेंदूला व्हिटॅमिन ई ची आवश्यकता असते. हे एक अँटीऑक्सिडंट आहे जे फ्री रॅडिकल्स नष्ट करण्यात मदत करते. जर फ्री रॅडिकल्स वाढेल तर, ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढू लागते. या प्रकारचा ताण डिमेंशियासह अनेक आजारांना कारणीभूत ठरते.

अनिल कपूरच्या चिरतारुण्याचं सिक्रेट काय? स्वत: अनिल कपूरनेच सांगितला सोपा-स्वस्त डाएट प्लॅन

नासलेल्या दुधाचा खवा

जेव्हा दूध नासते तेव्हा त्यातील पाणी आटवून, खवा तयार केला जातो. हा खवा मेंदू आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. खवा पोटातील हेल्दी माइक्रोब्स सुधारते. ज्याचा थेट सकारात्मक परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो. यामुळे संज्ञानात्मक कार्यक्षमता वाढते आणि वृद्धापकाळातही स्मरणशक्ती अबाधित राहते.

Web Title: 5 Best Foods to Boost Your Brain and Memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.