lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health > तुपात अन्न शिजवल्यास आजारांपासून राहाल लांब; इम्‍यूनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदाच्या खास टीप्स

तुपात अन्न शिजवल्यास आजारांपासून राहाल लांब; इम्‍यूनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदाच्या खास टीप्स

Increase immunity : तुपात अन्न शिजवण्याचा एक फायदा म्हणजे तेलांमुळे आरोग्यास होणार्‍या धोक्यांपासून बचाव करण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 11:53 AM2021-05-19T11:53:44+5:302021-05-19T12:02:18+5:30

Increase immunity : तुपात अन्न शिजवण्याचा एक फायदा म्हणजे तेलांमुळे आरोग्यास होणार्‍या धोक्यांपासून बचाव करण्यास मदत होते.

Increase immunity for covid-19 follow ayurvedic tips drink hot water and make food in ghee | तुपात अन्न शिजवल्यास आजारांपासून राहाल लांब; इम्‍यूनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदाच्या खास टीप्स

तुपात अन्न शिजवल्यास आजारांपासून राहाल लांब; इम्‍यूनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदाच्या खास टीप्स

Highlightsतुपात अन्न शिजवण्याचा एक फायदा म्हणजे तेलांमुळे आरोग्यास होणार्‍या धोक्यांपासून बचाव करण्यास मदत होते.

कोरोनाच्या माहामारीत लोक स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी रोगप्रतिराकशक्ती वाढवण्याकडे लक्ष देत आहेत. अशा स्थितीत आयुर्वेदाचा एकच सिद्धांत आहे. तो म्हणजे आजारांशी लढण्यासाठी योग्य उपायांचा अवलंब करणं.  संसर्गजन्य आजारांना लांब ठेवण्यासाठी शरीर आणि मन नेहमी पवित्र असायला हवं. सध्या  आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी लोक आयुर्वेदावर  विश्वास ठेवू लागले आहेत. 

Medy365.com चे सीईओ श्रेयांश जैन यांनी सांगितले की, कोरोनाशी लढण्यासाठी  इम्यूनिटी चांगली असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुळस,  आलं, गुळवेलासह अन्य जडी बुटींच्या सेवनाचा सल्ला दिला जात आहे. आयुर्वेद इम्यूनिटी मजबूत करण्यासाठी एक चांगला उपाय आहे. इम्यूनिटी वाढवण्यासाठी आर्युर्वेदाचा फॉर्म्यूला कसा वापरता येईल याबाबत आम्ही सांगणार आहोत.

आयुर्वेदानुसार, प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारच्या दोषांनी बनलेला असतो. जसे की वात, पित्त आणि कफ. हे त्रिदोष म्हणून ओळखले जाते. हे मनाची आणि शरीराची स्थिती निश्चित करते. जेव्हा तिन्ही दोष संतुलित असतात, तर शरीर निरोगी राहते. याच्या असंतुलनामुळे व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता असते. आयुर्वेदानुसार वात असलेल्या लोकांनी गरम आणि पौष्टिक आहार घ्यावा. पित्त असलेल्या लोकांनी दूध, धान्य आणि भाज्या सोबतच आणि ताजे पदार्थ खाणे चांगले ठरेल. त्यांनी खारट, तळलेले आणि पचायला जड असे पदार्थ टाळावे. याव्यतिरिक्त, कफ दोष असलेल्या लोकांनी मसालेदार आणि गरम अन्न खावे.

आयुर्वेदिक काढ्याचे सेवन

शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढा एक चांगला मार्ग आहे. हे औषधी वनस्पती आणि पाण्यात उकडलेले मसाले यांचे मिश्रण आहे.  हळद, तुळस, आले, मिरपूड, लवंगा यात एंटी-इंफ्लेमेटरी, एंटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. ते शरीराची संरक्षण प्रणाली वाढवतात. कोरोनाव्हायरस साथीच्या वेळी, स्वत: ला निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून एकदा कमी प्रमाणात काढ्याचे सेवन करणं आवश्यक आहे. 

तुपात शिजवलेलं अन्न खाणं

फॅटी एसिडस् आणि एंटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले तूप आपले आरोग्यासाठी चांगले आहे. तूपात ब्यूटेरिक एसिडचे अस्तित्व कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवते. चरबीयुक्त ऊतक कमी करते, प्रतिकारशक्तीसह निरोगी कोलेस्ट्रॉल वाढवते. ज्यामुळे व्यक्ती ऊर्जावान होते. तुपात अन्न शिजवण्याचा एक फायदा म्हणजे तेलांमुळे आरोग्यास होणार्‍या धोक्यांपासून बचाव करण्यास मदत होते.

ध्यान करून  ताण तणाव कमी करा

व्यस्त दिनक्रमात मानसिक ताण रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम करतो. ध्यान केल्यानं ताण कमी करण्यात खूप मदत होते. मनाचे आणि शरीराचे आरोग्य राखण्यासाठी ध्यान करणं उत्तम ठरतं.  आयुर्वेदानुसार योग हा शारीरिक श्वासोच्छवासासाठीच नव्हे तर मनाला शांत करण्यासाठी देखील एक चांगला मार्ग आहे. वर नमूद केलेल्या आयुर्वेदिक पद्धतींचा अवलंब केल्याने तुमचे मन केवळ शांतच राहणार नाही रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यास मदत होईल.

याशिवाय आयुष मंत्रालयानं सगळ्यांनाच गरम पाणी पिण्याचा सल्ला दिली आहे. दिवसभरातून जास्तीत जास्तवेळा गरम पाणी पिण्याचा प्रयत्न करायला हवा.  गरम पाण्यात चुटकीभर मीठ आणि हळद घालून तुम्ही गुळण्या करू शकता. घरी तयार केलेलं जेवण खाण्याचा प्रयत्न करा. कारण असं जेवण पचायला हलकं असेल. खाण्यात हळद, जीरं, धणे, आलं, लसूण यांसारख्या मसाल्यांचा वापर करा. याशिवाय तुम्ही आवळ्याचा समावेशही आहारात करू शकता.

आयुश नॅशनल क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल्सनुसार कमीत कमी ३० मिनिटं योगा किंवा प्राणायम करायला हवं. याव्यतिरिक्त चांगली झोप घ्या. दिवसा न झोपता रात्री ७ ते ८ तासांची झोप घ्या. इम्यूनिटी वाढवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी २० ग्राम व्यवनप्राश रिकाम्या पोटी घ्या. हळद घातलेल्या दुधाचे सेवन करा. याव्यतिरिक्त गुडूची घनवटी ५०० मिलिग्राम, अश्वगंधा गोळी ५०० मिलिग्राम दिवसातून दोनवेळा गरम पाण्यासोबत खायला हवी.

पुदीन्याची पानं, ओवा आणि कापूर घालून वाफ घ्या. दिवसातून एकदा नक्कीच वाफ घेणं फायद्याचं ठरेल. लक्षात ठेवा जास्त गरम पाण्यानं वाफ घेऊ नका, कारण यामुळे त्वचेला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. लवंग, साखर, मध एकत्र करून दिवसातून दोन ते तीनवेळा घेतल्यानं खोकला आणि कफपासून आराम मिळेल.

Web Title: Increase immunity for covid-19 follow ayurvedic tips drink hot water and make food in ghee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.