सुमोना चक्रवर्तीला १० वर्षांपासून एंडोमेट्रियोसिसचा त्रास; वाचा महिलांसाठी घातक ठरणाऱ्या आजाराची लक्षणं, उपाय - Marathi News | Sumona Chakraborty suffering from endometriosis know the symptoms and remedies of the disease | Latest sakhi News at Lokmat.com
>आरोग्य > प्रसूतीप्रश्न > सुमोना चक्रवर्तीला १० वर्षांपासून एंडोमेट्रियोसिसचा त्रास; वाचा महिलांसाठी घातक ठरणाऱ्या आजाराची लक्षणं, उपाय

सुमोना चक्रवर्तीला १० वर्षांपासून एंडोमेट्रियोसिसचा त्रास; वाचा महिलांसाठी घातक ठरणाऱ्या आजाराची लक्षणं, उपाय

Endometriosis symptoms : २०११ पासून सुमोना एंडोमेट्रियोसिस या आजाराने ग्रस्त आहे. हा आजार नेमका काय आहे? महिलांमध्ये कोणती लक्षणं दिसून येतात. याबाबत आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 01:03 PM2021-05-17T13:03:46+5:302021-05-17T13:17:37+5:30

Endometriosis symptoms : २०११ पासून सुमोना एंडोमेट्रियोसिस या आजाराने ग्रस्त आहे. हा आजार नेमका काय आहे? महिलांमध्ये कोणती लक्षणं दिसून येतात. याबाबत आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत

Sumona Chakraborty suffering from endometriosis know the symptoms and remedies of the disease | सुमोना चक्रवर्तीला १० वर्षांपासून एंडोमेट्रियोसिसचा त्रास; वाचा महिलांसाठी घातक ठरणाऱ्या आजाराची लक्षणं, उपाय

सुमोना चक्रवर्तीला १० वर्षांपासून एंडोमेट्रियोसिसचा त्रास; वाचा महिलांसाठी घातक ठरणाऱ्या आजाराची लक्षणं, उपाय

Next

'द कपिल शर्मा शो'मध्ये भुरीची भूमिका साकारणारी सुमोना चक्रवर्ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. अलिकडेच तिनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरून तिच्या आजाराबाबत खुलासा केला आहे. पोस्ट शेअर करत तिने जॉबलेस असल्याचे सांत गेल्या काही वर्षापासून ती एका आजाराचा सामना करत असत्याचे म्हटले आहे. २०११ पासून सुमोना एंडोमेट्रियोसिस या आजाराने ग्रस्त आहे. २०११ पासून सुमोना एंडोमेट्रियोसिस या आजाराने ग्रस्त आहे. हा आजार नेमका काय आहे? महिलांमध्ये कोणती लक्षणं दिसून येतात. याबाबत आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत

एंडोमेट्रियोसिस हा आजार काय आहे?

एंडोमेट्रियोसिस गर्भाशयात होणारा एक आजार आहे. ज्यामध्ये  गर्भाशयाच्या आतल्या भागातील एन्डोमेट्रियल लेअर्समध्ये वाढ झाल्यानं गर्भाशयाच्या अन्य अंगामध्ये पसरायला सुरूवात  होते. साधारणपणे अंडाशय, फॅलोपियन ट्यूब, पेरिटोनियम, लिफ्ट नोड्समध्ये हा आजार पसरू शकतो.  एंडोमेट्रियोसिस एक सामान्य समस्या आहे. Endometriosis Society Of India नुसार जवळपास २५ मिलियन भारतील महिलांमध्ये  एंडोमेट्रियोसिस झाल्याचं दिसून आलं आहे.  अनेक महिलांना या आजाराच्या तीव्रतेबाबत कल्पना नसते.  १८ ते ३५ वर्ष वयोगटातील महिलांना हा आजार उद्भवतो. 

एंडोमेट्रियोसिसची लक्षणं

या आजाराचं  सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे मासिक पाळीदरम्यान प्रचंड वेदना होणं. मासिक पाळीच्यावेळी काही प्रमाणात वेदना होत असतात. त्यामुळे महिलांना या आजाराबाबात माहिती मिळण्यास अनेकदा उशीर होतो. महिलांना मासिक पाळीदरम्यान पोट फुगण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. पण जर ही समस्या दर आठवड्याला होत असेल तर हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतं. याचं कारण एंडोमेट्रियोसिस असू शकतं. यामध्ये पोट फुगल्यासारखं वाटतं आणि एंडोमेट्रियोसिस ऊतक तुटून जातात. याचा परिणाम प्रजनन क्षमतेवरही होतो आणि गर्भधारणेमध्येही समस्या उद्भवतात. 

मासिक पाळी दरम्यान अतिप्रमाणात रक्तस्त्राव होणं

शरीरसंबंधादरम्यान वेदना जाणवणं

लघवी किंवा शौच करताना वेदना होणं, रक्तस्त्राव होणं.

थकवा येणं, चक्कर येणं, गॅस होणं

 वंध्यत्व

NCBI च्या रिपोर्टनुसार जवळपास २५ ते ५० टक्के महिलांमध्ये गर्भधारणेशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागतो. एंडोमेट्रियोसिसमध्ये जे रक्त जमा झालेलं असतं. त्यामुळे गर्भाशय आणि अंडाशयाच्या आजूबाजूला चिटकल्यामुळे अंडाशयांमध्ये  अंड तयार होण्यास तसंच पुढील प्रक्रियेत बाधा येते.  

या आजाराचे निदान

1. Pelvic Examination 

2. Imaging Test- USG आणि MRI द्वारे

3. Laparoscopy द्वारे या आजाराचे निदान करता येऊ शकते. 

या आजाराचे उपचार महिलांची लक्षणं, गंभीरता, रुग्णाचं वय, आजाराची स्थिती तसंच कालावधीवर अवलंबून असते. या आजाराच्या उपचारांचा उद्देश लक्षणांना दूर करून प्रजनन क्षमता वाढवणं हा असतो. सगळ्यात आधी औषधांच्या साहाय्यानं या आजारावर उपचार केले जातात. वेदना कमी करण्यासाठी वेदना निवारक  (NSAIDS)  दिले जातात.

उपचारांमध्ये, गोळ्या किंवा इंजेक्शनच्या स्वरूपात गर्भनिरोधक गोळ्या, प्रोजेस्टिन थेरपी, जीएचआरएच विरूद्ध आणि अँटीऑक्सिडंट इत्यादी दिले जातात. ज्या रुग्णांना औषधं आणि इंजेक्शननं फायदा मिळत नाही. त्यांना stage ०३ आणि stage ०४ सर्जरीची आवश्यकता असते. ही सर्जरी दुर्बीणीद्वारे केली जाते. या सर्जरीत अंडाशय आणि बाकी अवयवांनामध्ये जमा असलेलं रक्त काढून टाकलं जातं. तसंच इतर ठिकाणी हललेल्या अवयवांना आधीच्या जागी ठेवले  जाते. यामुळे वेदनांपासून आराम मिळतो आणि गर्भधारणेची क्षमता वाढते. 

एंडोमेट्रियोसिस हा एक दीर्घकालीन आजार आहे. वेळीच उपचार केले नाहीतर ही समस्या वाढत जाते. म्हणून लवकरता लवकर या आजराचे उपचार करायला हवेत. मासिक पाळीच्यावेळी, शरीरसंबंधांच्यावेळी वेदना जाणवत असल्यास दुर्लक्ष करून नका, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Sumona Chakraborty suffering from endometriosis know the symptoms and remedies of the disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.