lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > १५ ते ४४ वयातील सर्वाधिक महिलांमध्ये आढळतो बॅक्टीरियल वेजिनोसिसचा आजार; जाणून घ्या लक्षणांसह उपाय

१५ ते ४४ वयातील सर्वाधिक महिलांमध्ये आढळतो बॅक्टीरियल वेजिनोसिसचा आजार; जाणून घ्या लक्षणांसह उपाय

Bacterial vaginosis : संशोधनातून असंही दिसून आलंय की बारिक शरीरयष्टीच्या तुलनेत जाड महिलांना या प्रकारच्या इन्फेक्शनचा धोका जास्त असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 04:48 PM2021-05-20T16:48:55+5:302021-05-20T17:00:00+5:30

Bacterial vaginosis : संशोधनातून असंही दिसून आलंय की बारिक शरीरयष्टीच्या तुलनेत जाड महिलांना या प्रकारच्या इन्फेक्शनचा धोका जास्त असतो.

Bacterial vaginosis causes symptoms and tips for prevention | १५ ते ४४ वयातील सर्वाधिक महिलांमध्ये आढळतो बॅक्टीरियल वेजिनोसिसचा आजार; जाणून घ्या लक्षणांसह उपाय

१५ ते ४४ वयातील सर्वाधिक महिलांमध्ये आढळतो बॅक्टीरियल वेजिनोसिसचा आजार; जाणून घ्या लक्षणांसह उपाय

Highlights या बॅक्टेरियांमध्ये असंतुलन निर्माण झाल्यास  बॅक्टीरियल वेजिनोसिस (Bacterial Vaginosis) होण्याचा धोका असतो. ही एक सामान्य स्थिती आहे. पण वेळीच लक्ष दिले गेले नाही तर  गंभीर समस्यांचे कारण ठरू शकते. 

रोजच्या जीवनात जर शरीराच्या नाजूक अंगांची व्यवस्थित स्वच्छता केली नाही तर बॅक्टेरिअल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. बॅक्टेरिअल वेजिनोसिस हे एक कॉमनल वजायनल इन्फेक्शन आहे. जे १५ ते ४४ वयोगटातील महिलांमध्ये तसेच प्रेग्नंट महिलांमध्ये आढळते. महिलांच्या योनीत स्वाभाविकच वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात. या बॅक्टेरियांमध्ये असंतुलन निर्माण झाल्यास  बॅक्टीरियल वेजिनोसिस (Bacterial Vaginosis) होण्याचा धोका असतो. ही एक सामान्य स्थिती आहे. पण वेळीच लक्ष दिले गेले नाही तर  गंभीर समस्यांचे कारण ठरू शकते. 

बॅक्टीरियल वेजिनोसिसची लक्षणं (Bacterial Vaginosis)

१) पातळ, पांढरा आणि  हिरव्या रंगाचा वजायनल डिस्चार्ज.

२) शरीरसंबंधादरम्यान घाणेरडा वास येणं.

३) खाज येणं, अस्वस्थ वाटणं.

४) लघवी करताना जळजळ होणं

बॅक्टीरियल वेजिनोसिसची कारणं आणि रिस्क फॅक्टर

बॅक्टीरियल वेजिनोसिस (Bacterial Vaginosis) इंफेक्शन अशावेळी होतं. जेव्हा घातक बॅक्टेरियाचे असंतुलन होते. गार्डेनेराला नावाचा बॅक्टेरिया या इन्फेक्शनचं प्रमुख कारण असतो. शरीरात या बॅक्टेरियांची वाढ झाल्यानं चांगले बॅक्टेरिया कमी होतात. त्यामुळे योनीमार्गाचे पीएच संतुलन बदलते. याचाच अर्थ असा की आपण डिओड्रेंटचा जास्त प्रमाणात वापर केल्यास तुम्हाला या प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकते.

संशोधनानुसार ज्या महिलांना धुम्रपान, मद्यपान करण्याची सवय तसंच जे लोक जास्त प्रमाणात नॉन व्हेज खातात. त्यांच्यात बॅक्टीरियल वेजिनोसिस (Bacterial Vaginosis) चे इंफेक्शन तीव्रतेनं जाणवते.  काही संशोधनातून असंही दिसून आलंय की बारिक शरीरयष्टीच्या तुलनेत जाड महिलांना या प्रकारच्या इन्फेक्शनचा धोका जास्त असतो. एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर असल्यानं या इंफेक्शनचा संसर्ग वाढू शकतं. 

बॅक्टीरियल वेजिनोसिस आणि सेक्शुअल एक्टिविटीज

बॅक्टेरिअल वेजायनोसिस (Bacterial Vaginosis) इंफेक्शन महिलांद्वारे पुरूष  जोडीदारापर्यंत पोहोचू शकत नाही. पण  शारीरिक संबंधांदरम्यान त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून अशा प्रकारचं कोणतंही इन्फेक्शन झाल्यास शरीर संबंध काही दिवस ठेवू नयेत योनी मार्गातील पीएच लेव्हल नॉर्मल झाल्यानंतर  तुम्ही संबंध ठेवू शकता. 

बॅक्टीरियल वेजिनोसिसचे उपचार

अनेकदा औषधांच्या सेवनाने हे इंफेक्शन पूर्णपणे बरं होतं.  पण तीन महिन्यांतर पुन्हा इंफेक्शन होण्याचा धोका असतो. जर कोणाला सतत अशा प्रकारचं संक्रमण होत असले तर दीर्घकाळ एंटीबायोटिक घेण्याची आवश्यकता भासू शकते. बॅक्टीरियल वेजिनोसिस (Bacterial Vaginosis) ची समस्या आपोआप बरी होत नाही. योग्यवेळी उपचार न केल्यास एचआईवी, क्लॅमाइडिया,  गोनोरिया या  आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. जर तुम्ही गर्भवती असाल तर मिसकॅरेज करण्याची वेळ येऊ शकते. तसंच जन्माला येत असलेल्या बाळाचं वजन कमी होऊ शकते. 

उपाय

सगळ्यात आधी योनी मार्गाला कोमट पाण्यानं स्वच्छ करण्याची सवय ठेवा. जेणेकरून कमी प्रमाणात बॅक्टेरिया तयार होतील.

नाजूक जागांवर जास्त साबणाचा वापर करू नका. 

कॉटनच्या अंडरवेअरर्स घालण्याचा प्रयत्न करा. वेजिनल डिओड्रेंट्सचा चुकूनही वापर करू नका.

शरीरसंबंध फक्त एकाच पार्टनरसोबत असावेत. सुरक्षेसाठी कंडोमचा वापर करा.

जर तुम्ही लकरात लवकर डॉक्टरांच्या सल्ल्यानं या आजारांचे उपचार घेतले नाहीत तर सेक्सुअली ट्रांसमिटेड डिजीज आजार होण्याचा धोका वाढतो. 

रोज आंघोळ करताना नाजूक भागांची चांगली स्वच्छता करा.

शौचालयातून बाहेर येण्यापूर्वी पाणी किंवा टिश्यूनं नाजूक भाग व्यवस्थित स्वच्छ करा.
 

Web Title: Bacterial vaginosis causes symptoms and tips for prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.