lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health > लहान मुलांसाठी जीवघेणी ठरतेय कोरोनाची दुसरी लाट; वेळीच जाणून घ्या बचावाचे योग्य उपाय

लहान मुलांसाठी जीवघेणी ठरतेय कोरोनाची दुसरी लाट; वेळीच जाणून घ्या बचावाचे योग्य उपाय

Precautions for corona : सध्याच्या कोरोना लाटेत लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करणं गरजेचं आहे. कारण कोरोना आधीपेक्षा जास्त धोकादायक असल्याचं दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 11:48 AM2021-05-18T11:48:39+5:302021-05-18T11:58:50+5:30

Precautions for corona : सध्याच्या कोरोना लाटेत लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करणं गरजेचं आहे. कारण कोरोना आधीपेक्षा जास्त धोकादायक असल्याचं दिसून येत आहे.

CoronaVirus : Precautions for corona second wave for kids | लहान मुलांसाठी जीवघेणी ठरतेय कोरोनाची दुसरी लाट; वेळीच जाणून घ्या बचावाचे योग्य उपाय

लहान मुलांसाठी जीवघेणी ठरतेय कोरोनाची दुसरी लाट; वेळीच जाणून घ्या बचावाचे योग्य उपाय

Highlightsसोसायटीच्या मुलांबरोबर खेळण्याची परवानगी देऊ नका. मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. म्हणूनच त्यांना घरी ठेवणे फार महत्वाचे आहे.

कोरोनाच्या संक्रमणामुळे सगळ्यांनाच शाळा कॉलेज सोडून घरात बसावं लागत आहे. आता खेळायला जाणं, मित्र मैत्रिणींना भेटणंसुद्धा एखाद्या स्वप्नाप्रमाणे झालं आहे. वसंत कुंजचे सिनियर कंसल्टंट पीडियाट्रिशियन डॉक्टर पवन कुमार यांनी सांगितले की, सध्याच्या कोरोना लाटेत लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करणं गरजेचं आहे. कारण कोरोना आधीपेक्षा जास्त धोकादायक असल्याचं दिसून येत आहे.  लहान मुलांची योग्यवेळी काळजी घेतल्यास व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखता येऊ शकतं. डॉक्टर पवन कुमार नवभारत टाईम्सशी बोलताना यांनी लहान मुलांना सुरक्षित ठेवण्याचे उपाय सांगितले आहेत. 

लहान मुलांसाठी घातक ठरू शकते कोरोनाची दुसरी लाट

कोरोनाची दुसरी लाट मुलांवर अधिक वाईट परिणाम करीत आहे. या वेळी मुले अधिक असुरक्षित होत आहेत.  सुरूवातीला मुलांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, ज्यामुळे त्यांचे विषाणू पसरविण्याचा धोका खूप जास्त जाणवेल. कोरोनाच्या दुसऱ्या  लाटेत श्वासोच्छवासाच्या समस्येचे प्रमाण जास्त आहे, म्हणून यावेळी मुलांना विषाणूंपासून वाचवणे अधिक महत्वाचे आहे. 

सोशल डिस्टेंसिंग गरजेचं 

लहान मुलांना सोशल डिस्टेंसिंगचे महत्व पटवून देणं फार महत्वाचं आहे. लहान मुलांना अनावश्यक  इतर ठिकाणी जाऊ देऊ नका. सध्या सोसायटीतील इतर मुलांसह खेळायला पाठवू नका, शक्यतो घरच्याघरी खेळू द्या. मुलांना बाहेर न्यायचे असल्यास पालकांनी सोबत जावे. जर आपल्या मुलाने त्याच्या मित्रांना भेटायला जायचा विचार केला तर प्रेमाने समजावून सांगा. सोसायटीच्या मुलांबरोबर खेळण्याची परवानगी देऊ नका. मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. म्हणूनच त्यांना घरी ठेवणे फार महत्वाचे आहे.

वैयक्तिक स्वच्छता

कोरोना टाळण्यासाठी केवळ मास्क लावणे पुरेसे नाही तर मुलांना वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित नियम शिकवायला हवेत. मुलांना डोळे, नाक आणि चेहरा या भागांना हात लावू देऊ नका. पुन्हा पुन्हा आपले हात धुण्यास आणि स्वच्छ करण्यास सांगा. खोकताना आणि शिंकताना चेहरा आणि तोंड झाकून ठेवायला सांगा आणि आजारी वाटत असल्यास मुलांना घरीच ठेवा.

घराची साफ सफाई करा

इंफेक्शनपासून बचावासाठी नेहमीच घर स्वच्छ आणि साफ ठेवायला हवं. दरवाज्याचे हँण्डल, टॅबलेट, खुर्ची, बटणं साफ ठेवायला हवेत. बुट, चप्पल घराच्या बाहेरच ठेवावेत, फळ, भाज्या घ्यायला जाताना हात स्वच्छ धुवा. बाहेरून आल्यानं कोणत्याही सामानाला लहान मुलांना हात लावू देऊ नका.

Web Title: CoronaVirus : Precautions for corona second wave for kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.