lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Anemia > थोडं काम केलं की लगेच थकवा जाणवतो? रक्त वाढवणारे ७ पदार्थ खा, भरपूर ताकद येईल-फिट राहाल

थोडं काम केलं की लगेच थकवा जाणवतो? रक्त वाढवणारे ७ पदार्थ खा, भरपूर ताकद येईल-फिट राहाल

How to Increase Hemoglobin Levels Quickly : भोपळ्याच्या बीयांमध्ये  मिनरल्स फॉस्फरेस, मॅग्नेशियम, मँगनीज आणि कॉपरबरोबरच जिंक आणि आयर्नही असते. यामुळे हिमोग्लोबिन लेव्हल सुधारण्यास मदत होते.  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 07:47 PM2024-01-02T19:47:43+5:302024-01-03T17:43:13+5:30

How to Increase Hemoglobin Levels Quickly : भोपळ्याच्या बीयांमध्ये  मिनरल्स फॉस्फरेस, मॅग्नेशियम, मँगनीज आणि कॉपरबरोबरच जिंक आणि आयर्नही असते. यामुळे हिमोग्लोबिन लेव्हल सुधारण्यास मदत होते.  

How to Increase Hemoglobin Levels Quickly : Top Hemoglobin Foods That Can Increase Your Hemoglobin Naturally | थोडं काम केलं की लगेच थकवा जाणवतो? रक्त वाढवणारे ७ पदार्थ खा, भरपूर ताकद येईल-फिट राहाल

थोडं काम केलं की लगेच थकवा जाणवतो? रक्त वाढवणारे ७ पदार्थ खा, भरपूर ताकद येईल-फिट राहाल

जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार हिमोग्लोबिन कमी होणं ही एक गंभीर समस्या आहे. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे लोकांच्या शरीरात रक्त कमी होण्याची समस्या उद्भवते. (Which Foods to Eat When You Have Anemia) शरीरात रक्त व्यवस्थित तयार झाले नाही तर थकवा येणं, कमकुवतपणा ही लक्षणं जाणवतात. (How to Increase Hemoglobin) खाण्यापिण्यात चांगल्या पदार्थांचा समावेश केला तर  रक्त तयार होण्यात अडथळे येत नाहीत. 

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार शरीरात रक्त तयार होणं ही महत्त्वाची प्रोसेस असते. एक प्रोटिन ज्याला ट्रांसफेरिन असं म्हटलं जातं. यामुळे शरीराला रक्त मिळते आणि रेड ब्लड सेल्स तयार होण्यास मदत होते. हिमोग्लोबिन लेव्हल बुस्ट होण्यास मदत होते. म्हणूनच आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश करा. (Food For Hemoglobin)

१) हिरव्या भाज्या

थंडीत हिरव्या भाज्या बाजारात सहज मिळतात. पालक, ब्रोकोली आयर्नचा एक चांगला स्त्रोत आहेत. यामुळे हिमोग्लोबिन लेव्हल वाढण्यास मदत होते. ब्लड सेल्सची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही बीटाचाही आहारात समावेश करू शकता.

२) ब्राऊन राईस

ब्राऊन राईस एक हेल्दी सुपरफूड आहे ज्याचा वापर करून अनेक समस्या दूर करता येता. यात आयर्नचे प्रमाणही चांगले असते. यातील ब्लड हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते. 

३) भोपळ्याच्या बीया

भोपळ्याच्या बीयांमध्ये  मिनरल्स फॉस्फरेस, मॅग्नेशियम, मँगनीज आणि कॉपरबरोबरच जिंक आणि आयर्नही असते. यामुळे हिमोग्लोबिन लेव्हल सुधारण्यास मदत होते.  

४) ड्राय फ्रुट्स आणि नट्स

ड्राय फ्रुट्स आणि नट्स फक्त न्युट्रिशियस नसतात तर वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतात. यात मनुके आणि बदाम असतात जे आयर्नचा चांगला स्त्रोत आहेत. 

कोण म्हणतं भात-चपाती खाल्ल्याने वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात पोटभर जेवून बारीक होण्याचं सिक्रेट

५) धान्य

ओट्स, बाजरी इत्यादी पदार्थ हिमोग्लाबीन वाढवण्यास मदत करतात कारण यात आयर्नचे प्रमाण जास्त असते. फळंही मेटाबॉलिझ्म वाढवण्यास मदत करतात.

ओटी पोट सुटलंय? सकाळी गरम पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या; पोट आत जाईल-स्लिम दिसाल

६) खजूर

खजूरात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात. शरीरात आयर्नची कमतरता असले तर रेड ब्लड सेल्स काऊंट वाढवण्यासाठी तुम्ही खजूराचे सेवन करू शकता. खजूर खाल्ल्याने इम्यूनिटी वाढण्यास मदत होते. 

७) डाळिंब

डाळिंबात आयर्न, कॅल्शियम, फायबर्स यांसारखी पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता दूर होण्यास  मदत होते. ही फळं खाल्ल्याने हिमोग्लोबिन लेव्हल मेंटेन राहण्यास मदत होते. 

Web Title: How to Increase Hemoglobin Levels Quickly : Top Hemoglobin Foods That Can Increase Your Hemoglobin Naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.