lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Gardening > उन्हाळ्यात तुळस सुकते? कुंडीतल्या मातीत ‘हा’ पदार्थ घाला -तुळस राहील हिरवीगार-होईल डेरेदार

उन्हाळ्यात तुळस सुकते? कुंडीतल्या मातीत ‘हा’ पदार्थ घाला -तुळस राहील हिरवीगार-होईल डेरेदार

How to Grow Tulsi Plant At Home : उन्हाळ्याच्या दिवसांत तुळशीची पानं सुकतात, तुळशीची वाढच होत नाही अशी अनेकांची तक्रार असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 08:56 PM2024-03-12T20:56:53+5:302024-03-13T15:10:17+5:30

How to Grow Tulsi Plant At Home : उन्हाळ्याच्या दिवसांत तुळशीची पानं सुकतात, तुळशीची वाढच होत नाही अशी अनेकांची तक्रार असते.

How to Grow Tulsi Plant At Home : Tulsi Plants Gardening Tips How To Grow Tulsi Plant | उन्हाळ्यात तुळस सुकते? कुंडीतल्या मातीत ‘हा’ पदार्थ घाला -तुळस राहील हिरवीगार-होईल डेरेदार

उन्हाळ्यात तुळस सुकते? कुंडीतल्या मातीत ‘हा’ पदार्थ घाला -तुळस राहील हिरवीगार-होईल डेरेदार

तुळशीच्या रोपाचे हिंदू धर्मात बरेच महत्व आहे. (Gardening Tips For Beginners) तुळशीला पूजनीय आणि पवित्र मानले जाते. तुळशीच्या रोपाचे धार्मिकदृष्ट्या अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत. (How to Grow Tulsi Plant At Home) अनेक आजारांवर औषध म्हणून तुळशीच्या पानांचे सेवन केले जाते. (Gardening Tips) अनेकदा असं होतं की तुळशीच्या रोपांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर रोप सुकू लागते आणि वाढ थांबते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत तुळशीची पानं सुकतात, तुळशीची वाढच होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. काही सोप्या गार्डनिंग टिप्स फॉलो केल्या तर तुळस जराही सुकणार नाही.  (Tulsi Plant's Gardening Tips)

१) प्रूनिंग करा

तुळशीचे झाड लावण्यासाठी जवळपास १ महिला आधीपासून प्रूनिंग करणं सुरू करा. ज्यामुळे जास्त फांद्या येतील आणि रोपं  दाट दिसेल.  याव्यतिरिक्त तुळशीची वाढ व्हायलाही सुरूवात होईल. तुळशीला पोषण मिळेल आणि तुळस बहरलेली दिसेल.

दातांच्या मध्यभागी किड लागलीये? खोबरेल तेलात १ पदार्थ घालून ब्रश करा, किड निघेल-चमकतील दात

२) ऊन्हात ठेवा

तुळशीच्या रोपाला जास्तीत जास्त उन्हाची गरज असते त्यामुळे ज्या ठिकाणी योग्य प्रमाणात ऊन येते अशी ठिकाणी तुळशीचे रोप ठेवा. जवळपास ४ ते ५ तास ऊन्हात ठेवल्यानंतर तुम्ही रोप पुन्हा दुसऱ्या ठिकाणी ठेवू शकता. 

३) योग्य प्रमाणात पाणी द्या

तुळशीला योग्य प्रमाणात पाणी द्या. जास्त पाणी देऊ नका. तुळशीच्या  रोपात मॉईश्चर टिकून राहील इतकं पाणी कुंडीत भरा. रोज सकाळ संध्याकाळ न विसरता तुळशीच्या रोपाला पाणी द्या.

रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम

४) नैसर्गिक खताचा वापर

तुळशीचं रोपं बहरलेलं ठेवण्यासाठी चहा पावडरचा वापर करू शकता. यासाठी चहा पावडर  उकळण्यासाठी  ठेवा. नंतर गाळून हे पाणी रोपांना घाला. एक चमचा चहा पावडर १ लिटर पाण्यात मिसळून उकळून थंड करून घ्या. महिन्यातून एकदा खत झाडांना घाला ज्यामुळे रोपांची वाढ चांगली होईल. 

५) संक्रमण होणारी नाही याची काळजी घ्या

किटक आणि रोपांचे संक्रमण तुळशीचे रोप सुकण्याचे कारण ठरू शकतो. तुळशीच्या रोपांना एफिड्स, व्हाईटफ्लाईज आणि स्पाडर संक्रमित करू शकतात. किटकांमुळे रोपं कमकुवत होतात, सुकून जातात. मातीतील पोषक तत्व तुळशीसाठी महत्वाचे असतात. 

Web Title: How to Grow Tulsi Plant At Home : Tulsi Plants Gardening Tips How To Grow Tulsi Plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.