Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही तेल नाही पॉयझन खाताय, तुमचं तेल करतेय हृदयावर ‘विष प्रयोग!’पाहा कोणतं तेल जास्त चांगलं कोणतं घातक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2026 17:31 IST

worst refined oils for health : bad to worst cooking oils list : चव आणि सोयीसाठी अनेकजण रिफाईंड तेलांचा वापर करतात, मात्र हीच सवय शरीरासाठी धोकादायक ठरू शकते....

चवीला चांगले आणि खिशाला परवडणारे रिफाईंड ऑईल आज आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनले आहे. अगदी आजही आपल्यापैकी कित्येक घरांमध्ये रिफाईंड ऑईलचा वापर हमखास केला जातो. स्वस्त मिळते आणि पदार्थाला तेलाचा विशिष्ट वासही येत नाही म्हणून आपण सर्रासपणे रिफाईंड ऑईलचा वापर करतो. आपण दररोज स्वयंपाकासाठी जे तेल वापरतो, त्याचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होत असतो. चव आणि सोयीसाठी अनेकजण रिफाईंड तेलांचा वापर करतात, मात्र हीच सवय हळूहळू शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञ वारंवार रिफाईंड ऑईलपासून दूर राहण्याचा सल्ला देतात, कारण त्याच्या प्रक्रियेदरम्यान अनेक रसायनांचा वापर केला जातो आणि त्यातील नैसर्गिक पोषक घटक नष्ट होतात(worst refined oils for health).

बाजारात उपलब्ध असलेले सूर्यफुलांच्या बियांच तेल, सोयाबीन तेल आणि पाम तेल यांसारखी तेल मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. परंतु ही सर्व तेल आरोग्यासाठी सुरक्षितच असतात असे नाही. काही प्रकारच्या तेलाचा जास्त (best oil alternatives for daily cooking) वापर केल्यास हृदयविकार, लठ्ठपणा आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रिफाईंड तेलाच्या वापराबाबत सजग राहणे आणि योग्य पर्याय निवडणे अत्यंत गरजेचे असते. 

कोणत्या प्रकारचं रिफाईंड ऑईल आहे सर्वात धोकादायक... 

हेल्थ कोच शिवांगी देसाई यांनी अशाच काही लोकप्रिय रिफाईंड तेलांचे रेटिंग केले आहे, ज्यामध्ये त्यांनी 'वाईट' ते 'अतिशय वाईट' अशा पद्धतीने तेलाचे रँकिंग केले आहे. हेल्थ कोच शिवांगी देसाई यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन माहिती सांगत एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

५. सनफ्लॉवर ऑईल :- हेल्थ कोच शिवांगी देसाई यांनी या तेलाच्या रँकिंगमध्ये सनफ्लॉवर ऑईलला पाचव्या क्रमांकावर ठेवले आहे. हे तेल जास्त आचेवर गरम केल्यास ते अस्थिर होते. जर तुम्ही याचा नियमित वापर करत असाल, तर शरीरात जळजळ वाढू शकते आणि हे मधुमेहाचे कारणही बनू शकते. रिफाईंड तेल बनवताना ते उच्च तापमानाला गरम केले जाते आणि त्यावर अनेक रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. यामुळे तेलातील नैसर्गिक पोषक तत्वे नष्ट होतात आणि ते शरीरासाठी हानिकारक ठरते.

४. रिफाईंड सोयाबीन ऑईल :- हे सर्वात लोकप्रिय रिफाईंड तेल आहे कारण ते अतिशय स्वस्त मिळते. या तेलामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढू शकतो, ज्यामुळे लठ्ठपणा आणि फॅटी लिव्हर यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हे तेल जास्तीत जास्त प्रमाणांत टाळण्याचा सल्ला दिला जातो.

उठणं - बसणंही झालं होतं कठीण, पण श्वेता तिवारीने 'या' घरगुती उपायाने कमी केलं युरिक अ‍ॅसिड...

३. ब्लेंडेड रिफाईंड ऑईल :- यामध्ये सोयाबीन, सनफ्लॉवर आणि कॉटन सीड ऑईल यांसारखी विविध तेल एकत्र मिक्स केलेली असतात. हे तेल तुमच्या हृदय आणि धमन्यांमध्ये ट्रान्स फॅट जमा करू शकते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात.

२. पाम ऑईल :- पाम ऑईल घरांमध्ये खूप कमी प्रमाणात वापरले जाते, पण बाहेरील चिप्स, स्नॅक्स आणि प्रोसेस्ड फूडमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. हे आरोग्यासाठी विषासारखे असून ते लिव्हर आणि हृदयावरील चरबीचे प्रमाण वाढवते. 

१. वनस्पती तूप (डालडा) :- हे सर्वात जास्त धोकादायक मानले जाते. हे प्रामुख्याने प्रोसेस्ड फूड आणि स्ट्रीट फूडमध्ये वापरले जाते. हे ट्रान्स फॅट्सयुक्त असते, जे लिव्हर, हृदय आणि संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत घातक असते. 

मुलांची अंथरुणात लघवी करण्याची सवय कायमची सुटेल! दुधात मिसळा चिमूटभर १ पदार्थ - अंथरुण ओलं न होता लागेल शांत झोप... 

स्वयंपाकासाठी कोणते पर्याय आहेत 'हेल्दी'?

हेल्थ कोच शिवांगी देसाई यांच्या मते, रोजच्या स्वयंपाकात कोणत्याही प्रकारच्या रिफाईंड तेलाचा वापर करू नये. भारतीय स्वयंपाकासाठी खालील पर्याय उत्तम मानले जातात. 

१. मोहरीचे तेल हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

२. नारळाचं तेल हे पचनास हलके आणि गुणकारी असते.

३. काही विशिष्ट पदार्थांसाठी अस्सल देशी तुपाचा वापर करणे हा एक उत्तम आरोग्यदायी पर्याय आहे.

स्वस्त आणि सोयीचे म्हणून रिफाईंड तेल वापरणे तुमच्या भविष्यातील आरोग्यासाठी महागात पडू शकते. त्यामुळे आजच नैसर्गिक आणि शुद्ध पर्यायांची निवड करा आणि स्वतःला आजारांपासून दूर ठेवा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Refined oils: A slow poison for your heart, experts warn.

Web Summary : Refined oils like sunflower, soybean, and palm oil are widely used but can harm health. Health coach Shivangi Desai warns about their dangers, ranking them from bad to worst, with vegetable ghee (Dalda) topping the list. Mustard, coconut oil, and ghee are healthier alternatives.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनाहृदयरोगहृदयविकाराचा झटका