lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > थंडीत कुकरमध्ये झटपट करा बाजरीची पौष्टीक खिचडी; सोपी रेसिपी-मऊ खिचडीचा बेत होईल मस्त

थंडीत कुकरमध्ये झटपट करा बाजरीची पौष्टीक खिचडी; सोपी रेसिपी-मऊ खिचडीचा बेत होईल मस्त

How to Make Healthy Bajari khichdi (Bajrichi khichdi recipe) : बाजरीची खिचडी करण्याची सोपी रेसपी पाहूया. हे लो कॅलरी फूड आहे.  वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांसाठीही हा उत्तम पर्याय आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 10:17 AM2023-11-23T10:17:48+5:302023-11-23T10:36:28+5:30

How to Make Healthy Bajari khichdi (Bajrichi khichdi recipe) : बाजरीची खिचडी करण्याची सोपी रेसपी पाहूया. हे लो कॅलरी फूड आहे.  वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांसाठीही हा उत्तम पर्याय आहे.

Winter Special Recipes : How to Make Healthy Bajari khichdi Bajri Khichdi Recipe | थंडीत कुकरमध्ये झटपट करा बाजरीची पौष्टीक खिचडी; सोपी रेसिपी-मऊ खिचडीचा बेत होईल मस्त

थंडीत कुकरमध्ये झटपट करा बाजरीची पौष्टीक खिचडी; सोपी रेसिपी-मऊ खिचडीचा बेत होईल मस्त

थंडीच्या वातावरणात शरीराला गरम ठेवण्यासाठी अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा लागतो जे गरम असतात. पटकन बनून तयार होतील आणि खायला चवदार लागतील असे पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता. (Bajra Khichdi Recipe in Marathi) बाजरीची भाकरी, बाजरीची खिचडी असे पदार्थ हिवाळ्यात अनेक घरांमध्ये खाल्ले जातात कारण यातून शरीराला पुरेपूर पोषण मिळते आणि शरीरालात उष्णता मेंटेन राहते. (Cooking Hacks) बाजरीची खिचडी करण्याची सोपी रेसपी पाहूया.

खिचडी हे एक  लो कॅलरी फूड आहे.  वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांसाठीही हा उत्तम पर्याय आहे. या खिचडीत तुम्ही आपल्या आवडीच्या भाज्या, डाळी यांचा समावेश करू शकता. (Bajri Khichdi Recipe) डाळ तांदळाच्या खिचडीप्रमाणे सोप्या बेसिक स्टेप्स ही खिचडी करण्यासाठी फॉलो कराव्या लागतात.

बाजरीची खिचडी करण्याचे साहित्य (Bajrichi khichdi kashi karaychi)

१) बाजरी- २ कप 

२) शेंगदाणे- १ कप

३) तूप- २ टेबलस्पून

४) हिंग- १ टिस्पून

५) जीरं- १ छोटा चमचा

६) धणे पावडर- १ टिस्पून

७) गरम मसाला-  टिस्पून

८)  लाल मिरची पावडर- २ टिस्पून

९) मीठ- चवीनुसार

बाजरीची खिचडी करण्याची कृती (How to make Bajari Khichdi)

1) सगळ्यात आधी बाजरी १० मिनिटांसाठी भिजवून घ्या नंतर बाजरी पाण्यात भिजवून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून बाजरी वेगळी ठेवा.  नंतर बाजरी कुटून बारीक करून घ्या. त्यातून निघणारा भूसा वेगळा करा. 

2)  प्रेशर कुकरमध्ये बाजरीसह शेंगदाणे घालून ४ ते ५ शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्या. नंतर बाजरी मऊ झाल्यानंतर समजून जा की बाजरी व्यवस्थित शिजली आहे.

थंडीतही विकतसारखं घट्ट दही घरीच करा; 5 टिप्स, कापता येईल इतकं परफेक्ट-मलईदार होईल दही

3) आता एका कढईमध्ये तूप घाला आणि त्यात हिंग, जीरं असे फोडणीचे इतर साहित्य घाला. नंतर त्यात धणे पावडर, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर घाला.त्यानंतर शिजवलेली बाजरी त्यात घाला. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून १० ते १५ मिनिटं शिजवून घ्या.  तयार आहे मऊ-गरमागरम बाजरीची खिचडी. ही खिचडी तुम्ही लोणचं, पापडाबरोबर सर्व्ह करू शकता. 

Web Title: Winter Special Recipes : How to Make Healthy Bajari khichdi Bajri Khichdi Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.