भाज्यांचे सूप हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आणि चवीला मस्त असते. यात विविध भाज्यांमधील जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात. जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. (Winter Recipe: Make this vegetable soup once, it gives energy to the body, keeps you healthy and worm )हे सूप पचायला अगदी हलकं असतं आणि पोटभरीचं असल्यामुळे हे सर्दी-खोकला आणि आजारपणातही उपयोगी ठरतं. रोजच्या आहारात गरमागरम भाज्यांचे सूप घेतल्यास शरीर आरोग्यदायी राहते तसेच हे सूप करायला फार सोपे असते. नक्की करुन पाहा.
साहित्य
ब्रोकोली, गाजर, दुधी भोपळा, टोमॅटो, कांदा, मीठ, मिरीपूड, पाणी, जिरे, लिंबू, मक्याचे दाणे , हिरवी मिरची, तूप
कृती
१. गाजर सोलून घ्यायचे. दुधी भोपळा सोलून घ्यायचा. कांदाही सोलून घ्या्यचा. तसेच ब्रोकोलीचे तुकडे करायचे त्यात काही कीड वगैरे नाही ना पाहून घ्यायचे. टोमॅटो चिरुन घ्यायचा. दुधी भोपळ्याचे तुकडे करायचे. कांदा बारीक चिरायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. मक्याचे दाणे सोलून घ्यायचे. स्वीटकॉर्नच वापरा, त्याला चव फार छान असते.
२. एका कुकरमध्ये गाजराचे तुकडे घ्यायचे. त्यात दुधी भोपळ्याचे तुकडे घालायचे. तसेच ब्रोकोलीचे तुकडेही घालायचे. वाटीभर मक्याचे दाणे घाला. टोमॅटो घाला आणि चमचाभर मीठ घाला. मिरी पूड घाला आणि पाणी घाला. सगळ्या भाज्या छान शिजतील एवढे पाणी त्यात घ्यायचे. कुकर लावा नेहमीपेक्षा दोन शिट्या जास्त काढा.
३. शिजलेल्या भाज्या गार करुन घ्या. त्यातील पाण्यासकट त्याची पेस्ट करा. मिक्सरमधून फिरवून घ्या. कोणतीही भाजी अख्खी राहणार नाही याची काळजी घ्या. मस्त पातळ पेस्ट तयार करायची.
४. एका कढईत चमचाभर तूप घ्या. तुपावर हिरव्या मिरचीचे तुकडे परतून घ्या. चमचाभर जिरे परतून घ्या. कांदा छान बारीक चिरा आणि तो ही मस्त परतून घ्यायचा. त्यात तयार पेस्ट ओतायची. भांज्याची पेस्ट मस्त उकळायची. त्यात गरज असेल तर थोडे पाणी घाला. चवीनुसार मीठ घाला. मस्त उकळू द्या. छान असे सूप तयार होते.
