आपल्या रोजच्या जेवणातील चपाती हा अविभाज्य भाग आहे, तर सुट्टीच्या दिवशी किंवा सणाला पुरी-पराठ्याचा बेत आखला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की हे तिन्ही पदार्थ गव्हाच्या पिठापासूनच तयार होत असूनही आपल्या पोटावर त्यांचा परिणाम वेगवेगळा का होतो? आरोग्याच्या दृष्टीने चपाती, पुरी आणि पराठा यापैकी नेमका कोणता पदार्थ 'पचायला हलका' असतो? चुकीच्या पदार्थांची निवड तुमच्या पचनसंस्थेवर ताण देऊ शकते(which is easiest to digest roti, puri or paratha).
भारतीय जेवणात चपाती, पुरी आणि पराठा हे पदार्थ जवळपास प्रत्येक घरात आवडीने खाल्ले जातात. मात्र आरोग्याची काळजी घेताना किंवा वजन नियंत्रणात ठेवताना अनेकांच्या मनात एक प्रश्न नक्की येतो - या तिन्हींपैकी पचायला सर्वात हलका पदार्थ कोणता? कारण काही पदार्थ तेलकट असल्यामुळे पचायला जड वाटतात, तर काही पटकन पचतात आणि शरीर हलकं वाटू लागतं. विशेषतः उन्हाळ्यात किंवा पचनाशी संबंधित समस्या असताना योग्य पदार्थांची निवड करणं खूप महत्त्वाचं ठरतं. चपाती, पुरी आणि पराठा बनवण्याची पद्धत, त्यातील तेल-तुपाचं प्रमाण आणि वापरलेले घटक यामुळे त्यांच्या पचनावर मोठा परिणाम होतो. चपाती, पुरी, पराठा तिन्ही लोकप्रिय पदार्थांपैकी कोणता पदार्थ सर्वात आधी पचतो, कोणता शरीरासाठी हलका मानला जातो आणि आरोग्यासाठी कोणता (which is easier to digest roti puri or paratha) पर्याय अधिक चांगला ठरू शकतो.
चपाती, पुरी आणि पराठा यापैकी कोणता पदार्थ पचायला सर्वात हलका असतो?
चपाती पचायला किती वेळ लागतो ?
आपल्या नेहमीच्या खाण्यातील चपाती किंवा फुलक्यामध्ये फायबरचे प्रमाण सर्वात जास्त असते आणि यामध्ये फॅटचे प्रमाण फारच कमी असते. हेल्थलाईन रिपोर्टनुसार, गव्हापासून तयार केलेली आणि तेल न लावलेली चपाती पचायला साधारण २ ते ३ तास लागतात. यात फॅट नसल्यामुळे शरीरातील पाचक एन्झाईम्स याला वेगाने ग्लुकोजमध्ये बदलतात, ज्यामुळे आपल्याला लगेच ऊर्जा मिळते.
पराठा आणि पुरी पचायला किती वेळ लागतो?
जेव्हा चपातीला तेल किंवा तूप लावून पराठा बनवला जातो किंवा तिला डीप फ्राय करून पुरी बनवली जाते, तेव्हा पचनाचा वेग मंदावतो. हे पदार्थ पचायला साध्या चपाती पेक्षा जास्त वेळ घेतात. मेडिकल न्यूज टुडे नुसार, फॅट (चरबीयुक्त) असलेले पदार्थ जठरातून रिकामे होण्यास जास्त वेळ लागतो. एका तेलाच्या पराठ्याला पूर्णपणे पचण्यासाठी साधारण ३ ते ४ तास लागू शकतात. तर डीप फ्राय केलेल्या पुरीला पचण्यासाठी साधारण ५ ते ६ तास इतका वेळ लागू शकतो.
स्टिल - पितळ की माती...कोणत्या भांड्यात दूध तापवावं ? 'या' भांड्याचा करा उपयोग - साय येईल जाडजूड...
पुरी-पराठा खाल्ल्यावर झोप का येते?
WebMD नुसार, पुरी आणि पराठ्यामध्ये फॅट्सचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर असते. हाय फॅट असलेले पदार्थ पचवताना रक्ताचा प्रवाह पचनसंस्थेकडे वाढतो, ज्यामुळे मेंदूला मिळणाऱ्या ऊर्जेची पातळी थोड्या वेळासाठी कमी होते. यामुळे सुस्ती किंवा झोप जाणवू लागते. याचबरोबर, जेव्हा आपण पुरी किंवा पराठ्यासारखे पचायला जड पदार्थ खातो, तेव्हा शरीरातील अधिकांश ऊर्जा ते पचवण्यासाठी वापरली जाते. याच कारणामुळे भारी नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते.
पचायला नेमकं काय हलकं ?
चपाती हा पदार्थ पचायला सर्वात हलका आणि उत्तम पदार्थ ठरतो. चपातीमध्ये फॅट्स नसल्यामुळे शरीरातील पाचक एन्झाईम्स तिचे रूपांतर लगेच ग्लुकोजमध्ये करू शकतात. यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. चपातीत फायबर भरपूर असते, जे पचनसंस्था स्वच्छ आणि सक्रिय ठेवण्यास मदत करते. जर तुम्हाला पचनाच्या तक्रारी असतील, वजन कमी करायचे असेल किंवा उन्हाळ्यात शरीर हलके ठेवायचे असेल, तर विना तेलाची चपाती किंवा फुलका हाच सर्वात उत्तम पर्याय आहे. सणासुदीला पुरी-पराठ्याचा आनंद घेणे ठीक असले तरी, रोजच्या आहारात चपातीलाच प्राधान्य देणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल.
Web Summary : Chapatis are easiest to digest due to their high fiber and low fat content, taking 2-3 hours. Parathas take 3-4 hours, while puris take 5-6 hours due to the fat content slowing digestion. Choose wisely for better digestive health.
Web Summary : रोटी में उच्च फाइबर और कम वसा के कारण इसे पचाना सबसे आसान है, जिसमें 2-3 घंटे लगते हैं। पराठे को 3-4 घंटे लगते हैं, जबकि पूरी को वसा की मात्रा के कारण 5-6 घंटे लगते हैं, जिससे पाचन धीमा हो जाता है। बेहतर पाचन स्वास्थ्य के लिए सोच समझकर चुनें।