Lokmat Sakhi >Food > आंबट-गोड जांभळं खाल्ल्यावर 'या' गोष्टी खाणं टाळा, अचानक बिघडू शकते तब्येत!

आंबट-गोड जांभळं खाल्ल्यावर 'या' गोष्टी खाणं टाळा, अचानक बिघडू शकते तब्येत!

Foods To Avoid After Eating Jamun: जांभळांसोबत किंवा नंतर लगेच काही खास पदार्थ खाल्ल्यास गंभीर समस्या होण्याचा धोकाही असतो. अशात जांभळासोबत काय खाऊ नये याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:18 IST2025-05-29T15:16:40+5:302025-05-29T15:18:55+5:30

Foods To Avoid After Eating Jamun: जांभळांसोबत किंवा नंतर लगेच काही खास पदार्थ खाल्ल्यास गंभीर समस्या होण्याचा धोकाही असतो. अशात जांभळासोबत काय खाऊ नये याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

What should you avoid to eat after eating jamun or plum | आंबट-गोड जांभळं खाल्ल्यावर 'या' गोष्टी खाणं टाळा, अचानक बिघडू शकते तब्येत!

आंबट-गोड जांभळं खाल्ल्यावर 'या' गोष्टी खाणं टाळा, अचानक बिघडू शकते तब्येत!

Foods To Avoid After Eating Jamun :  पावसाला सुरूवात झाली की, बाजारात वेगवेगळी पावसाळी फळं दिसायला लागतात. यात सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेणारी फळं म्हणजे. आंबट, तुरट आणि गोड चव असलेली जांभळं. या दिवसात लोक मोठ्या आवडीनं जांभळं खातात. या फळाची टेस्ट तर चांगली असतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. पण जास्तीत जास्त लोक जांभळं खाताना काही चुका करतात. जांभळांसोबत किंवा नंतर लगेच काही खास पदार्थ खाल्ल्यास गंभीर समस्या होण्याचा धोकाही असतो. अशात जांभळासोबत काय खाऊ नये याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पाणी पिणं टाळा

जांभळं खाल्ल्यावर लगेच पाणी पिणं नुकसानकारक ठरू शकतं. यामुळे तुम्हाला जुलाब किंवा उलटीची समस्या होऊ शकते. तसेच पोटासंबंधी काही समस्याही होऊ शकतात. जांभळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचन चांगलं होत नाही त्याशिवाय आतड्यांवर सूजही येऊ शकते. कधीही जांभळं खाल्ल्यावर अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे.

हळद टाळा

यात जराही शंका नाही की, हळद एक आयुर्वेदिक औषधी आहे. जी आपल्या शरीराला अनेक फायदे देते. पण हळद जांभळांसोबत कधीच खाऊ नये. कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांवर रिअॅक्ट करतात. ज्यामुळे पोटदुखी, मळमळ आणि अॅलर्जी होण्याचा धोका राहतो.

दूध किंवा दुधाचे पदार्थ

जांभळं कधीही दूध किंवा दुधापासून तयार पदार्थांसोबत खाऊ नये. कारण असं केल्याने पोटात गडबड होऊ शकते. असं केलं तर जास्त शक्यता आहे की, तुम्हाला अपचन, गॅस, पोटदुखीची समस्या होऊ शकते. 

लोणचं खाणं टाळा

बरेच लोक जेवणासोबत रोज लोणचं खातात. पण जास्तीत जास्त डायटिशिअन लोणच्याला हेल्दी मानत नाहीत. याची टेस्ट चांगली लागत असली तरी यापासून शरीराला काहीच फायदे मिळत नसल्याचं ते सांगतात. जर जांभळं खाण्याआधी किंवा नंतर तुम्ही लोणचं खाल्लं तर तुम्हाला उलटी, गॅस आणि मळमळ होण्याची समस्या होऊ शकते.

Web Title: What should you avoid to eat after eating jamun or plum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.