आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत अपचन, गॅस, पोट फुगणं या समस्या खूप सामान्य झाल्या आहेत. अशा वेळी घरच्या घरीच केलेलं साधं पण प्रभावी पाचक म्हणजे आलं-लिंबाचं मिश्रण. पचनासाठी पाचक हा अगदी मस्त पर्याय असतो. (The best homemade option for digestion is pachak, a traditional recipe for ginger and lemon digestive juice.)हे पाचक केवळ चवीलाच चटपटीत नसून पचन सुधारण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते.
आलं-लिंबाचं पाचक तयार करणं खूप सोपं आहे. ताजं आलं स्वच्छ धुवून त्याचे छोटे तुकडे किंवा पातळ काप करुन घ्यावेत. त्यावर ताज्या लिंबांचा रस काढून घ्यावा. आलं मिक्सरमधून वाटून घ्या आणि गाळून त्याचा चोथा काढून टाका.
चवीनुसार थोडंसं मीठ आणि हवं असल्यास चिमूटभर काळं मीठ किंवा जिरे पूड घालावी. लिंबाचा रस घालायचा. हे मिश्रण थोडा वेळ मुरु दिलं की पाचक तयार होतं. हे जेवणाआधी किंवा जेवणानंतर थोड्या प्रमाणात प्यायचं. तर पचनाला चांगली चालना मिळते. कोमट पाण्यासोबत प्यायचे.
आल्यामध्ये दाह कमी करणारे आणि पचन सुधारणारे गुणधर्म असतात. ते पोटातील गॅस कमी करतं, अपचन दूर करतं आणि भूक वाढवण्यास मदत करतं. लिंबामध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असतं, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं. तसेच ते शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासही सहाय्य करतं.
या पाचकाचे फायदे अनेक आहेत. जेवणानंतर जडपणा वाटत असल्यास हे पाचक पोटाला आराम देते. सतत ढेकर येणं, अॅसिडिटी किंवा पोट फुगणं अशा समस्यांवरही ते उपयुक्त ठरतं. यामुळे भूक सुधारते आणि पचनक्रिया सुरळीत राहते.
याशिवाय, आलं-लिंबाचं पाचक नैसर्गिक असल्यामुळे त्याचे साइड इफेक्ट्स फारसे नसतात. रोजच्या आहारात थोड्या प्रमाणात याचा समावेश केल्यास पोटाच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात. फ्रिजमध्ये साठवून ठेवा. महिनाभर टिकते.
