पावभाजी हा घरातल्या सगळ्यांचा अतिशय आवडीचा पदार्थ. काही मोजके अपवाद सोडले तर पावभाजी जवळपास सगळ्यांनाच खूप आवडते. लहान मुलं तर पावभाजीचे पक्के फॅन आहेत. म्हणूनच तर हळदीकुंकू, वाढदिवस, किटी पार्टी, गेट टुगेदर असे लहान- मोठे कार्यक्रम असले की तिथे हमखास पावभाजी असतेच. कारण ती आवडीने खाल्ली जाते. पावभाजीतून बऱ्याच भाज्या मुलांच्या पोटात जातात, त्यामुळे ती वारंवार केली जाते. पण यात अनेकांना मुख्य अडचण अशी येते की विकत गाड्यावर मिळते तशी चटकदार चव घरी केलेल्या पावभाजीला येतच नाही (Street Style Pavbhaji Recipe). तुम्हालाही असंच वाटत असेल तर एकदा पुढे सांगितलेल्या काही टिप्स लक्षात ठेवून पावभाजी करून पाहा. अगदी अस्सल गाड्यावर मिळते तशीच चव येईल...(how to make street style pav bhaji at home?)
गाड्यावर मिळते तशी चटकदार पावभाजी घरी करण्यासाठी टिप्स..
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पावभाजी करण्यासाठी कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची या भाज्या वेगळ्या ठेवा आणि इतर भाज्या कुकरमध्ये घालून उकडून घ्या. भाज्या उकडत असताना त्यात थोडा पावभाजी मसाला आणि थोडं मीठ घालावं.
चहा- कॉफी पिण्याची सवय कमी करायची? ३ बदल करून पाहा, चहा- कॉफी पिणं आपोआप कमी होईल
२. गाड्यावर मिळते तशी पावभाजी घरी करायची असेल तर तिच्यातले टोमॅटोचे आणि सिमला मिरचीचे प्रमाण वाढवा. सिमला मिरचीचे प्रमाण वाढवले की पावभाजी जास्त चटकदार होते.
३. पावभाजी करण्यासाठी कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची कधीही उकडून घेऊ नका. गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि सिमला मिरची छान परतून घ्या. ती परतून झाली की मग त्यात आलं- लसूण पेस्ट आणि त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घाला.
१ महिन्यात केस गळणं थांबेल, केसांवर शिंपडा 'हे' पिवळं पाणी, काही दिवसांतच केस होतील लांबसडक
हे तिन्ही पदार्थ ७ ते ८ मिनिटे मंद आचेवर छान परतून घ्या. अधून मधून हलवत राहा. नंतर थोडं पाणी, पावभाजी मसाला, कसूरी मेथी असं सगळं घालून ते मॅश करा. कसुरी मेथीमुळे पावभाजीला आणखी मस्त टेस्ट येते. त्यानंतर त्यामध्ये उकडलेल्या भाज्या मॅश करून घाला. नंतर पुन्हा चवीनुसार मीठ, पावभाजी मसाला, लाल तिखट घाला. सगळ्यात शेवटी बटर घालून लिंबाचा रस पिळा आणि थोडा चाट मसाला घाला. भाजीला छान चटकदार चव येईल. ट्राय करून पाहा.
Web Summary : Craving street-style Pav Bhaji? Elevate your homemade version with these tips: Sauté onions and capsicum instead of boiling, increase tomato and capsicum quantity, and add Kasuri methi, butter, lemon juice and chaat masala at the end for a zesty flavor.
Web Summary : स्ट्रीट-स्टाइल पाव भाजी खाने का मन है? इन टिप्स के साथ अपने घर के संस्करण को बेहतर बनाएं: उबालने के बजाय प्याज और शिमला मिर्च को भूनें, टमाटर और शिमला मिर्च की मात्रा बढ़ाएं, और अंत में कसूरी मेथी, मक्खन, नींबू का रस और चाट मसाला डालकर चटपटा स्वाद दें।