lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > गाजर हलव्याचा चिखल होतो? नेमकं काय चुकतं म्हणून गाजर हलवा नाही लगदा होतो? करा फक्त ५ गोष्टी

गाजर हलव्याचा चिखल होतो? नेमकं काय चुकतं म्हणून गाजर हलवा नाही लगदा होतो? करा फक्त ५ गोष्टी

How to make Gajar Ka Halva: गाजराचा हलवा करायला जाता आणि गचका, लगदाच होऊन जातो,...  हलव्याचा असा चिखल हाेऊ द्यायचा नसेल आणि त्याला प्रॉपर गाजर (carrot recipe) का हलवा असंच ठेवायचं असेल, तर हलवा करताना या ५ चुका (5  common mistakes while doing gajar ka halva) करणं टाळा.. हलवा होईल परफेक्ट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 02:51 PM2021-12-10T14:51:08+5:302021-12-10T14:54:48+5:30

How to make Gajar Ka Halva: गाजराचा हलवा करायला जाता आणि गचका, लगदाच होऊन जातो,...  हलव्याचा असा चिखल हाेऊ द्यायचा नसेल आणि त्याला प्रॉपर गाजर (carrot recipe) का हलवा असंच ठेवायचं असेल, तर हलवा करताना या ५ चुका (5  common mistakes while doing gajar ka halva) करणं टाळा.. हलवा होईल परफेक्ट..

Recipe: How to make Gajar Ka Halva, perfect recipe in Marathi | गाजर हलव्याचा चिखल होतो? नेमकं काय चुकतं म्हणून गाजर हलवा नाही लगदा होतो? करा फक्त ५ गोष्टी

गाजर हलव्याचा चिखल होतो? नेमकं काय चुकतं म्हणून गाजर हलवा नाही लगदा होतो? करा फक्त ५ गोष्टी

Highlightsगाजर हलव्याचा चिखल, गचका, लगदा होऊ नये म्हणून हलवा करताना या चुका टाळा.....

गाजर का हलवा..... असं म्हणलं की अनेक जणांना रिमा लागू, सलमान खान आणि अजून काही हिंदी चित्रपट आठवतात.. गाजर का हलवा हिंदी चित्रपटांमध्ये कितीही घिसापीटा झाला असला तरी तो चाखण्याचा आनंद मात्र दरवेळी वेगळाच असतो. थंडीच्या दिवसात गाजराचा मौसम आला की हमखास घरोघरी तयार होणारा हा पदार्थ. शिवाय करायला अतिशय सोपा.. कुणाला गरम गरम हलवा आवडतो तर कुणाला थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा वाटतो. खाण्याची पद्धत कशी का असेना, पण आवडतो मात्र सगळ्यांना. तुम्हीही गाजराचा हलवा तयार करण्याच्या तयारीला लागला असाल तर हलवा करताना काय टाळलं पाहिजे आणि काय आवर्जून केलं पाहिजे, हे एकदा बघूनच घ्या. म्हणजे मग तुमचा गाजर हलवाही होईल एकदम परफेक्ट आणि चवदार .

 

कसा करायचा गाजराचा चवदार हलवा?
Gajar Halva recipe in Marathi

- गाजराचा हलवा करण्यासाठी आपल्याला १ किलो गाजर, ६५० मिली दूध, १०० ग्रॅम तूप, १० ते १५ बदामांचे काप, ३ ते ४ विलायची आणि १०० ते १५० ग्रॅम साखर हे साहित्य लागणार आहे.
- सगळ्यात आधी तर गाजर व्यवस्थित धुवून घ्या. त्याची साले हलक्या हाताने काढून टाका आणि गाजर किसून घ्या. गाजर जर खूप कडक असतील, तर गाजराच्या आत असणारा पिवळा, जास्त निब्बर भाग हलवा करण्यासाठी वापरू नका.

बाजरीची गरमागरम खरपूस भाकरी आणि तूप-गुळ; हिवाळ्यात दणकून खा, ४ समस्या १ उपाय


- कढई गॅसवर तापायला ठेवा. कढई तापल्यानंतर त्यात तूप टाका. या स्टेपमध्ये आपण जेवढं तूप हलवा करण्यासाठी घेतलं आहे, त्याच्या अर्धचं तूप टाकावं.
- तूप गरम झाल्यानंतर त्यात बदामाचे काप टाका. बदाम तूपात परतल्यानंतर ते कढईतून बाहेर काढून घ्या. तुपात परतलेले बदाम हलव्यामध्ये खूप जास्त छान लागतात, म्हणून अशाप्रकारे बदाम परतून घ्यावेत.

video credit- cookingshooking


- बदाम कढईतून काढल्यानंतर त्याच तुपात गाजराचा किस टाका आणि ३ ते ४ मिनिटे किस परतून घ्या. यापेक्षा जास्त परतू नका. 
- यानंतर त्यात दूध आणि विलायची टाका. दुध आटले गेले की त्यात साखर आणि उरलेले अर्धे तूप टाका.
- साखर विरघळेपर्यंत हलवा परतू द्या. त्यानंतर ३ ते ४ मिनिटांनी गॅस बंद करा. 
- हलवा झाल्यानंतर त्यावर बदामाचे तुपात परतून घेतलेले काप टाका आणि गरमागरम हलवा खाण्याचा आनंद घ्या. 

 

गाजर हलव्याचा चिखल, गचका, लगदा होऊ नये म्हणून हलवा करताना या चुका टाळा
Avoid these 5 mistakes while doing gajar ka halva

१. हलव्यासाठी वापरण्यात येणारे गाजर कोवळे असावेत. खूप जाडेभरडे नको.
२. हलव्यासाठी गाजर किसताना मोठ्या किसणीचा वापर करावा.

ढाबास्टाइल जायका जादू, नेहमीच्याच कांदा टोमॅटो भाजीला द्या स्पेशल तडका; मजा आ जायेगा!


३. तुप तापल्यानंतर जेव्हा गाजर कढईत टाकाल, तेव्हा ते ३ ते ४ मिनिटांपेक्षा अधिक शिजवू नका. 
४. साखर टाकल्यानंतर हलवा खूप जास्त शिजवू नये. त्याने तो लगदा होतो.
५. खूप जास्त दुध टाकणेही चुकीचे आहे. त्यामुळेही हलव्याचा चिखल होतो. दुध कमी टाकून तुम्ही त्याऐवजी खवा देखील वापरू शकता. 

 

Web Title: Recipe: How to make Gajar Ka Halva, perfect recipe in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.