lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > विकतसारखा मऊ- भरपूर फुललेला रवा ढोकळा करण्याची झटपट रेसिपी, पांढराशुभ्र ढोकळा खा-तोंडाला येईल चव

विकतसारखा मऊ- भरपूर फुललेला रवा ढोकळा करण्याची झटपट रेसिपी, पांढराशुभ्र ढोकळा खा-तोंडाला येईल चव

Rawa Dhokla Recipe : स्वंयपाकघरात असलेल्या बेसिक सामानापासून तुम्ही हा ढोकळा बनवू शकता. चवदार रवा ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 11:42 AM2023-09-11T11:42:00+5:302023-09-11T13:48:36+5:30

Rawa Dhokla Recipe : स्वंयपाकघरात असलेल्या बेसिक सामानापासून तुम्ही हा ढोकळा बनवू शकता. चवदार रवा ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया.

Rawa Dhokla Recipe : Instant sooji dhokla recipe how to make semolina dhokla at home | विकतसारखा मऊ- भरपूर फुललेला रवा ढोकळा करण्याची झटपट रेसिपी, पांढराशुभ्र ढोकळा खा-तोंडाला येईल चव

विकतसारखा मऊ- भरपूर फुललेला रवा ढोकळा करण्याची झटपट रेसिपी, पांढराशुभ्र ढोकळा खा-तोंडाला येईल चव

नाश्त्याला खाण्यासाठी ढोकळा हा सर्वाचाच आवडता पदार्थ आहे. (Cooking Tips) पिवळा चण्याचा डाळीचा ढोकळा तुम्ही नेहमीच खाल्ला असेल.  पण रव्याचा पांढराशुभ्र ढोकळाही चवीला अप्रतिम लागतो. (How to Make Rawa Dhokla) या ढोकळ्याची चव अनेकांना खूप आवडते. (How to make semolina dhokla at home) हा ढोकळा बनवायला ही सोपा असतो.  स्वंयपाकघरात असलेल्या बेसिक सामानापासून तुम्ही हा ढोकळा बनवू शकता. चवदार रवा ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Raws Dhokla Recipe)

साहित्य

रवा- १ कप

दही- १ कप

इनो- अर्धा चमचा

मीठ- चवीनुसार

साखर- १  चमचा

तेल- २ ते ३ टेबलस्पून

मोहोरी- २  चमचे

तीळ- १ चमचा

कढीपत्ता - १० ते १२

हिरव्या मिरच्या- २ ते ३

रवा ढोकळ्याची कृती

१) रवा ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात आधी रवा एका वाटीत काढून घ्या. घ्यात फेटलेले दही घाला. दह्यात आल्याची पेस्ट, हिरवी मिरची बारीक चिरून घाला आणि मिक्सर जारमध्ये घालून व्यवस्थित फेटून घ्या. त्यात वाटीभर बारीक रवा घालून मिक्स करा. त्यात थोडं थोडं पाणी घालून इडलीच्या बॅटप्रमाणे  जाडसर पीठ तयार करा. यासाठी तुम्हाला साधारण अर्धा ते कप पाणी लागेल. बॅटर तयार झाल्यानंतर १० मिनिटांसाठी वेगळे ठेवून द्या. 

कांदापोहे कडक तर कधी लगदा होतो? १ सोपी पद्धत वापरून करा मऊ-मोकळे, चवदार पोहे

२) ढोकळा बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात २ ते ३ कप पाणी गरम करायला ठेवा. भांड्याच्या आत एक स्टॅण्ड ठेवा. पाणी गरम करण्यासाठी असं भांडं ठेवा ज्यात ढोकळ्याचं भांडं आरामात बसेल. १० मिनिटांनी बॅटर फुलून तयार झाल्यांतर त्यात मीठ आणि पीठी साखर घालून मिक्स करा. आता या बॅटरमध्ये १ छोटा चमचा इनो किंवा फ्रुट सोडा घाला. त्यात १ छोटा चमचा पाणी घालून परत मिक्स करा. इनोक घातल्यानंतर बॅटर जास्त फेटू नका.  बॅटरमध्ये बबल्स दिसल्यानंतर फेटणं बंद  करा.

टपरीसारखा चहा घरी करण्याचं 'सोपं सिक्रेट'; कडक-जाडसर चहा, एक घोट घेताच मन होईल तृप्त

३) ढोकळा बनवण्यासाठी एक भांड घ्या. त्या भांड्याला तेल लावून घ्या त्यात मिश्रण भरा आणि व्यवस्थित सेट करून घ्या. पाणी उकळ्यानंतर ढोकळ्याचं भांडं त्यावर ठेवा. त्यानंतर भांडं झाकून २० मिनिटांसाठी ढोकळा शिजू द्या. २० मिनिटांनंतर ढोकळा व्यवस्थित फुललेला दिसेल. नंतर गॅस बंद करा. ढोकळ्याचं भांडं काढून जाळीदार स्टॅण्डवर  ठेवा. थोड्यावेळासाठी ढोकळा थंड होऊ द्या.  त्यानंतर ढोकळा प्लेटमध्ये काढून घ्या आणि ढोकळा चोकोनी आकारात कापा.

४) फोडणीसाठी एका खोलगट चमच्यात किंवा लहान कढईत २ टेबलस्पून तेल घालून गरम करा. गरम तेलात राई घालून फोडणी द्या. फोडणी देताच त्यात मोहोरी, कढीपत्ता, तीळ, लांब चिरलेल्या २ हिरव्या मिरच्या घाला. नंतर गॅस बंद करा. तयार फोडणी ढोकळ्यांवर घाला. तयार ढोकळा तुम्ही टोमॅटो सॉस किंवा चटणीबरोबर खाऊ शकता. 

Web Title: Rawa Dhokla Recipe : Instant sooji dhokla recipe how to make semolina dhokla at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.