Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > ना साखर ना कस्टर्ड पावडर, करा मस्त गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड-डाएटवालेही मारु शकतील ताव

ना साखर ना कस्टर्ड पावडर, करा मस्त गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड-डाएटवालेही मारु शकतील ताव

No sugar or custard powder, make a delicious strawberry fruit salad, this pink salad is delicious : चवीला एकदम मस्त असे गुलाबी फ्रुट सॅलेड करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2026 14:55 IST2026-02-02T14:52:35+5:302026-02-02T14:55:09+5:30

No sugar or custard powder, make a delicious strawberry fruit salad, this pink salad is delicious : चवीला एकदम मस्त असे गुलाबी फ्रुट सॅलेड करुन पाहा.

No sugar or custard powder, make a delicious strawberry fruit salad, this pink salad is delicious | ना साखर ना कस्टर्ड पावडर, करा मस्त गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड-डाएटवालेही मारु शकतील ताव

ना साखर ना कस्टर्ड पावडर, करा मस्त गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड-डाएटवालेही मारु शकतील ताव

साधे फ्रुट सॅलेड सगळे आवडीने खातात मात्र ते अजिबात पौष्टिक नसते. त्यात भरपूर साखर आणि पावडर असते. ज्यामुळे फळे असूनही पोषणपेक्षा फॅट्स जास्त असतात. मात्र ही स्ट्रॉबेरी क्रिमची रेसिपी पौष्टिकही आहे.  स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी ऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. (No sugar or custard powder, make a delicious strawberry fruit salad, this pink salad is delicious )हे घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवायला, त्वचा निरोगी ठेवायला आणि शरीरातील दाह कमी करायला मदत करतात. फ्रुट सॅलेडमध्ये इतर फळे असतील तर त्यातून वेगवेगळे जीवनसत्वे, खनिजे आणि नैसर्गिक साखर मिळते, जी शरीराला पटकन ऊर्जा देते.

क्रीममुळे या सॅलेडला मऊपणा आणि वेगळीच चव येते. क्रीममध्ये असलेले गूड फॅट्स शरीराला ऊर्जा देतात, त्यामुळे थोड्या प्रमाणात खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटते. सतत काहीतरी गोड खाण्याची इच्छा होत असेल तर हा अगदी मस्त पर्याय आहे. करायलाही अगदी सोपे आहे. काही मिनिटांत होतो. आकर्षक गुलाबी रंगामुळे लहान मुलेही कौतुकाने खातात. 

साहित्य 
मखाणा, स्ट्रॉबेरी, केळी, काजू, बदाम, दूध, मध, सफरचंद, डाळिंब

कृती
१. एका खोलगट पातेल्यात वाटीभर मखाणा घ्यायचा. त्यात वाटीभर स्ट्रॉबेरीचे तुकडे घालायचे. तसेच काजू घालायचे आणि बदामही घालायचे. सात ते आठ बदाम आणि तेवढेच काजू घाला. त्यात दोन वाट्या दूध ओतायचे आणि मिश्रण झाकून ठेवायचे. किमान पंधरा ते वीस मिनिटे भिजत ठेवा म्हणजे मखाणा मऊ होतो आणि इतर पदार्थही मुरतात. 

२. केळ्याचे गोलाकार काप करायचे. स्ट्रॉबेरीचे लहान तुकडे करायचे. सफरचंदाचेही लहान तुकडे करायचे. डाळिंब सोलून दाणे काढून घ्यायचे.  इतरही आवडती फळे वापरु शकता. शक्यतो अॅसिडीक फळे टाळा. 

३. भिजत ठेवलेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यात ओता. सगळे पदार्थ व्यवस्थित वाटले जातील याची काजी घ्यायची. जराशी घट्ट अशी पेस्ट तयार होते. पातळ करु नका तशीच राहू दे. एका पसरट वाडग्यात म्हणजेच बाऊलमध्ये ते मिश्रण ओतून घ्यायचे. त्यात मध घालायचे आणि ढवळून घ्यायचे. केळी, सफरचंद आणि डाळिंब्याचे दाणे त्यात घालायचे. ढवळून एकजीव करायचे. गार करुन खा किंवा तसेच खा. चवीला मस्त लागते आणि पौष्टिकही आहे. 

Web Title : स्ट्रॉबेरी फ्रूट सलाद: बिना चीनी, कस्टर्ड पाउडर, सेहतमंद रेसिपी

Web Summary : बिना चीनी या कस्टर्ड पाउडर के सेहतमंद स्ट्रॉबेरी फ्रूट सलाद बनाएं। विटामिन और एंटीऑक्सीडेंट से भरपूर यह रेसिपी रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाती है और तुरंत ऊर्जा प्रदान करती है। क्रीम स्वाद बढ़ाता है, जिससे पेट भरा रहता है और मीठा खाने की इच्छा शांत होती है। यह बनाने में आसान है और बच्चों को इसका गुलाबी रंग पसंद आता है।

Web Title : Strawberry Fruit Salad: Healthy, No Sugar, Custard Powder Recipe

Web Summary : Make a healthy strawberry fruit salad without sugar or custard powder. This recipe, packed with vitamins and antioxidants, boosts immunity and provides quick energy. The cream adds richness, keeping you full and satisfying sweet cravings. It's easy to make and kids love the pink color.