Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > साखर नाही, मैदा नाही! फक्त १ कप नाचणी अन् गुळाची करा पौष्टिक वडी; हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम!

साखर नाही, मैदा नाही! फक्त १ कप नाचणी अन् गुळाची करा पौष्टिक वडी; हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम!

उन्हाळ्यासाठी खास: पौष्टिक आणि थंडगार 'नाचणीची वडी'; मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उत्तम स्नॅक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 11:24 IST2026-03-27T11:20:28+5:302026-03-27T11:24:15+5:30

उन्हाळ्यासाठी खास: पौष्टिक आणि थंडगार 'नाचणीची वडी'; मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उत्तम स्नॅक!

No sugar, no flour! Make this nutritious bread with just 1 cup of chickpeas and jaggery; great for bone strength! | साखर नाही, मैदा नाही! फक्त १ कप नाचणी अन् गुळाची करा पौष्टिक वडी; हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम!

साखर नाही, मैदा नाही! फक्त १ कप नाचणी अन् गुळाची करा पौष्टिक वडी; हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम!

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे आणि मनाला तृप्त करणारे पदार्थ शोधणे म्हणजे एक कसरतच असते. अशातच जर तुम्हाला काहीतरी 'गोड' खायची इच्छा झाली, तर 'नाचणीची वडी' हा एक उत्तम पर्याय आहे. नाचणी ही निसर्गाकडून मिळालेले एक 'सुपरफूड' आहे, जे शरीराला थंड ठेवण्यास आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते. चला तर मग, उन्हाळ्यासाठी खास 'पौष्टिक नाचणीची वडी' कशी बनवायची, याची सोपी रेसिपी पाहूया. 

उन्हाळ्यात उष्णतेमुळे अनेकदा अशक्तपणा जाणवतो. अशा वेळी नाचणीतील कॅल्शिअम आणि लोहाचा पुरवठा शरीराला ताकद देतो. यात आपण गुळाचा वापर केला आहे, जो साखरेपेक्षा नक्कीच आरोग्यदायी आहे.

साहित्य :

नाचणीचे पीठ: १ कप

साल काढलेले फुटाणे (किंवा डाळवं): १ वाटी (मिक्सरला लावून बारीक केलेली पावडर)

गूळ: १ वाटी (बारीक चिरलेला)

तूप: अर्धी वाटी

पाणी: अर्धी वाटी

खोबऱ्याचा किस : अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट 

सजावटीसाठी: बदामाचे काप

वेलची पूड एक चमचा 

कृती : 

१. पीठ भाजून घेणे: सर्वात आधी एका कढईत थोडे तूप गरम करा. त्यात नाचणीचे पीठ घालून मंद आचेवर खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्या. नाचणीचे पीठ नीट भाजले गेले की त्याचा रंग किंचित गडद होतो. त्यात अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालून २ मिनिटे परतून घ्या. 

२. फुटाण्याची पावडर मिसळणे: पीठ भाजून झाल्यावर त्यात फुटाण्यांची (किंवा डाळव्याची) तयार केलेली पावडर टाका आणि पुन्हा २-३ मिनिटे परतून घ्या. यामुळे वडीला छान खुसखुशीतपणा येतो.

३. गुळाचा पाक तयार करणे: दुसरीकडे एका भांड्यात अर्धी वाटी पाणी आणि १ वाटी गूळ घ्या. गूळ पूर्णपणे विरघळू द्या आणि त्याला फक्त एक उकळी येऊ द्या. (लक्षात ठेवा, आपल्याला घट्ट पाक करायचा नाहीये, फक्त गूळ पाण्यात व्यवस्थित विरघळला पाहिजे). त्यातच वेलदोड्याची पूड टाका. 

४. मिश्रण एकत्र करणे: तयार गुळाचे पाणी गाळून नाचणीच्या मिश्रणात हळूहळू ओता. उरलेले तूपही यात मिसळा. मिश्रण कढई सोडू लागेपर्यंत आणि गोळा होईपर्यंत सतत ढवळत राहा.

५. वड्या पाडणे: एका ताटाला थोडे तूप लावून घ्या. तयार मिश्रण ताटात काढून एकसारखे थापा. वरून बदामाचे काप पसरवून हलके दाबा. मिश्रण कोमट असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्या. पूर्ण थंड झाल्यावर वड्या काढून हवाबंद डब्यात भरा.

नाचणीच्या वडीचे फायदे (Health Benefits):

नैसर्गिक थंडावा: नाचणी शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.

हाडांसाठी उत्तम: कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असल्याने लहान मुलांच्या वाढीसाठी आणि वृद्धांच्या हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर आहे.

झटपट ऊर्जा: गूळ आणि तुपामुळे उन्हाळ्यातील थकवा दूर होऊन त्वरित ऊर्जा मिळते. पाहा व्हिडिओ -


Web Title : हेल्दी रागी बर्फी रेसिपी: चीनी नहीं, सिर्फ रागी और गुड़!

Web Summary : इस पौष्टिक रागी बर्फी के साथ गर्मी को मात दें! रागी, गुड़ और घी से बनी, यह कैल्शियम से भरपूर मिठाई है जो तुरंत ऊर्जा प्रदान करती है और हड्डियों को मजबूत बनाती है। पारंपरिक मिठाइयों का एक स्वादिष्ट और स्वस्थ विकल्प।

Web Title : Healthy Ragi Barfi Recipe: No Sugar, Just Ragi and Jaggery!

Web Summary : Beat the heat with this nutritious ragi barfi! Made with ragi, jaggery, and ghee, it's a calcium-rich treat that provides instant energy and strengthens bones. A delicious and healthy alternative to traditional sweets.