Lokmat Sakhi >Food > ना बटाटे उकडण्याची गरज-ना कणिक मळण्याची झंझट, पाहा आलू पराठा करण्याची झटपट कृती

ना बटाटे उकडण्याची गरज-ना कणिक मळण्याची झंझट, पाहा आलू पराठा करण्याची झटपट कृती

No Knead No Roll Aloo Paratha, Liquid Dough Paratha,Trending Recipe : एक बटाटा-कपभर गव्हाचं पीठ, १० मिनिटाच्या आत तयार होतील खमंग आलू पराठा, टिफिनसाठी बेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2023 04:39 PM2023-12-17T16:39:48+5:302023-12-18T15:33:55+5:30

No Knead No Roll Aloo Paratha, Liquid Dough Paratha,Trending Recipe : एक बटाटा-कपभर गव्हाचं पीठ, १० मिनिटाच्या आत तयार होतील खमंग आलू पराठा, टिफिनसाठी बेस्ट

No Knead No Roll Aloo Paratha, Liquid Dough Paratha,Trending Recipe | ना बटाटे उकडण्याची गरज-ना कणिक मळण्याची झंझट, पाहा आलू पराठा करण्याची झटपट कृती

ना बटाटे उकडण्याची गरज-ना कणिक मळण्याची झंझट, पाहा आलू पराठा करण्याची झटपट कृती

नाश्त्याला पोहे, उपमा, साऊथ इंडियन पदार्थ आपण नेहमीच खातो. शिवाय काही जण नाश्त्यामध्ये चहा-चपाती खातात. पण हे सगळे पदार्थ खाऊन कंटाळा आला की आपण पराठे (Aloo ka Paratha) तयार करतो. पराठे अनेक प्रकारचे केले जातात. कोबी, मेथी यासह विविध स्टफिंगचा पराठा आपण खाल्लाच असेल. या सगळ्यात बटाट्याचा पराठा लोकं आवडीने खातात. पण बटाट्याचा पराठा करण्याची प्रोसेस खूप मोठी आहे.

बटाटा उकडण्यापासून ते कणिक मळण्यापर्यंत यात खूप वेळ जातो. जर आपल्याला कणिक न मळता, व बटाटे शिजत न घालता पराठे तयार करायचे असतील तर, एकदा इन्स्टंट आलू पराठा करून पाहा. या पराठ्याची चव प्रत्येकाला नक्कीच आवडेल, शिवाय करायलाही सोपा आहे. चला तर, झटपट पद्धतीचा आलू पराठा कसा तयार करायचा पाहूयात(No Knead No Roll Aloo Paratha, Liquid Dough Paratha,Trending Recipe).

इन्स्टंट आलू पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य(How to make Aloo ka Paratha)

बटाटे

गव्हाचं पीठ

कांदा

कोथिंबीर

आलं-लसूण पेस्ट

गरम मसाला

लाल तिखट

वाडगाभर सायीचे १५ मिनिटात तयार करा साजूक रवाळ तूप, विकतचे आणण्यापेक्षा घरी तयार केलेले तूप चांगले..

हळद

पाणी

मेथी

पांढरे तीळ

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये किसलेला बटाटा घ्या. त्यात एक कप गव्हाचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा आलं-लसूण पेस्ट, एक चमचा लाल तिखट, एक चमचा गरम मसाला, चिमुटभर हळद आणि पाणी घालून सरसरीत बॅटर तयार करून घ्या. पण बॅटर तयार करताना जास्त पातळ होणार नाही, याची काळजी घ्या. नंतर त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा. १० मिनिटानंतर त्यात बारीक चिरलेली मेथी घालून मिक्स करा.

तेलाचा एकही थेंब न वापरता करा पोह्याचे मेदू वडे, हेल्दी पण चमचमीत रेसिपी-वेटलॉससाठीही खूप उपयोगी

पराठे तयार करण्यासाठी पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात अर्धा चमचा तेल घालून पॅनवर पसरवा. त्यावर थोडे पांढरे तीळ घाला. तीळ तेलात तडतडल्यानंतर त्यात चमचाभर बॅटर घालून पसरवा, व त्यावर २ मिनिटांसाठी झाकण ठेवा. जेणेकरून वाफेवर पराठा शिजेल. २ मिनिटानंतर झाकण काढून दोन्ही बाजूने पराठा खरपूस भाजून घ्या. अशाप्रकारे  इन्स्टंट आलू पराठा खाण्यासाठी रेडी. आपण हा पराठा चटणी, सॉससोबत खाऊ शकता. 

Web Title: No Knead No Roll Aloo Paratha, Liquid Dough Paratha,Trending Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.