मुलांच्या शाळा सुरू झाल्यामुळे त्यांना रोज डब्यात काय द्यावं हा प्रश्न पडतोच. शिवाय मुलांना रोज रोज भाजी पोळी खाऊनही कंटाळा आलेला असतो. त्यामुळे त्यांना काही तरी वेगळं, चवदार हवं असतं. अशावेळी तुम्ही त्यांना अगदी झटपट मिक्स व्हेज पराठा करून देऊ शकता. हा पराठा करायला अतिशय सोपा आहे. त्यामध्ये पनीर आणि इतर भाज्या असल्यामुळे मुलांच्या पोटात भरपूर पौष्टिक पदार्थही जातात. भाजी आणि पोळी असं दोन्ही वेगवेगळं देण्यापेक्षा मिक्स व्हेज पराठ्याच्या रुपात एकत्र दिलं तर चवही बदलेल आणि मुलं आवडीने खातील (Mix Veg Paratha Recipe). नाश्त्यासाठीही हा पदार्थ अतिशय उत्तम आहे (easy and instant menu for breakfast and kids tiffin). हा पराठा कसा करायचा याची रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(how to make mix veg paratha?)
मिक्स व्हेज पराठा करण्याची रेसिपी
साहित्य
२ वाट्या कणिक
२ कांदे
१ बटाटा
१ वाटी किसलेली फुलकोबी
मंगळागौरीसाठी साडीवर मॅचिंग हिरव्या बांगड्या हव्या? बघा स्वस्तात मस्त बांगड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स
१ वाटी पनीरचे तुकडे
२ ते ३ हिरव्या मिरच्यांची पेस्ट, १ टीस्पून आल्याची पेस्ट
गरम मसाला, हळद, चाट मसाला, जीरेपूड प्रत्येकी एकेक टीस्पून
२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ
कृती
मिक्स व्हेज पराठा करण्यासाठी एका भांड्यामध्ये कणिक घ्या आणि थोडंसं तेल, मीठ घालून ती थोडी घट्ट मळून घ्या. यानंतर १० मिनिटांसाठी ती झाकून ठेवा.
यानंतर एका फुलकोबी स्वच्छ धुवून ती किसून घ्या. बटाटे उकडून मॅश करून घ्या. कांदा आणि कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्या.
आता एका मोठ्या भांड्यामध्ये किसलेली फुलकोबी, उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरच्या आणि आल्याची पेस्ट, पनीर घालून घ्या.
त्यामध्येच गरम मसाला, जिरेपूड घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्या. मीठ आणि चाट मसाला सगळ्यात शेवटी घालावा. कारण ते जर आधी घातले तर भाज्यांना पाणी सुटते.
सकाळी उठताच अंकिता लोखंडे 'हे' काम करते, म्हणूनच तर चाळिशीतही एवढी तरुण- सुंदर दिसते...
यानंतर भिजवलेल्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून ठेवा. त्यानंतर भाज्यांच्या मिश्रणात चाट मसाला आणि मीठ घाला. आता आलू पराठे लाटतो त्याप्रमाणे कणकेच्या गोळ्यांमध्ये भाज्यांचे सारण भरून पराठे लाटून खमंग भाजून घ्या.