Lokmat Sakhi >Food > Konkan Food : कोकणातील पारंपरिक आंबोळी करण्यासाठी कोरडे पीठ करण्याचे परफेक्ट प्रमाण, करा जाळीदार आंबोळी

Konkan Food : कोकणातील पारंपरिक आंबोळी करण्यासाठी कोरडे पीठ करण्याचे परफेक्ट प्रमाण, करा जाळीदार आंबोळी

Konkan Food: traditional Amboli flour, Konkan recipes, easy and tasty food : आंबोळी करण्यासाठी सुकं पीठ कसे करायचे जाणून घ्या. एकदम सोपी पद्धत ना भिजवायची घाई ना वाटायची.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2025 11:47 IST2025-07-03T11:44:31+5:302025-07-03T11:47:40+5:30

Konkan Food: traditional Amboli flour, Konkan recipes, easy and tasty food : आंबोळी करण्यासाठी सुकं पीठ कसे करायचे जाणून घ्या. एकदम सोपी पद्धत ना भिजवायची घाई ना वाटायची.

Konkan Food: traditional Amboli flour, Konkan recipes, easy and tasty food | Konkan Food : कोकणातील पारंपरिक आंबोळी करण्यासाठी कोरडे पीठ करण्याचे परफेक्ट प्रमाण, करा जाळीदार आंबोळी

Konkan Food : कोकणातील पारंपरिक आंबोळी करण्यासाठी कोरडे पीठ करण्याचे परफेक्ट प्रमाण, करा जाळीदार आंबोळी

आंबोळी आणि डोसा दोन्ही पदार्थ सारखेच आहेत असे अनेकांना वाटते. मात्र तसे नसून चवीला दोन्ही अगदी वेगळे असतात. (Konkan Food:  traditional Amboli flour, Konkan recipes, easy and tasty food)आंबोळीचे पीठ डोस्यासारखेच करत असाल तर पाहा आंबोळीचे पारंपरिक पीठ तयार करायची योग्य पद्धत. एकदा हे सुके पीठ तयार करुन ठेवले की फक्त पाण्यात भिजवायचे आणि आंबोळी लावायची. करायला एकदम सोपी. रात्रभर भिजवण्याची गरजही नाही. पाहा कसे करायचे सुके पीठ. 

साहित्य
तांदूळ, चणाडाळ, उडदाची डाळ, गहू, मेथी 

प्रमाण 
एक किलो तांदूळानुसार प्रमाण घेताना,
एक वाटी चणाडाळ
एक वाटी उडदाची डाळ
अर्धी वाटी गहू
दोन चमचे मेथी दाणे
दोन ते तीन चमचे जिरं 

कृती
१. तांदूळ स्वच्छ धुवायचे. दोन ते तीन पाण्यातून काढायचे आणि एकदम स्वच्छ धुवायचे. तांदूळ धुऊन झाल्यावर वाळत ठेवायचे. छान कोरडे वाळवायचे. पंख्याखालीही वाळतात. कॉटनच्या फडक्यावर वाळत घालायचे. एकमद नीट वाळल्यावर परतायची वगैरे गरज नाही. त्यात पाणी राहणार नाही एवढीच कालजी घ्यावी. 

२, तांदूळ वाळल्यावर त्यात एक वाटी चणाडाळ घालायची. तसेच एक वाटी उडदाची डाळ घालायची. त्यात अर्धी वाटी गहू घाला तसेच दोन लहान चमचे मेथीचे दाणे घाला. मेथी दाणे जास्त घालू नका पीठ कडू लागेल. मेथी दाणे घातल्यावर दोन ते तीन चमचे जिरे घालायचे. आंबोळीचे पीठ करण्यासाठीचे मिश्रण हे एवढेच असते.  लोकं आवडीनुसार आणखी पदार्थ घालतात. मात्र डोसा आणि आंबोळीचे पीठ जरा वेगळेच असते. 

३. तयार मिश्रण सरसरीत दळून आणायचे. आंबोळीचे सुके पीठ तयार आहे. एकदा केले की सहा महिने तर आरामात टिकते. त्यापुढेही टिकेलच. विकतच्या पीठापेक्षा असे पीठ वापरणे कधीही उत्तम.  

४. पीठाची आंबोळ लावताना ते पीठ पाण्यात भिजवायचे. त्यात हिरवी मिरची वाटून घालायची. आवडत असेल तर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मिश्रण छान फेटायचे. एकदम पातळ करायचे नाही जाडसरच ठेवायचे. तव्यावर जाडसर आंबोळी लावायची. आणि मस्त जाळीदार आंबोळी चटणी किंवा काळ्या वाटाण्याच्या उसळीसोबत खायची.  

Web Title: Konkan Food: traditional Amboli flour, Konkan recipes, easy and tasty food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.