Join us

जॅकी श्रॉफ सांगतोय, रांगड्या पद्धतीची कांदा- भेंडी भाजी! एकदम सोपी रेसिपी, पण चव झणझणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2025 19:10 IST

Kanda Bhindi Recipe By Jackie Shroff: अभिनेता जॅकी श्रॉफ सांगतो आहे त्यानुसार थोड्या वेगळ्या पद्धतीची ही कांदा- भेंडी एकदा खाऊन पाहाच..(onion bhindi sabji recipe in Marathi)

ठळक मुद्दे ही भाजी जास्त हलवू नये असंही जॅकी श्रॉफ सांगतो.. ही सोपी रेसिपी एकदा ट्राय करून पाहाच.. 

भेंडीची भाजी लहान मुलांची अतिशय आवडीची. साधी फोडणी करायची आणि त्यात मीठ घालून भेंडी परतून घ्यायची.. या पद्धतीने केलेली भेंडी बहुतांश लहान मुलं खूप आवडीने खातात. भेंडी हाडांसाठी खूप चांगली असते. त्यामुळे लहान मुलांची हाडं बळकट होण्यासाठी त्यांनी भेंडी खाणं चांगलंच असतं. पण अशा पद्धतीने केलेली भेंडी घरातल्या मोठ्या मंडळींना मात्र अजिबात आवडत नाही. त्यांना ती खूपच सपक वाटते (Kanda Bhindi Recipe By Jackie Shroff). म्हणूनच घरातल्या मोठ्या मंडळींसाठी अभिनेता जॅकी श्रॉफ सांगतो तशी थोड्या वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी करून पाहा (how to make kanda bhendi sabji?). कांदा- भिंडी सुखा असं नाव त्याने या रेसिपीला दिली असून ही रेसिपी चांगलीच व्हायरल आहे..(onion bhindi sabji recipe in Marathi )

जॅकी श्रॉफ सांगतो कांदा- भेंडी भाजीची रेसिपी

 

साहित्य

पावशेर भेंडी

२ मध्यम आकाराचे कांदे

तेलकट- तुपकट न खाताही कोलेस्टेरॉल वाढतं? तज्ज्ञ सांगतात ५ गोष्टी करा- कोलेस्टेरॉल कमी होईल 

१ टीस्पून बारीक चिरलेला लसूण

फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद, हिंग

चवीनुसार तिखट आणि मीठ

 

कृती

कांदा- भेंडी करण्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्या. त्यानंतर भेंडीची मागची आणि पुढची देठं काढून ती चिरून घ्या. 

पत्ताकोबी, फुलकोबीची भाजी करताना ४ चुका टाळा! तब्येत बिघडून होऊ शकतो 'हा' भयानक त्रास

यानंतर कांद्याच्याही थोड्या मोठ्या चौकोनी आकाराच्या फोडी करून घ्या.

आता गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर तेल, मोहरी, हिंग, जिरे, हळद घालून फोडणी करून घ्या.

 

फोडणी करून झाल्यानंतर कढईमध्ये कांदा, भेंडी आणि लसूण एकाचवेळी घाला. पण ते नेमके कशा पद्धतीने घालायचे याचीही खास पद्धत जॅकी श्रॉफने सांगितली आहे. 

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी ५ फळं खाणं धोक्याचं, रक्तातील साखर वाढून तब्येत बिघडण्याचा धोका

त्याच्या रेसिपीनुसार कढईच्या अगदी मध्यभागी कांदा घाला. कांद्याच्या आजुबाजुला भेंडी घाला आणि कांद्यावरच बारीक चिरलेला लसूण घाला. या भाजीवर तिखट, मीठ, मसाले घालावे. ही भाजी जास्त हलवू नये असंही जॅकी श्रॉफ सांगतो.. ही सोपी रेसिपी एकदा ट्राय करून पाहाच.. 

 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सभाज्याजॅकी श्रॉफ