Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > चवीला आंबट-गोड आणि दिसायला रॉयल! १० मिनिटांत होईल रिफ्रेशिंग काला खट्टा ड्रिंक, चव चाखताच आठवेल लहानपणीचा गोळा

चवीला आंबट-गोड आणि दिसायला रॉयल! १० मिनिटांत होईल रिफ्रेशिंग काला खट्टा ड्रिंक, चव चाखताच आठवेल लहानपणीचा गोळा

Sweet and sour Jamun summer cooler: Natural Kala Khatta drink : रिफ्रेशिंग काला खट्टा ड्रिंक कसं बनवायचं पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2026 09:30 IST2026-04-28T09:30:00+5:302026-04-28T09:30:02+5:30

Sweet and sour Jamun summer cooler: Natural Kala Khatta drink : रिफ्रेशिंग काला खट्टा ड्रिंक कसं बनवायचं पाहूया.

Jamun shots recipe with black salt Refreshing Kala Khatta mocktail at home Summer special Jamun juice recipe Homemade Kala Khatta syrup for gola Healthy Java Plum drink recipe Marathi | चवीला आंबट-गोड आणि दिसायला रॉयल! १० मिनिटांत होईल रिफ्रेशिंग काला खट्टा ड्रिंक, चव चाखताच आठवेल लहानपणीचा गोळा

चवीला आंबट-गोड आणि दिसायला रॉयल! १० मिनिटांत होईल रिफ्रेशिंग काला खट्टा ड्रिंक, चव चाखताच आठवेल लहानपणीचा गोळा

उन्हाळ्याचे दिवस आले की वेध लागतात ते सुट्ट्यांचे आणि बालपणीच्या आठवणीचे. रणरणत्या उन्हात शाळेबाहेर मिळणारा तो चटकदार काला खट्टा बर्फाचा गोळा आजही आपल्या सर्वांच्या जिभेवर रेंगाळत असतो. तोच तो चवीला आंबट- गोड जिभेला काळा-जांभळा रंग देणारा स्वाद. रिफ्रेशिंग ड्रिंक म्हणजे जांभळापासून बनवलेले 'जांभूळ सरबत' किंवा 'काला खट्टा मॉकटेल' (Refreshing Kala Khatta mocktail)
जांभूळ हे फळ केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी मानलं जातं. या फळाचा नैसर्गिक रंग आणि चव या पेयाला एक रॉयल लूक देतात. (Summer special Jamun juice) बाजारात मिळणाऱ्या प्रिझर्वेटिव्ह  सिरमपेक्षा घरच्या घरी ताज्या जांभुळांपासून बनवलेले हे सरबत उष्णतेवर मात करण्यासाठी सगळ्यात चांगले आहे. उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी किंवा दुपारच्या वेळी आपण हे पिऊ शकतो. (Ambat god jambul sharbat recipe) जांभूळ सरबत एकदा चाखले की आपल्याला नक्कीच बालपणीच्या त्या गोळ्याची आठवण येईल. पाहूया हे रिफ्रेशिंग पेय बनवण्याची सोपी कृती. 

सत्यनारायण पूजेसाठी करा मऊ मँगो शिरा, १५ मिनिटांत होईल प्रसाद- पाहा परफेक्ट प्रमाण आणि सोपी कृती

साहित्य 

जांभूळ - अर्धा किलो 
पाणी - २ ते ३ मोठे चमचे
साखर - १ कप 
भाजलेली जिरे पूड - १ छोटा चमचा
काळे मीठ - दीड चमचा
लिंबाचा रस - २ चमचे
चाट मसाला - १ छोटा चमचा

कृती 

1. सगळ्यात आधी जांभूळ स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून टाका. जांभळाचा गर आणि २ ते ३ चमचे पाणी मिक्सरमध्ये घालून त्याचा पल्प तयार करा. 

2. आता ही प्युरी एका कढईत काढून त्यात साखर मिसळा. मध्यम आचेवर १० ते १५ मिनिटे शिजवा, जोपर्यंत मिश्रण थोडे घट्ट होत नाही. 

3. यानंतर त्यात भाजलेली जिरे पूड, काळे मीठ, चाट मसाला आणि लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा. मिश्रण थंड झाल्यावर गाळणीने गाळून घ्या. काला खट्टा सिरप तयार आहे. 

4. ३ मोठे चमचे तयार केलेली जांभूळ प्युरी घ्या. त्यात १/४ कप पाणी किंवा सोडा मिक्स करा. हे मिश्रण पॉप्सिकल मेकरमध्ये ओता आणि सेट होण्यासाठी ७ ते ८ फ्रीजरमध्ये ठेवा.  तयार पॉप्सिकल बाहेर काढून त्यावर चाट मसाला भुरभुरा.  

5. काचेच्या ग्लासात जांभळाची प्युरी, लिंबू आणि पॉप्सिकल ठेवा. वरुन सोडा घाला, चमच्याने ढवळून घ्या. तयार होईल रिफ्रेशिंग काला खट्टा ड्रिंक. 
 


Web Title : मीठा, खट्टा, शाही काला खट्टा पेय: मिनटों में बचपन की यादें।

Web Summary : ताज़े जामुन से बना काला खट्टा पेय गर्मी को मात देने का आसान तरीका! यह स्वादिष्ट और बचपन की यादों से भरा पेय 10 मिनट में बनकर तैयार हो जाता है।

Web Title : Sweet, sour, royal Kala Khatta drink: A childhood memory in minutes.

Web Summary : Beat the summer heat with a refreshing Kala Khatta drink! This easy recipe uses fresh Jamun fruit to create a delicious, nostalgic beverage in just 10 minutes, reminiscent of childhood treats.