खडीसाखर हा गोड पदार्थ असला तरी तो आरोग्यासाठी चांगला मानला जातो. साधी साखर खाण्याऐवजी खडीसाखर खाणे जास्त फायद्याचे ठरते. कारण खडीसाखर साखरेपेक्षा अत्यंत कमी प्रक्रियेतून तयार होत असल्याने तिच्यात अशुद्धता कमी असते. (is eating mishri instead of sugar really healpful ? see how it works, is it really healthy or just same as sugar )साखरेपेक्षा तिचे कण मोठे, चव सौम्य आणि प्रकृती थंड असल्याने शरीरावर ती सौम्यपणे काम करते. विशेषतः घसा खवखवणे, आवाज बसणे किंवा खोकला वाढल्यावर खडीसाखर तोंडात ठेवून चघळल्यास त्वरित आराम मिळतो. तिचा थंडावा घशाला शांत करतो आणि जंतुसंसर्गावरही परिणाम करतो म्हणून गायक, शिक्षक किंवा ज्यांचे काम सतत बोलण्याचे असते अशा लोकांसाठी खडीसाखर उपयोगी ठरते. त्यामुळेच गायनाच्या कार्यक्रमांत वाटीभर खडीसाखर ठेवलेली असते.
सामान्य पांढरी साखर अतिशय प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे तिच्यात पोषणमूल्य नसतात आणि ती केवळ कॅलरीजच पुरवते. त्यामुळे वजन तर फार वाढते. परंतु खडीसाखर तुलनेने कमी प्रक्रिया केलेली असल्यामुळे ती शरीराला पटकन ऊर्जा देत असली तरी तीव्र गोडपणा देत नाही. तसेच अति साखरेमुळे होणारे दुष्परिणाम जसे की अचानक रक्तातील साखर वाढणे, पचन बिघडणे किंवा जास्त कॅलरी घेणे ही समस्या खडीसाखरेत तुलनेने थोडी कमी असते.
खडीसाखरीला मिश्री म्हणतात आणि तिच्यात घसा, छाती आणि मन शांत ठेवणारे गुण आहेत असे मानले जाते. गरम हळदीचे दूध, कढा, किंवा गरम पाण्यात खडीसाखर घातल्यास आवाज खुलतो, खोकला कमी होतो आणि कफ सुटायला मदत होते. शरीरात उष्णता वाढली असेल तर खडीसाखर घेतल्याने हलका थंडावा मिळतो, म्हणून ती उन्हाळ्यातही उपयोगी ठरते.
तरी लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे खडीसाखरही साखरेचाच प्रकार आहे. त्यामुळे मधुमेह, वजन वाढणे किंवा जास्त गोड खाण्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी तिचे प्रमाण मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी वापरली, तर खडीसाखर घशाच्या त्रासासाठी एक उत्तम, सोपा आणि घरगुती उपाय ठरते.
