Lokmat Sakhi >Food > १ कच्चा बटाटा घ्या ५ मिनिटांत करा क्रिस्पी डोसा; बटाटा डोशाची सोपी रेसिपी-झटपट बनेल नाश्ता

१ कच्चा बटाटा घ्या ५ मिनिटांत करा क्रिस्पी डोसा; बटाटा डोशाची सोपी रेसिपी-झटपट बनेल नाश्ता

Instant Potato Dosa (Instant Dosa kasa Karaycha) : कमीत कमी वेळेत तुम्ही कुरकुरीत बटाट्याचा  डोसा बनवू शकता. यासाठी तुम्हाला बटाटा उकडावा लागणार नाही की बटाट्याचा किस करावा लागणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 04:02 PM2023-11-26T16:02:18+5:302023-11-26T16:24:13+5:30

Instant Potato Dosa (Instant Dosa kasa Karaycha) : कमीत कमी वेळेत तुम्ही कुरकुरीत बटाट्याचा  डोसा बनवू शकता. यासाठी तुम्हाला बटाटा उकडावा लागणार नाही की बटाट्याचा किस करावा लागणार नाही.

Instant Potato Dosa : Easy recipe raw potato dosa instant breakfast dosa recipe in marathi | १ कच्चा बटाटा घ्या ५ मिनिटांत करा क्रिस्पी डोसा; बटाटा डोशाची सोपी रेसिपी-झटपट बनेल नाश्ता

१ कच्चा बटाटा घ्या ५ मिनिटांत करा क्रिस्पी डोसा; बटाटा डोशाची सोपी रेसिपी-झटपट बनेल नाश्ता

घरातील लहान मुलांना आणि मोठ्या माणसांनाही नाश्याला, डब्यात नेण्यासाठी रोज काय नवीन करायचं हे सुचणं फार अवघड. (Cooking Hacks)  तेच तेच खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो अशावेळी चटपटीत आणि रोजच्यापेक्षा नवीन पदार्थ खाल्ले तर जेवणाची चववही वाढते आणि खाणारेही आवडीने खातात. वेगळं काहीतरी करायचं म्हणजे जास्त वेळ लागणार आणि सकाळच्या घाईच्यावेळी कोणालाही इतका वेळ नसतो की ते वेगवेगळे  पदार्थ ट्राय करतील. (Potato Dosa Recipe)

कमीत कमी वेळेत तुम्ही कुरकुरीत बटाट्याचा  डोसा बनवू शकता. यासाठी तुम्हाला बटाटा उकडावा लागणार नाही की बटाट्याचा किस करावा लागणार नाही. २ मिनिटांत बटाट्याच्या फोडी करून तुम्ही पटकन चवदार डोसा बनवू शकता. बटाट्याचा डोसा कसा करायचा ते पाहूया. (Instant Potato Dosa Recipe)

कच्च्या बटाट्याचा डोसा कसा करायचा?   (Instant Potato Dosa Recipe in Marathi)

१) सगळ्यात आधी २ मध्यम आकाराचे  बटाटे  स्वच्छ धुवून पुसून  त्याची सालं काढून घ्या. त्याचे बारीक काप करून घ्या. बटाट्याचे काप एका बाऊलमध्ये काढून त्यात मिरच्या, कोथिंबीर, आल्याचे काप, कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये बारीक दळून घ्या.

१ वाटी तांदूळाचा करा सॉफ्ट-स्पॉन्जी पांढरा ढोकळा; 5 मिनिटांत बनेल ढोकळा अगदी मार्केटसारखा

२) पातळ मिश्रण तयार झाल्यानंतर यात १ कप तांदळाचे पीठ घाला. गरजेनुसार थोडं-थोडं पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या. त्यात अर्धा कप किसलेलं गाजर, १ बारीक चिरलेला कांदा  घाला. चमचाभर लाल तिखट, १ चमचा चाट मसाला, १ चमचा मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा तीळ घालून एकजीव करून घ्या. हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित हलवून  ५ मिनिटांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून द्या.

३) एका नॉनस्टिक पॅनवर २ ते ३ चमचे तेल पसरवून डोश्याचे बॅटर घालून गोलाकार पसरवा. डोसा एका बाजूने शिजायला  आल्यानंतर त्यावर तेल घालून डोसा पलटून घ्या. दुसऱ्या बाजूनेही डोसा खरपूस भाजून घ्या. गरजेनुसार तुम्ही चमच्या साहाय्याने तेल घालू शकता. हा डोसा तुम्ही चटणी,  सॉस  किंवा सांबारबरोबर खाऊ शकता.

Web Title: Instant Potato Dosa : Easy recipe raw potato dosa instant breakfast dosa recipe in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.