बरेच लोक पेरू खात नाहीत, त्याकडे दुर्लक्ष करतात. हे फळ जवळपास १२ महिने उपलब्ध असतं आणि म्हणूनच लोक ते खाण्याऐवजी हंगामी फळं खाणं अधिक फायदेशीर मानतात. पेरूमध्ये इतके पोषक तत्व असतात हे जर तुम्हाला त्याबद्दल माहित असेल तर तुम्हीही दररोज पेरू खाण्यास सुरुवात कराल.
पेरूमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी12, बी6, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई सारखे अनेक पोषक घटक आढळतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यात संत्र्यांपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असतं.
वजन कमी करण्यास उपयुक्त
पेरूमध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यात भरपूर फायबर असतं जे वजन कमी करण्यास खूप मदत करतं. त्यात फायबरचं प्रमाण जास्त असल्याने पोट भरल्यासारखं वाटतं.
त्वचेसाठी फायदेशीर
पेरूमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पेरू खाल्ल्याने तुमची त्वचा चमकदार होते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स तुमच्या चेहऱ्याची चमक वाढवतात. ते त्वचेला टोन करण्यास मदत करतात.
पेरूचे असंख्य फायदे
पेरूचे असंख्य फायदे आहेत. पेरू तुम्हाला तरुण ठेवण्यास मदत करू शकतं. त्यात त्वचेसाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्वे, मिनरल्स आणि इतर पोषक घटक असतात. जर तुमच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे काही समस्या येत असतील तर पेरू खाल्ल्याने ती समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते. व्हिटॅमिन सीमुळे, पेरू कोलेजन प्रोडक्शन देखील वाढवतं, जे तुमची त्वचा घट्ट ठेवतं.