lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > वेफर्सचे २ पुडे अन् एक कांदा, पाहा वेफर्सची चमचमीत आमटी करण्याची सोपी कृती, चव अशी की म्हणाल लाजवाब

वेफर्सचे २ पुडे अन् एक कांदा, पाहा वेफर्सची चमचमीत आमटी करण्याची सोपी कृती, चव अशी की म्हणाल लाजवाब

How to make Wafers Curry Recipe, check out new Recipe : वेफर्स चाट खाल्लं असेल, पण कधी वेफर्सची आमटी खाऊन पाहिली आहे का? भातासोबत लागते अप्रतिम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2024 04:55 PM2024-01-21T16:55:39+5:302024-01-21T16:57:19+5:30

How to make Wafers Curry Recipe, check out new Recipe : वेफर्स चाट खाल्लं असेल, पण कधी वेफर्सची आमटी खाऊन पाहिली आहे का? भातासोबत लागते अप्रतिम..

How to make Wafers Curry Recipe, check out new Recipe | वेफर्सचे २ पुडे अन् एक कांदा, पाहा वेफर्सची चमचमीत आमटी करण्याची सोपी कृती, चव अशी की म्हणाल लाजवाब

वेफर्सचे २ पुडे अन् एक कांदा, पाहा वेफर्सची चमचमीत आमटी करण्याची सोपी कृती, चव अशी की म्हणाल लाजवाब

वेफर्स (Wafers Curry) कोणाला नाही आवडत. स्नॅक्स म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आधी वेफर्स येतात. वेफर्समध्ये देखील अनेक प्रकार आहे. काहींना सॉल्टेड तर काहींना क्रिम अँड ऑनियन फ्लेवर्सचे वेफर्स आवडतात. सध्या बरेच जण वेफर्सवर देखील प्रयोग करताना दिसून येतात. वेफर्स चाट सर्वत्र प्रसिद्ध आहे. पण आपण कधी वेफर्सची चमचमीत करी करून पाहिली आहे का?

'वेफर्स करी' पदार्थाचं नाव ऐकून जरा विचित्र वाटलं असेल, पण हा पदार्थ खाल्ल्याने जिभेची चव वाढेल एवढं मात्र खरं. फोडणीमध्ये मसाला मिक्स करून, आपण त्यात आपल्या आवडीचे विविध प्रकारचे फ्लेवर्ड वेफर्स मिक्स करू शकता (Cooking Tips). जर आपल्याला रोजची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, एकदा वेफर्स करी बनवायला काही हरकत नाही(How to make Wafers Curry Recipe, check out new Recipe).

वेफर्स करी करण्यासाठी लागणारं साहित्य

तेल

दालचिनी

काळी मिरी

वेलची

कढीपत्ता

कांदा

आलं-लसूण पेस्ट

तांदळाची झटपट खीर, सोपी रेसिपी आणि झटपट पक्वान्न - प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास पदार्थ

टोमॅटो

मीठ

हळद

लाल तिखट

गरम मसाला

वेफर्स

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम, एका कढईत २ चमचे तेल घाला. नंतर त्यात दालचिनी, काळी मिरी, वेलची, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून परतवून घ्या. कांदाचा रंग लालसर झाल्यानंतर त्यात आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो, चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद, एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून मिक्स करा. त्यावर २ मिनिटांसाठी झाकण ठेवा. जेणेकरून कांदा आणि टोमॅटो शिजला जाईल. २ मिनिटानंतर त्यात एक कप पाणी घाला.

थंड वातावरणामुळे पीठ खराब? ३ भन्नाट किचन टिप्स, पिठात किडे - अळ्या होणार नाहीत

पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. त्यात आपल्या आवडीचे वेफर्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. अशा प्रकारे हटके वेफर्सची आमटी खाण्यासाठी रेडी. आपण या करीचा आस्वाद चपाती किंवा वाफाळलेल्या भातासह लुटू शकता.

Web Title: How to make Wafers Curry Recipe, check out new Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.