lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > २ बटाटे-२ टोमॅटो, तरला दलाल स्पेशल 'बटाटा मुसल्लम' ही अनोखी डिश नक्की करायची कशी? पाहा युनिक डिशची सोपी कृती

२ बटाटे-२ टोमॅटो, तरला दलाल स्पेशल 'बटाटा मुसल्लम' ही अनोखी डिश नक्की करायची कशी? पाहा युनिक डिशची सोपी कृती

How to make Tarla Dalal's Batata Musallam at home : बटाट्याची तिच तिच भाजी खाऊन कंटाळला असाल तर, कमी साहित्यात १० मिनिटात करा चमचमीत 'बटाटा मुसल्लम'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2023 01:18 PM2023-11-22T13:18:37+5:302023-11-22T13:19:00+5:30

How to make Tarla Dalal's Batata Musallam at home : बटाट्याची तिच तिच भाजी खाऊन कंटाळला असाल तर, कमी साहित्यात १० मिनिटात करा चमचमीत 'बटाटा मुसल्लम'

How to make Tarla Dalal's Batata Musallam at home | २ बटाटे-२ टोमॅटो, तरला दलाल स्पेशल 'बटाटा मुसल्लम' ही अनोखी डिश नक्की करायची कशी? पाहा युनिक डिशची सोपी कृती

२ बटाटे-२ टोमॅटो, तरला दलाल स्पेशल 'बटाटा मुसल्लम' ही अनोखी डिश नक्की करायची कशी? पाहा युनिक डिशची सोपी कृती

दिवंगत तरला दलाल (Tarla Dalal) या एक सुप्रसिद्ध शेफ, लेखक आणि कुकिंग शोच्या होस्ट होत्या. त्यांचे पदार्थ भारतातचं नसून परदेशातही फेमस होते. त्यांनी सर्वात मोठी भारतीय फूड वेबसाईट देखील चालवली. त्यांच्या पाककृती सुमारे २५ मासिकांमध्ये प्रकाशित झाले. त्या पहिल्या गृहिणी ठरल्या ज्यांचा स्वयंपाकासाठी विशेष पद्मश्री (Padmashri) पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

विशेष म्हणजे त्यांच्या जीवनावर आधारित व हुमा कुरेशी (Huma Qurehi) अभिनित तरला नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. तरला या एक प्रसिद्ध शाकाहारी मास्टर शेफ होते. त्यामुळे त्यांनी व्हेजमध्ये विविध प्रकारच्या डिशेस तयार केले. त्यातीलचं एक म्हणजे बटाटा मुसल्लम. बटाटा (Potato) कोणाला नाही आवडत, पण रोजची तिच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, बटाटा मुसल्लम ही रेसिपी नक्कीच करून पाहा(How to make Tarla Dalal's Batata Musallam at home).

बटाटा मुसल्लम करण्यासाठी लागणारं साहित्य

बटाटे

टोमॅटो

लाल सुक्या मिरच्या

रोजची भाजी खाऊन कंटाळलात? वाटीभर काळ्या वाटाण्याची करा चमचमीत उसळ, चवीला भारी-हेल्दी रेसिपी

काजू

बदाम

मीठ

लाल तिखट

हळद

गरम मसाला

तेल

जिरं

तमालपत्र

कसुरी मेथी

फ्रेश क्रीम

कृती

सर्वप्रथम, पेस्ट तयार करा. यासाठी मिक्सरच्या भांड्यात २ बारीक चिरलेले टोमॅटो, ३ ते ४ लाल सुक्या मिरच्या, एक छोटा कप भिजलेले काजू आणि बदाम, चवीनुसार मीठ, लाल तिखट, चिमुटभर हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला  घालून पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना पाणी घालू नका. कढईत ४ ते ५ चमचे तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. दुसरीकडे बटाट्याचे मध्यम आकाराचे चौकोनी काप करा, व गरम तेलात तळून घ्या. तळलेले बटाटे एका बाऊलमध्ये काढून घ्या.

बहुगुणी आवळ्याची ५ मिनिटात करा चटकदार चटणी, हिवाळ्यात खायलाच हवी, आरोग्यासाठी उत्तम

नंतर कढईत २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, २ तमालपत्र व तयार पेस्ट घालून परतवून घ्या. जोपर्यंत पेस्टमधून तेल सुटत नाही, तोपर्यंत चमच्याने ढवळत राहा. नंतर त्यात एक टेबलस्पून कसुरी मेथी आणि फ्राईड बटाटे घालून मिक्स करा. मग त्यात थोडं पाणी आणि २ चमचे फ्रेश क्रीम घालून मिक्स करा. वाफेवर २ मिनिटांसाठी भाजी शिजवून घ्या, व तयार भाजी एका बाऊलमध्ये काढून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे बटाटा मुसल्लम खाण्यासाठी रेडी.

Web Title: How to make Tarla Dalal's Batata Musallam at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.