lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > रोजची भाजी खाऊन कंटाळलात? वाटीभर काळ्या वाटाण्याची करा चमचमीत उसळ, चवीला भारी-हेल्दी रेसिपी

रोजची भाजी खाऊन कंटाळलात? वाटीभर काळ्या वाटाण्याची करा चमचमीत उसळ, चवीला भारी-हेल्दी रेसिपी

How To Make Kala Chana Usal in Maharashtrian Style : कांदा-टोमॅटो घालून घरीच करा हॉटेलस्टाईल काळ्या वाटाण्याची उसळ, १० मिनिटात उसळ रेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2023 12:07 PM2023-11-21T12:07:51+5:302023-11-21T12:08:34+5:30

How To Make Kala Chana Usal in Maharashtrian Style : कांदा-टोमॅटो घालून घरीच करा हॉटेलस्टाईल काळ्या वाटाण्याची उसळ, १० मिनिटात उसळ रेडी

How To Make Kala Chana Usal in Maharashtrian Style | रोजची भाजी खाऊन कंटाळलात? वाटीभर काळ्या वाटाण्याची करा चमचमीत उसळ, चवीला भारी-हेल्दी रेसिपी

रोजची भाजी खाऊन कंटाळलात? वाटीभर काळ्या वाटाण्याची करा चमचमीत उसळ, चवीला भारी-हेल्दी रेसिपी

उत्तम आरोग्यासाठी कडधान्य खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. कडधान्य खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. मुग, मटकी, काबुली चणे यासह काळे वाटाणे (Kala Chana) देखील आरोग्याला पौष्टीक घटक प्रदान करतात. शरीराच्या योग्य वाढीसाठी आहारात सकस आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. त्यामुळे आहारात चवीला उत्तम व आरोग्यासाठी हेल्दी काळ्या वाटाण्याचा समावेश करा.

कोकणी माणसाच्या ताटात हमखास काळ्या वाटाण्याची उसळ असतेच. बरेच जण काळ्या वाटण्याची उसळ, भाजी किंवा आमटी करून खातात. पण घरात परफेक्ट हॉटेलस्टाईल काळ्या वाटाण्याची तयार होत नाही. जर आपल्याला हॉटेलस्टाईल काळ्या वाटाण्याची उसळ (Cooking Tips) तयार करायची असेल तर, ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. चला तर मग हॉटेलस्टाईल काळ्या वाटाण्याची उसळ कशी करायची पाहूयात(How To  Make Kala Chana Usal in Maharashtrian Style).

साहित्य

काळे वाटाणे

तेल

जिरं

बहुगुणी आवळ्याची ५ मिनिटात करा चटकदार चटणी, हिवाळ्यात खायलाच हवी, आरोग्यासाठी उत्तम

कांदा

टोमॅटो

हिरवी मिरची

कडीपत्ता

लाल तिखट

धणे पूड

जिरे पूड

हळद

मीठ

कसुरी मेथी

कोथिंबीर

लसूण

कृती

सर्वप्रथम, एका पॅनमध्ये एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कडीपत्ता, बारीक चिरलेला टोमॅटो घालून साहित्य परतवून घ्या. कांदा लालसर झाल्यानंतर त्यात एक चमचा लाल तिखट, धणे पूड, जिरे पूड, चिमुटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरलेला टोमॅटो, एक हिरवी मिरची, कोथिंबीर, ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या, वाटीभर भिजलेले काळे वाटाणे व थोडं पाणी घालून साहित्य वाटून घ्या.

भात करपला? खाताना जळका वासही येतो? छोट्या कांद्याची ट्रिक करून पाहा, काही मिनिटात करपट वास निघून जाईल

तयार वाटण कांद्याच्या फोडणीत घालून मिक्स करा. नंतर त्यात थोडं पाणी घाला. तयार मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यात भिजलेले काळे वाटाणे घालून मिक्स करा. नंतर त्यात एक चमचा कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. अशा प्रकारे हॉटेलस्टाईल काळ्या वाटाण्याची उसळ खाण्यासाठी रेडी.

Web Title: How To Make Kala Chana Usal in Maharashtrian Style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.