lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > कोण म्हणतं घरी लोणी स्पंज डोसा करता येत नाही? पीठ दळताना घाला २ पांढऱ्या गोष्टी

कोण म्हणतं घरी लोणी स्पंज डोसा करता येत नाही? पीठ दळताना घाला २ पांढऱ्या गोष्टी

How to make South Indian Style Soft and sponge Dosa : बॅटर चुकतं म्हणून लोणी डोसा करणं टाळू नका, कापसाहून मऊ स्पंजी लोणी डोसा करताना लक्षात ठेवा एक खास टीप..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2024 11:54 AM2024-01-22T11:54:23+5:302024-01-22T11:58:24+5:30

How to make South Indian Style Soft and sponge Dosa : बॅटर चुकतं म्हणून लोणी डोसा करणं टाळू नका, कापसाहून मऊ स्पंजी लोणी डोसा करताना लक्षात ठेवा एक खास टीप..

How to make South Indian Style Soft and sponge Dosa | कोण म्हणतं घरी लोणी स्पंज डोसा करता येत नाही? पीठ दळताना घाला २ पांढऱ्या गोष्टी

कोण म्हणतं घरी लोणी स्पंज डोसा करता येत नाही? पीठ दळताना घाला २ पांढऱ्या गोष्टी

नाश्ता म्हटलं की आजकाल अनेकांची पसंती दाक्षिणात्य पदार्थांकडे वळते. इडली, डोसा, मेदू वडे त्यासोबत चटणी आणि सांबार आवडीने खाल्ले जातात. आपण या व्यतिरिक्त क्वचितच अप्पे किंवा लोणी स्पंज डोसा तयार करतो. हे पदार्थ देखील डाळ-तांदुळाच्या बॅटरचा वापर करून तयार केले जातात. पण हॉटेलसारखे लोणी स्पंज डोसा घरी तयार होत नाही.

मुळात घरात दाक्षिणात्य पद्धतीप्रमाणे तयार होत नाही. बऱ्याचदा साहित्यांच गणित चुकतं किंवा तयार करण्याची कृती चुकते. ज्यामुळे डोसा स्पंजी तयार होत नाही. जर आपल्याला दाक्षिणात्य पद्धतीचा लोणी स्पंज डोसा तयार करायचा असेल तर, या रेसिपीला फॉलो करून पाहा. परफेक्ट दाक्षिणात्य पद्धतीचा कापसाहून मऊ जाळीदार लोणी स्पंज डोसा काही वेळात तयार होईल(How to make South Indian Style Soft and sponge Dosa).

लोणी स्पंज डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदूळ

उडीद डाळ

साबुदाणा

मेथी दाणे

भाकरी करताना वातड-कडक होतात? शेफ पंकज भदौरिया सांगतात १ सोपी ट्रिक-भाकऱ्या होतील परफेक्ट

मीठ

लोणी

कृती

सर्वप्रथम, एका भांड्यात एक कप तांदूळ घ्या. त्यात एक कप पोहे, पाव कप उडीद डाळ, पाव कप साबुदाणा आणि अर्धा चमचा मेथी दाणे घालून मिक्स करा. नंतर त्यात पाणी घालून सर्व साहित्य ३ ते ४ वेळा धुवून घ्या. धुतल्यानंतर त्यात पाणी घाला आणि त्यावर झाकण ठेवून ५ तासांसाठी भिजत ठेवा.

वेफर्सचे २ पुडे अन् एक कांदा, पाहा वेफर्सची चमचमीत आमटी करण्याची सोपी कृती, चव अशी की म्हणाल लाजवाब

५ तासानंतर भिजवलेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्या. वाटताना त्यात पाणी घाला. जेणेकरून डोसे जाळीदार तयार होतील. तयार गुळगुळीत पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा, व त्यावर झाकण ठेवून ७ ते ८ तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवा. ८ तासानंतर चमच्याने पीठ ढवळून घ्या.

दुसरीकडे गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर अर्धा चमचा लोणी घालून तव्यावर पसरवा. एक चमचा बॅटर घ्या. बॅटर पॅनच्या मध्यभागी ओता. चमच्याने पसरवू नका. जाडसरच ठेवा, व त्यावर अर्धा चमचा लोणी लावून पसरवून दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे लोणी स्पंज डोसा खाण्यासाठी रेडी. आपण हा तयार डोसा चटणी किंवा सांबारसोबत खाऊ शकता. 

Web Title: How to make South Indian Style Soft and sponge Dosa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.