lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > भाकरी करताना वातड-कडक होतात? शेफ पंकज भदौरिया सांगतात १ सोपी ट्रिक-भाकऱ्या होतील परफेक्ट

भाकरी करताना वातड-कडक होतात? शेफ पंकज भदौरिया सांगतात १ सोपी ट्रिक-भाकऱ्या होतील परफेक्ट

Pankaj Ke Nuskhe I How to make Softer Bhakris : बाजरी, ज्वारीचं पीठ मळताना थंड की कोमट पाणी वापरावं? आपण भाकरी करताना चुकतो कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2024 05:07 PM2024-01-21T17:07:20+5:302024-01-21T17:08:27+5:30

Pankaj Ke Nuskhe I How to make Softer Bhakris : बाजरी, ज्वारीचं पीठ मळताना थंड की कोमट पाणी वापरावं? आपण भाकरी करताना चुकतो कुठे?

Pankaj Ke Nuskhe I How to make Softer Bhakris | भाकरी करताना वातड-कडक होतात? शेफ पंकज भदौरिया सांगतात १ सोपी ट्रिक-भाकऱ्या होतील परफेक्ट

भाकरी करताना वातड-कडक होतात? शेफ पंकज भदौरिया सांगतात १ सोपी ट्रिक-भाकऱ्या होतील परफेक्ट

पीठ नीट मळले गेले नाही तर, भाकरी (Bhakri) कडक किंवा वातड होतात. जर भाकऱ्या मऊ हव्या असतील तर, पीठ नीट मळायला हवे, असे आपल्याला आई नेहमी सांगते. बरोबर ना? महाराष्ट्रात भाकरी-भाजी हमखास केली जाते. भाजी आणि आमटीसोबत खाण्यासाठी भाकरी हवीच. भाकरी करण्यासाठी बहुतांश लोकं ज्वारी, बाजरी किंवा मक्याच्या पिठाचा वापर करतात.

हिवाळ्यात या तीन प्रकारच्या भाकऱ्या आवर्जून खाल्ले जातात (Cooking Tips). यातील पौष्टीक गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. शिवाय थंडीत शरीर उबदार ठेवण्यास मदत करते(Pankaj Ke Nuskhe I How to make Softer Bhakris).

पण भाकरी करताना बारीक चुका घडतात, ज्यामुळे भाकरी हवी तशी मनासारखी तयार होत नाही. सर्व गणित हे पिठावर अवलंबून असते. पीठ नीट मळले गेले तरच, भाकऱ्या मऊ-फुगलेल्या तयार होतात. त्यामुळे पीठ मळताना विशेष काळजी घ्यायला हवी. जर पीठ मळताना आपल्याकडूनही चुका होत असतील तर, शेफ पंकज भदौरिया यांनी सांगितलेल्या टिप्स फॉलो करून पाहा. यामुळे भाकरी मनासारखी गोल, मऊ, टम्म फुगलेली तयार होईल.

थंड वातावरणामुळे पीठ खराब? ३ भन्नाट किचन टिप्स, पिठात किडे - अळ्या होणार नाहीत

बाजरीची भाकरी

बाजरीची भाकरी अनेक घरात तयार केली जाते. पण बाजरीची भाकरी केल्यानंतर लवकर कडक होतात. असे होऊ नये पीठ नेहमी कोमट पाण्याने मळून घ्या. बाजरीचे पीठ मळण्याआधी पाणी गरम करा. नंतर परातीत बाजरीचे पीठ घ्या, त्यात कोमट पाणी, चिमुटभर मीठ आणि तेल घाला. पिठावर २ मिनिटांसाठी प्लेट किंवा झाकण ठेवा. नंतर हाताने पीठ मळून घ्या. मळलेल्या पिठाचा गोळा घ्या, जाडसर भाकरी थापून गरम तव्यावर घाला. व दोन्ही बाजूने भाजून घ्या.

ज्वारीची भाकरी

ज्वारीची भाकरी करताना आधी पाणी गरम करण्यासाठी ठेवा. परातीत पीठ घ्या, त्यात चवीनुसार मीठ आणि तेल घाला. नंतर कोमट पाणी ओतून हाताने मळून घ्या. मळलेल्या पिठाचा गोळा घ्या, जाडसर भाकरी थापून गरम तव्यावर घाला. व दोन्ही बाजूने भाजून घ्या.

रवीने घुसळून लोणी काढून करा रवाळ तूप, दाणेदार तुपाची सोपी रेसिपी-बनते १० मिनिटात

मक्याचे पीठ

मक्याच्या पिठाची भाकरी सहसा जास्त कोणी करत नाही. पण पीठ मळताना आपण कोमट पाण्याचा वापर करू शकता. कोमट पाण्याचा वापर करून पीठ मळून घ्या, नंतर मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन भाकरी थापून घ्या, व तव्यावर घालून दोन्ही बाजूने भाजून घ्या.

Web Title: Pankaj Ke Nuskhe I How to make Softer Bhakris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.