डोसा हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. सकाळी नाश्त्याला जर गरमागरम कुरकुरीत, जाळीदार डोसा मिळाला तर क्या बात है.. दिवसाची सुरुवात अगदी मस्त होऊन जाते. पण डोश्यासाठी लागणारं पीठ तयार करणं हे अनेकांना कठीण आणि वेळखाऊ काम वाटतं. म्हणूनच आता तांदळाचा डोसा अगदी झटपट कसा करायचा ते पाहूया (how to make rice aata dosa?).. सकाळच्या गडबडीत नाश्त्यासाठी हा डोसा अगदी पटापट करता येतो (instant dosa recipe in just 10 minutes). शिवाय मुलांना डब्यात देण्यासाठीही चांगला आहे.(how to make Udupi style crispy dosa?)
तांदळाच्या पिठाचा इंस्टंट डोसा करण्याची रेसिपी
साहित्य
२ वाटी तांदळाचं बारीक पीठ
बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर, सिमला मिरची सगळं मिळून १ वाटी
नवरात्रीत ९ दिवस उपवास करणार? ३ गोष्टी लगेच सुरू करा- उपवासाचा थकवा मुळीच येणार नाही
चवीनुसार मीठ
२ टेबलस्पून दही
एका मिरचीचे बारीक तुकडे
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती
हा डोसा करण्यासाठी तांदळाचं पीठ घरी तयार करायचं असेल तर तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ते पंख्याच्या हवेमध्ये सुकू द्या. आणि त्यानंतर ते गिरणीतून दळून आणून त्याचं पीठ तयार करा.
आता एका भांड्यामध्ये तांदळाचं पीठ घ्या. त्यामध्ये दही, भाज्या आणि चवीनुसार मीठ घाला.
७ प्रकारच्या चपात्या- रोज यापैकी एक चपाती खा, वजन- शुगर कंट्रोलमध्ये राहून तब्येत होईल ठणठणीत
यानंतर हळूहळू कोमट पाणी घालून तांदळाचं पीठ भिजवून घ्या. नेहमी डोशासाठी जसं पीठ ठेवतो, त्यापेक्षा हे पीठ थोडं पातळ करा.
आता गॅसवर तवा गरम करायला ठेवा. तवा कडक तापल्यानंतर त्यावर तेल लावा. त्यावर थोडं पाणी शिंपडा आणि त्यानंतर डोशाचं पीठ तव्यावर घाला. तव्यावर पीठ घातल्यानंतर ते चमचा किंवा वाटी फिरवून सारखं करून नका. आता पुढच्या एका मिनिटांतच छान कुरकुरीत, जाळीदार डोसा तयार होईल.