lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > नैवेद्याचे पंचामृत उरले तर त्याला थोडासा मॉर्डन टच देऊन झटपट बनवा पंचामृत केक...

नैवेद्याचे पंचामृत उरले तर त्याला थोडासा मॉर्डन टच देऊन झटपट बनवा पंचामृत केक...

leftover Panchamrut Cake : पंचामृत उरले तर त्याचे नेमके करायचे काय असा प्रश्न पडतो... उरलेल्या पंचामृताचा केक बनवण्याची झटपट रेसिपी पाहूयात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2023 11:11 AM2023-09-20T11:11:01+5:302023-09-20T11:31:12+5:30

leftover Panchamrut Cake : पंचामृत उरले तर त्याचे नेमके करायचे काय असा प्रश्न पडतो... उरलेल्या पंचामृताचा केक बनवण्याची झटपट रेसिपी पाहूयात..

How To Make Rava Panchamrut Cake. | नैवेद्याचे पंचामृत उरले तर त्याला थोडासा मॉर्डन टच देऊन झटपट बनवा पंचामृत केक...

नैवेद्याचे पंचामृत उरले तर त्याला थोडासा मॉर्डन टच देऊन झटपट बनवा पंचामृत केक...

आपल्याकडे सणासुदीला पूजेच्या निमित्ताने हमखास पंचामृत बनवलं जातं. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी पूजेनंतरचा प्रसाद म्हणून रव्याचा शिरा व पंचामृत दिले जाते. पूजेदरम्यान पंचामृत देवाला दाखवून मग ते प्रसाद म्हणून दिलं जातं. पंचामृत(Healthy Panchamrut Cake) म्हणजे पाच प्रकारच्या अमृताचं मिश्रण होय. प्राचीन काळापासून आपल्याकडे पंचामृताला फार महत्व आहे. पंचामृत (Panchamrit) हे दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून बनवले जाते. पंचामृत (Panchamrut Cake) हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे. पंच म्हणजे पाच आणि अमृत म्हणजे अमरत्व प्राप्त करणारे जल म्हणूनच याला पंचामृत असे म्हणतात(Satvik Panchamrut Cake Recipe).

सध्या सगळीकडे गणपती बाप्पाचे मोठ्या दिमाखात आगमन झाले आहे. गणपती आल्यावर आपण दररोज गणपतीला काहीतरी गोडधोड पदार्थाच्या सोबतीने पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवतो. कोणतीही पूजा, नैवेद्य, प्रसाद हा पंचामृताशिवाय अपूर्णच मानला जातो. यासाठी आपल्याकडे कोणत्याही धार्मिक विधीत पंचामृत हे अतिशय महत्वाचे असते. गणपतीच्या प्रसादासाठी नेहमी बनवले जाणारे हे पंचामृत प्रत्येक दिवशी संपेलच असे नाही. काहीवेळा हे पंचामृत एका वेळी सगळे संपत नाही अशावेळी उभा उरलेल्या पंचामृताचे नेमके करायचे काय असा प्रश्न आपल्याला पडतो. या धार्मिक व सात्विक पंचामृताला थोडासा मॉर्डन टच देऊन आपण उरलेल्या पंचामृताचा (Satvik Panchamrut Cake Recipe) मऊ, लुसलुशीत केक घरच्या घरी बनवू शकतो. उरलेल्या पंचामृताचा केक तयार करण्यासाठीची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make leftover Panchamrut Cake At Home).       

साहित्य :- 

१. दही - १/२ कप 
२. दूध - १/२ कप
३. साजूक तूप - १/४ कप 
४. मध - १/४ कप
५. साखर - १/४ कप
६. वेलची पावडर - १ टेबलस्पून 
७. रवा - १ कप 
८. बेकिंग पावडर - १ टेबलस्पून 
९. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून 
१०. ड्रायफ्रूट्सचे काप - १/२ कप 

गुलाबजामचा उरलेला पाक फेकून न देता करा झटपट होणारे गुलगुले, पाक वाया न जाता बनेल नवीन गोड पदार्थ...

सणावाराला भाज्या करताना करा झणझणीत ग्रेव्ही, ग्रेव्ही चमचमीत होण्यासाठी १३ सोप्या टिप्स, बेत जमेल मस्त...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये दही, दूध, साजूक तूप, मध, साखर घालून पंचामृत तयार करून घ्यावे. 
२. आता या तयार पंचामृतामध्ये रवा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालून चमच्याने ढवळून घ्यावे. 
३. सगळे मिश्रण चमच्याने ढवळून त्याचे घट्टसर एकजीव बॅटर करुन घेतल्यानंतर हे मिश्रण केकच्या टिनमध्ये ओतून घ्यावे. 

ऋषिपंचमी विशेष : तेलाचा थेंबही न वापरता करा ऋषीची भाजी, पौष्टिक आणि चविष्ट भाजीची पारंपरिक रेसिपी...

फक्त २० मिनिटांत करा १ कप रव्याचे मोदक, फ्रिजमध्ये १० दिवसही टिकणाऱ्या मोदकांची सोपी रेसिपी...

४. बॅटर केक टिनमध्ये ओतून घेतल्यानंतर त्यावर ड्राय फ्रूट्सचे काप वरुन घालून घ्यावे. 
५. जर आपल्याकडे मायक्रोव्हेव असेल तर १८०°C वर ३० ते ३५ मिनिटे हा केक बेक करुन घ्यावा, याचबरोबर प्रेशर कुकर (Cooker Cake) किंवा कढईचा वापर करणार असाल तर मंद आचेवर ३५ ते ४० मिनिटे बेक करावा. 

उकडीच्या मोदकांचे गणित जमत नाहीत, उकडताना फुटतात ? १० सोप्या टिप्स, कळीदार सुबक मोदक सहज जमतील...

उरलेल्या पंचामृताचा झटपट होणारा केक खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: How To Make Rava Panchamrut Cake.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.