lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > गुलाबजामचा उरलेला पाक फेकून न देता करा झटपट होणारे गुलगुले, पाक वाया न जाता बनेल नवीन गोड पदार्थ...

गुलाबजामचा उरलेला पाक फेकून न देता करा झटपट होणारे गुलगुले, पाक वाया न जाता बनेल नवीन गोड पदार्थ...

Gulgule Recipe : How To Make Gulgule At Home : गुलाबजाम खाऊन उरलेला पाक आपण फेकून देतो परंतु असे न करता बनवा एक खास पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2023 04:16 PM2023-09-09T16:16:36+5:302023-09-09T16:36:33+5:30

Gulgule Recipe : How To Make Gulgule At Home : गुलाबजाम खाऊन उरलेला पाक आपण फेकून देतो परंतु असे न करता बनवा एक खास पदार्थ...

How To Make Gulgule From Leftover Gulab jamun Sugar Syrup At Home. | गुलाबजामचा उरलेला पाक फेकून न देता करा झटपट होणारे गुलगुले, पाक वाया न जाता बनेल नवीन गोड पदार्थ...

गुलाबजामचा उरलेला पाक फेकून न देता करा झटपट होणारे गुलगुले, पाक वाया न जाता बनेल नवीन गोड पदार्थ...

सद्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. श्रावण महिना व अनेक प्रकारचे सणवार आले की त्यासोबत गोडाधोडाचे पदार्थही आपसूकच येतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सण, उपवास, काही खास प्रसंग असे असतात की त्यावेळी गोड पदार्थ बनवावाच लागतो. या सणवारांच्या दिवसांत असा एकही दिवस जात नाही की त्या दिवशी घरी गोड पदार्थ बनवला नाही. श्रावण महिन्यांतील उपवास, नागपंचमी, मंगळागौर, गणेशोत्सव अशा अनेक सणांना त्या त्या दिवसांनुसार काहीतरी खास गोड पदार्थ बनवला जातो. मोदक, लाडू, पुरणाच्या करंज्या, गोड शिरा, असे गोड पदार्थ बनवले जातात. एवढेच नव्हे तर काहीवेळा साखरेच्या पाकातील गुलाबजाम, रसगुल्ला, मालपुआ, जिलेबी असे पदार्थ देखील आवडीने खाल्ले जातात. 

या सणवारांदरम्यान असे अनेक गोड पदार्थ घरी बनवून ते खाण्याचा आनंद लुटणे याची मजा काही औरच असते. हे गोड पदार्थ आपण काहीवेळा घरी बनवतो तर कधी बाहेरुन विकत आणतो. गोड पदार्थ म्हटल्यावर ते घरातील सगळ्यांच्याच आवडीचे असतात. असे गोड पदार्थ लगेच खाऊन फस्त केले जातात. परंतु बरेचदा  पाकयुक्त गोड पदार्थ जसे की, गुलाबजाम (Gulab jamun), रसगुल्ला हे संपले तरीही त्याचा पाक उरतो. अशावेळी या पाकाचे नेमके काय करायचे असा प्रश्न पडतो. काहीवेळा तर आपण हा उरलेला साखरेचा पाक चक्क फेकून देतो. अशावेळी हा उरलेला पाक फेकून न देता त्याचा वापर करून गोड, खमंग, खुसखुशीत गुलगुले (Gulgule Recipe : How To Make Gulgule At Home) घरच्या घरी बनवू शकतो. यामुळे उरलेला पाकही वाया जाणार नाही व त्यापासून काहीतरी नवीन पदार्थ बनवून खाल्ल्याचे समाधानही मिळेल(How To Make Gulgule From Leftover Gulab jamun Sugar Syrup At Home).

साहित्य :- 

१. गुलाबजाम किंवा रसगुल्ला यांचा उरलेला पाक - १ ते २ कप 
२. गव्हाचे पीठ - १ ते २ कप 
३. तेल - तळण्यासाठी 
४. पाणी - गरजेनुसार 

श्रावण स्पेशल : नेहमीची मऊ भगर खाऊन कंटाळा आला असेल तर करा 'भगर पुलाव', वरीच्या तांदळाचा चविष्ट पदार्थ...

श्रावण स्पेशल : उपवासाची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का ? मऊसूत गोड उपवास पुरणपोळीची सोपी रेसिपी...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी गुलाबजामचा उरलेला पाक एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावा. 
२. आता या पाकात गव्हाचे पीठ घालून घ्यावे. गव्हाचे पीठ व पाक चमच्याने ढवळून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. 
३. त्यानंतर या तयार मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून त्याचे मध्यम कन्सिस्टंन्सीचे बॅटर बनवून घ्यावे. 

मंगळागौरी निमित्त पारंपरिक भाजणीचे वडे बनवण्याची सोपी कृती, वडे होतील खमंग - खुसखुशीत...

भजी - वडे एकदम गोल गरगरीत एकसारखे होण्यासाठी १ सोपी ट्रिक, सणावाराला करा उत्तम भजी - वडे...

४. आता एका मोठ्या कढईत तेल गरम करुन त्यात या बॅटरचे एक एक भजीच्या आकाराचे गोल गुलगुले सोडून घ्यावेत. 
५. हे गुलगुले गरम तेलात दोन्ही बाजुंनी खरपूस तळून घ्यावेत. 

गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!t

आपले गोड गुलगुले खाण्यासाठी तयार आहेत. हे गुलगुले आपण खाण्यासाठी गरमागरम सर्व्ह करु शकता.

Web Title: How To Make Gulgule From Leftover Gulab jamun Sugar Syrup At Home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.