lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > सणावाराला भाज्या करताना करा झणझणीत ग्रेव्ही, ग्रेव्ही चमचमीत होण्यासाठी १३ सोप्या टिप्स, बेत जमेल मस्त...

सणावाराला भाज्या करताना करा झणझणीत ग्रेव्ही, ग्रेव्ही चमचमीत होण्यासाठी १३ सोप्या टिप्स, बेत जमेल मस्त...

Most Essential Tips On Making The Perfect Curry Or Gravy : सणावाराच्या खास बेतासाठी भाज्यांच्या ग्रेव्ही अधिक घट्ट, टेस्टी व छान रंग येण्यासाठी सोप्या घरगुती टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2023 12:38 PM2023-09-12T12:38:23+5:302023-09-12T12:50:36+5:30

Most Essential Tips On Making The Perfect Curry Or Gravy : सणावाराच्या खास बेतासाठी भाज्यांच्या ग्रेव्ही अधिक घट्ट, टेस्टी व छान रंग येण्यासाठी सोप्या घरगुती टिप्स...

What are the most important tips for making a perfect gravy ? | सणावाराला भाज्या करताना करा झणझणीत ग्रेव्ही, ग्रेव्ही चमचमीत होण्यासाठी १३ सोप्या टिप्स, बेत जमेल मस्त...

सणावाराला भाज्या करताना करा झणझणीत ग्रेव्ही, ग्रेव्ही चमचमीत होण्यासाठी १३ सोप्या टिप्स, बेत जमेल मस्त...

सणवार म्हटलं की घरात काहीतरी खास जेवणाचा बेत बनतोच. सध्या सगळीकडेच सण उत्सवाचे वातावरण आहे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात प्रत्येक सणानुसार नवीन काहीतरी पदार्थ तयार होतंच असणार. घरांत काही खास प्रसंग, सण, उत्सव असला की आपण पंचपक्वान्न बनवण्याचा घाट घालतो. या पंचपक्वान्नांमध्ये, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, वरण - भात, लोणची, चटण्या, पापड यांसारख्या अनेक पदार्थांचा समावेश करतो(How to Make Perfect Gravy Every Time).

आपल्याकडील जेवणाच्या थाळीत नेहमी दोन प्रकारच्या भाज्या असतातच. एक भाजी ही रस्सेदार, पातळ ग्रेव्ही असणारी असते तर दुसरी सुकी भाजी असते. जेवणाच्या या खास थाळीत वेगवेगळ्या प्रकारच्या उसळ, घट्ट ग्रेव्ही, रस्सेदार भाज्या (TIPS & TRICKS FOR THE PERFECT GRAVY) असतात. या रस्सेदार, ग्रेव्ही वाल्या भाज्यांची चव चांगली लागली तर या भाज्या अजून खाव्याशा वाटतात. या ग्रेव्ही वाल्या भाज्या टेस्टी बनवण्यासाठी आपण त्यात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले किंवा ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी अनेक पदार्थ घालतो. परंतु या सणावाराला जेवणाचा बेत अधिकच रुचकर व चविष्ट होण्यासाठी खास रस्सेदार भाज्या (13 Tips To Help You Make The Perfect Gravy) अधिक चांगल्या बनवण्यासाठी काही खास टिप्स लक्षांत ठेवूयात(What are the most important tips for making a perfect gravy ?).

रस्सेदार किंवा ग्रेव्ही असणाऱ्या भाज्या अधिक चविष्ट बनवण्यासाठी टिप्स... 

१. ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी फोडणीसाठी तेलापेक्षा तुपाचा वापर करा. 
२. ग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा, ज्यामुळे भाजीच्या ग्रेव्हीचा रंग आणि स्वाद चांगला येईल.
३. ग्रेव्हीमध्ये चिमूटभर साखर घातल्यास ग्रेव्हीची टेस्ट वाढते.
४. टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना आपण त्यात टोमॅटो केचपचा देखील वापर करू शकता. 

गुलाबजामचा उरलेला पाक फेकून न देता करा झटपट होणारे गुलगुले, पाक वाया न जाता बनेल नवीन गोड पदार्थ...

पोळ्यांच्या डब्यातील पहिली पोळी वाफेने ओली होते ? २ सोपे उपाय, पोळी होणार नाही शिडशिडी...

५. ग्रेव्हीला चांगला लाल रंग येण्यासाठी पिकलेले टॉमेटोच वापरा. 
६. ग्रेव्हीचा रंग चांगला असावा यासाठी घरगुती किंवा चांगल्या गुणवत्तेचे मसाले वापरा. 
७. ग्रेव्हीसाठी आलं - लसणाची पेस्ट तयार करताना नेहमी त्यात लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं. यामुळे ग्रेव्हीचा रंग आणि टेस्ट दोन्ही उत्तम होतात. 
८. ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले घालूंन परतून घ्यावे. मसाल्याला तेल सुटलं की मगच भाज्या किंवा इतर साहित्य त्यात घालावं. 
९. भाजीच्या ग्रेव्हीत मीठ जास्त पडलं तर त्यात उकडलेला बटाटा घालावा. पाच मिनीटांनी बटाटा काढून टाकावा. बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा किंवा ग्रेव्हीचा खारटपणा कमी होतो. 

इडलीसाठी डाळ - तांदूळ भिजवायची, पीठ आंबवण्याची गरज नाही, इडली प्रिमिक्सने इडल्या होतील अगदी १० मिनिटांत...

अस्सल गावरान मटकी भेळ खायची आहे ? घ्या झणझणीत रेसिपी, चव अशी की तोंडाला सुटेल पाणी...

१०. शाही ग्रेव्ही तयार करण्यासाठी त्या ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, काजूची पेस्ट आणि खसखस पेस्ट घालावी.  

११. भाजीच्या ग्रेव्हीमध्ये पनीर घालण्यापूर्वी ते ५ ते १० मिनीटे कोमट पाण्यात बुडवून ठेवावे. यामुळे पनीर ग्रेव्हीत घातल्यामुळे ते मऊ व अधिक टेस्टी लागते.  
१२. पालक ग्रेव्ही तयार करताना पालक गरम पाण्यात ब्लांच केल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात घालावा, ज्यामुळे पालकाचा हिरवेपणा कायम राहतो. 
१३. ग्रेव्हीची चव चांगली लागण्यासाठी शक्य असल्यास ग्रेव्ही आदल्या दिवशी बनवावी. ज्यामुळे त्यात मसाले चांगले मुरतात आणि दुसऱ्या दिवशी ग्रेव्ही अधिक चविष्ट लागते.

Web Title: What are the most important tips for making a perfect gravy ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.