lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > सुबक कळीदार मोदक करण्याची १ झटपट ट्रिक - मोदक न जमणारेही करतील उत्तम मोदक...

सुबक कळीदार मोदक करण्याची १ झटपट ट्रिक - मोदक न जमणारेही करतील उत्तम मोदक...

Perfect Shaped Modak : मोदक करायचा म्हणजे उत्तम कळ्या पडल्या पाहिजे, ते करण्यासाठीच एक जबरदस्त सोपी ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2023 07:03 PM2023-09-16T19:03:20+5:302023-09-16T19:38:40+5:30

Perfect Shaped Modak : मोदक करायचा म्हणजे उत्तम कळ्या पडल्या पाहिजे, ते करण्यासाठीच एक जबरदस्त सोपी ट्रिक...

How to make perfect ukadiche modak recipe with rice flour. | सुबक कळीदार मोदक करण्याची १ झटपट ट्रिक - मोदक न जमणारेही करतील उत्तम मोदक...

सुबक कळीदार मोदक करण्याची १ झटपट ट्रिक - मोदक न जमणारेही करतील उत्तम मोदक...

गणेश चतुर्थीला घराघरांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमनाला आपण सगळेच त्याच्या येण्याआधी सगळी जय्यत तयारी करून ठेवतो. घरोघरी साफ-सफाई आणि सजावटीपासून ते बाप्पाच्या नैवेद्यापर्यंतची सगळी तयारी आत्तापर्यंत झाली असेलच. गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचे आगमन  झाल्यानंतर मऊसूत आणि चविष्ट उकडीच्या मोदकांचा नवैद्य दिला जातो. गणपती बाप्पाच्या नैवेद्याची थाळी मोदकांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. बाप्पासाठी हे उकडीचे मोदक (How to make perfect ukadiche modak recipe with rice flour) बनवण्याचा घाट घातला जातो. घरातल्या प्रत्येकाला मोदक खायला जितके आवडतात तितकेच ते बनवताना गृहिणींची दमछाक होते. मोदक बनवणे हे सोपे काम नाही. प्रत्येकाला उकडीचे मोदक बनवायला जमतातच असे नाही(Perfect shaped modak).

उकडीचे मोदक दिसायला आकर्षक दिसतात ते त्यांच्या बारीक कळ्यांमुळेच. जितक्या या कळ्या बारीक, नाजूक व सुबक असतात तितकी ती गृहिणी स्वयंपाक करण्यात उत्तम आहे असे मानले जाते. अनेकजण साच्याने किंवा हाताने कळ्या (Modak Without Mould) पाडून मोदक तयार करतात. असे असले तरीही कळ्या पाडून तयार केलेले मोदक दिसायलाही खूप सुरेख दिसतात. पण सर्वांना मोदकाच्या कळ्या करणं जमतच असे नाही, अनेकदा कळ्या करताना मोदकाची पारी फाटके (modak easy folding) किंवा त्यांचा आकार नीट येत नाही. अशावेळी कळ्या चांगल्या बनवण्यासाठी (How to Make perfect Shape Modak At Home) एक झटपट ट्रिक पाहूयात. ही ट्रिक फॉलो करुन आपण कळ्या (Modak Easy Folding) असलेले सुंदर उकडीचे मोदक तयार  करु शकता(how to make perfect ukadiche modak).

उकडीच्या मोदकाला कळ्या पाडण्याची सोपी ट्रिक... 

उकडीचे मोदक बनवताना त्याच्या कळ्या अनेकदा नीट पडत नाही. उकडकीच्या मोदकाला चमच्याच्या साहाय्याने अगदी सोप्या पद्धतीने कशा कळा पाडायच्या ते पाहूयात. यासाठी आपल्याला एका छोट्या चमच्याची मदत लागणार आहे.

१. उकडलेल्या तांदळाच्या पिठाचा गोळा करुन चांगला मळून घ्यावा. यानंतर हाताला थोडे पीठ किंवा तेल लावून त्याला हाताने पूरीसारखा पण खोलगट आकार द्यावा.

प्रसादाचा शिरा परफेक्ट कसा करायचा ? शिरा भगराळा होऊ नये, गाठी राहू नये म्हणून सोप्या टिप्स...

२. आता या खोलगट पुरीमध्ये मोदकासाठी बनवलेले गूळ, खोबऱ्याचे सारण चमचाने व्यवस्थित भरावे. 

३. यानंतर पुरी सर्व बाजूने पूर्ण बंद करुन घ्यावी आणि त्याला मोदकाचा आकार द्यावा.

उकडीच्या मोदकांचे गणित जमत नाहीत, उकडताना फुटतात ? १० सोप्या टिप्स, कळीदार सुबक मोदक सहज जमतील...

सणावाराला भाज्या करताना करा झणझणीत ग्रेव्ही, ग्रेव्ही चमचमीत होण्यासाठी १३ सोप्या टिप्स, बेत जमेल मस्त...

४. आता चमचाच्या मदतीने मोदकावर ठरावीक अंतरावर खाचा करुन कळ्या पाडाव्यात. 

५. यानंतर चाळणीवर किंवा मोदक पात्रात हे मोदक ठेवून १५ मिनिटे वाफवून घ्या. तयार मोदकांवर साजूक तूप घालून बाप्पाला नैवेद्य दाखवा. 

गुलाबजामचा उरलेला पाक फेकून न देता करा झटपट होणारे गुलगुले, पाक वाया न जाता बनेल नवीन गोड पदार्थ...

अशाप्रकारे चमच्याच्या मदतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने मोदकाच्या कळ्या तयार करु शकता. यामुळे मोदक दिसायलाही सुंदर, सुबक व नाजूक  दिसतील.

चमच्याने मोदकाला कळ्या पडण्याची सोपी पद्धत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

https://www.facebook.com/reel/117650921428679

 

 

Web Title: How to make perfect ukadiche modak recipe with rice flour.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.