Lokmat Sakhi >Food > न बिघडणाऱ्या चकलीची परफेक्ट रेसिपी! तळण्यासाठी तेलही लागेल कमी, करून बघा

न बिघडणाऱ्या चकलीची परफेक्ट रेसिपी! तळण्यासाठी तेलही लागेल कमी, करून बघा

Food And Recipe: ही रेसिपी वापरून चकली करून बघा. चकलीचा बेत कधीच फसणार नाही (Chakali Recipe).

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2022 05:15 PM2022-10-20T17:15:00+5:302022-10-20T17:15:50+5:30

Food And Recipe: ही रेसिपी वापरून चकली करून बघा. चकलीचा बेत कधीच फसणार नाही (Chakali Recipe).

How to make perfect crispy and tasty chakali for diwali? Chakali Recipe for diwali | न बिघडणाऱ्या चकलीची परफेक्ट रेसिपी! तळण्यासाठी तेलही लागेल कमी, करून बघा

न बिघडणाऱ्या चकलीची परफेक्ट रेसिपी! तळण्यासाठी तेलही लागेल कमी, करून बघा

Highlightsचकलीचा प्लॅन असा फसू नये, म्हणून यंदा या रेसिपीने चकली करून बघा.

दिवाळीत चिवडा- लाडू यांच्या पंक्तीला चकली पाहिजे म्हणजे पाहिजेच असते. त्याशिवाय दिवाळीची मजा पूर्ण कशी होणार. पण चकली करायची म्हणजे अनेक जणींना मोठंच संकट वाटतं. कारण कधी चकली (crispy and tasty chakali for diwali) खूप कडकच होते, तर कधी अगदीच मऊ पडते आणि तिला मुळीच काटे येत नाहीत. आपल्या चकलीचा प्लॅन असा फसू नये, म्हणून यंदा या रेसिपीने चकली करून बघा. ही रेसिपी (Chakali Recipe for diwali) #madhurasrecipe या युट्यूब पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

 

चकली रेसिपी
१. १ किलो भाजणीसाठी अर्धा किलो तांदूळ घ्या. रेशनचे किंवा सोना, मसुरी असे तांदूळ वापरा. चकलीसाठी शक्यतो जुनाच तांदूळ वापरावा. ३ ते ४ वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. पाणी निथळून घ्या आणि त्यानंतर तो सुती कपड्यावर पसरवून सुकायला ठेवा. 

२. याच पद्धतीने २०० ग्रॅम हरबरा डाळ, १०० ग्रॅम मूगाची डाळ, ५० ग्रॅम उडदाची डाळ ३ ते ४ वेळा धुवून घ्या. पाणी निथळलं की या सगळ्या डाळी तांदळाप्रमाणे सुती कपड्यावर पसरवून सुकायला ठेवा. धुतलेलं हे सगळं धान्य कमीतकमी १ दिवस किंवा २० ते २२ तास व्यवस्थित सुकवून घ्या. 

बाई गृहप्रवेश करताय की फुटबॉल खेळताय? माप ओलांडून घरात येणाऱ्या नवरीचा व्हायरल व्हिडिओ..

३. हे सगळं धान्य गरम कढईत एकेक करून मध्यम आचेवर भाजून घ्या. मात्र सगळ्यात आधी तांदूळ भाजा. धान्य भाजून झाल्यावर ५० ग्रॅम पोहे, ५० ग्रॅम साबुदाणा, १० ग्रॅम धने, १० ग्रॅम जिरे ड्राय रोस्ट करून घ्या.

४. सगळं भाजून झालं की ते थंड होऊ द्या. त्यानंतर सगळं मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. भाजणी जर बारीक झाली नसेल तर ती रवा चाळण्याच्या चाळणीतून चाळून घ्या. 

 

भाजणी भिजवायची कशी?
२ कप भाजणीसाठी १ कप पाणी घ्यावं. ते गरम करायला ठेवा. त्यात १ चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ, पांढरे तीळ आणि एक चमचा तेल टाका. पाणी उकळलं की त्यात भाजणी घालून मिश्रण एकत्र करून घ्या.

पणत्या लावताना ८ गोष्टींची डोळ्यात तेल घालून काळजी घ्या; सुरक्षित आणि आनंदी दिवाळी साजरी करा..

गॅस बंद करा. कढईवर झाकण ठेवा आणि १० मिनिटे ती वाफवून घ्या. त्यानंतर एका भांड्यात घेऊन मळून घ्या. छान मळलेल्या पिठाच्या चकल्या करा आणि खुसखुशीत तळून घ्या.

 

या टिप्सही लक्षात ठेवा. 
१. खूप भाजणी एकदम भिजवू नका. थोडी थोडी भिजवा. नाहीतर चकली कोरडी होण्याची, तुटण्याची शक्यता असते.
२. चकलीच्या पिठाचा गोळा घट्ट आणि मऊ असावा. त्यासाठी तो चांगला मळावा. म्हणजे चकलीचे तुकडे पडत नाहीत आणि ती कुरकुरीत होते. तळण्यासाठी तेलही कमी लागेल.

पेडिक्युअर करण्यासाठी पार्लरमध्येच कशाला जायला हवं? फक्त २ स्टेप्स.. पाय दिसतील खूप सुंदर
३. चकली नेहमीच मंद ते मध्यम आचेवर तळावी.
४. चकली तळताना जेव्हा तिच्या आजूबाजूचे तेलाचे बुडबूडे कमी होतात आणि चकली तळाला जाऊन बसायला लागते. तेव्हा ती व्यवस्थित तळल्या गेली आहे हे समजावे. 

 

Web Title: How to make perfect crispy and tasty chakali for diwali? Chakali Recipe for diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.