Lokmat Sakhi >Food > मटार करंजीचे सारण चविष्ट करण्यासाठी ३ टिप्स, कधीच बिघडणार नाही मटार करंजी

मटार करंजीचे सारण चविष्ट करण्यासाठी ३ टिप्स, कधीच बिघडणार नाही मटार करंजी

How To make matar karanji perfect : करंजी विकतसारखी छान चविष्ट होण्यासाठी खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2023 02:38 PM2023-12-18T14:38:04+5:302023-12-18T14:40:02+5:30

How To make matar karanji perfect : करंजी विकतसारखी छान चविष्ट होण्यासाठी खास टिप्स...

How To make matar karanji perfect : 3 tips to make the essence of Matar Karanji tasty, Matar Karanji will never go bad | मटार करंजीचे सारण चविष्ट करण्यासाठी ३ टिप्स, कधीच बिघडणार नाही मटार करंजी

मटार करंजीचे सारण चविष्ट करण्यासाठी ३ टिप्स, कधीच बिघडणार नाही मटार करंजी

स्वीट मार्टमध्ये मिळणारी मटार करंजी आपण अनेकदा खाल्लेली असते. अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट लागणारी ही करंजी आपल्याला खूपच आवडते. मटारच्या सिझनमध्ये म्हणजेच थंडीत आपणही ही करंजी करण्याचा प्रयत्न करतो खरा. पण बाजारात मिळणाऱ्या करंजी इतकी आपली करंजी छान होत नाही. कारण आपल्याकडून ही करंजी करताना काही चुका होण्याची शक्यता असते. पाहूयात करंजीचे सारण करताना कोणत्या ३ गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात (How To make matar karanji perfect).

१. मटार वाफवून घेताना तो योग्य प्रमाणात वाफवला जायला हवा. जास्त शिजला तर सारण खूप पातळसर होते. आणि मटार नीट शिजला नाही तर तो कडक आणि कच्चा राहतो. त्यामुळे मटार वाफवून किंवा शिजवून घेताना तो योग्य प्रमाणातच शिजले जायला हवे. 

(Image : Google)
(Image : Google)

२. सारण चविष्ट होण्यासाठी आपण त्यामध्ये चाट मसाला, आमचूर पावडर, बडीशेप, धणे असे काही ना काही घालतो. पण चवीसाठी प्रमाणापेक्षा जास्त मसाले घातले तर त्याची चव सुधारण्याऐवजी बिघडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आवश्यक तेवढेच मसाले घालायला हवेत.

३. सारण करंजीमध्ये भरताना त्याचे आणि बाहेरच्या आवरणाचे प्रमाण योग्य असायला हवे. म्हणजे करंजी छान खुसखुशीत लागते. पण हे प्रमाण खूप कमी किंवा खूप जास्त असेल तर करंजी चांगली होत नाही. त्यामुळे सारण योग्य प्रमाणातच भरावे. 

साहित्य - 

१. मटार - २ वाट्या

२. कांदा - १ वाटी (बारीक चिरलेला) 

३. आलं-मिरची-लसूण पेस्ट - १ चमचा

४. लिंबाचा रस - १ चमचा 

५. धने-जीरे पावडर - अर्धा चमचा 

६. मीठ - चवीनुसार 

७. साखर - चवीनुसार 

८. कोथिंबीर - अर्धी वाटी  

९. शेव - अर्धी वाटी 

कृती - 

१. मटार थोडे वाफवून हाताने किंवा रवीने ओबडधोबड बारीक करुन घ्यावेत. 

२. कढईत तेलात बारीक चिरलेला कांदा सोनेरी परतून घ्यावा.

३. वाफवलेल्या मटारमध्ये परतलेला कांदा, आलं-मिरची लसूण पेस्ट, धणे-जीरे पावडर, मीठ, लिंबाचा रस, साखर घालावी.

४. हे सगळे एकजीव करुन त्यामध्ये बारीक शेव, चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण पुन्हा हाताने एकत्र करावे.

५. करंजीमध्ये मिश्रण योग्य प्रमाणात भरायचे. आंबट, गोड, तिखट अशा या मिश्रणाची करंजी अतिशय चविष्ट लागते.  

Web Title: How To make matar karanji perfect : 3 tips to make the essence of Matar Karanji tasty, Matar Karanji will never go bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.